________________
सत्य-असत्याचे रहस्य
आपल्याला म्हणेल, 'भाऊ, आम्ही आमचा धंदा करत आहोत. त्यात तुम्हाला काय अडचण आहे? प्रत्येकजण आपापल्या सत्याला सत्य म्हणत असतो, तर यात सत्य कशास म्हणावे?
प्रश्नकर्ता : हे व्यवहार सत्य अनेकांगी आहे ना?
दादाश्री : हे सर्व तर अनेकांगीच आहे. पण ते विनाशी आहे. हे व्यवहार सत्य, रिलेटिव सत्य मात्र विनाशी आहे.
प्रश्नकर्ता : तुम्हाला सापेक्ष सत्य म्हणायचे आहे का?
दादाश्री : हो, हे सापेक्ष सत्य आहे. म्हणजे हे जे जगाचे सत्य आहे ना, ते सापेक्ष सत्य आहे. आपल्या देशात जे नाणे चालत असेल ते नाणे इतर देशात चालत नाही. एका ठिकाणी जे सत्य मानले जात असेल, ते दुसऱ्या देशात सत्य मानले जात नाही. म्हणजे काहीही पद्धतशीर नाही.
सत्य म्हणजे अनुभवातून मिळवलेले सार! तुमचे सत्य वेगळे, त्यांचे सत्य वेगळे, ह्यांचे सत्य वेगळे आणि पुन्हा कॉमन सत्य ते सुद्धा वेगळे.
प्रश्नकर्ता : जे सत्य आहे त्या सत्यापर्यंत आपण पोहचू शकतो, पण सत्याला प्राप्त करू शकत नाही, असे म्हटले जाते.
दादाश्री : हो, ते प्राप्त करू शकत नाही. हे जे सत्य आहे ना, ते सर्व स्वत:च्या 'व्हयू पॉइंट'चे सत्य आहे. आता 'व्हयू पॉइंट'च्या सत्यामधून खूप विचारवंतांनी कॉमन सत्य शोधून काढले, की कॉमन सत्य काय असले पाहिजे! हा विचारवंतांचा शोध आहे. हेच कॉमन सत्य आहे, त्यास कायद्याच्या रुपात ठेवले. बाकी, तेही सत्य नाही, ते सर्व व्यवहार सत्य आहे. म्हणजे एका अंशापासून ते तीनशे साठ अंशापर्यंतचे जे सत्य आहे ते सर्व निरनिराळे सत्य असते, शिवाय ते मतभेदवालेही असतात. म्हणून त्याचा कोणी थांग लावू शकत नाही.
जे रियल सत्य असते त्यात बदल नसतो. तिथे सर्व एकमतच असते. रियल सत्य एक मतवाले असते. रिलेटिव सत्य वेगवेगळ्या मतांचे असते, वस्तुतः ते सत्य नाही.