________________
सत्य-असत्याचे रहस्य
25
माणसाला निसर्ग मदत करत नाही, त्याला लगेच पकडवून देतो! त्याचे काय कारण असेल?
प्रश्नकर्ता : कारण खऱ्या माणसाकडून काही चुकीचे काम होऊ नये म्हणून.
दादाश्री : नाही, निसर्गाची इच्छा त्याला उच्च गतित घेऊन जाण्याची आहे. म्हणून त्याला सुरुवातीपासूनच ठोकर मारुन जागेवर ठेवतो. आणि त्या दुसऱ्याला खालच्या गतित घेऊन जाणार आहे. म्हणून त्याला मदत करत असतो. तुम्हाला नाही समजले का? खुलासा झाला की नाही? झाले मग!
पुण्य-पाप, असे विभागले जातात तेथे प्रश्नकर्ता : कित्येक लोक खोटे बोलतात तरीही ते सत्यात मोडते. आणि कित्येक लोक खरे बोलतात तरीही ते खोट्यात मोडते. हे कसले पझल (कोडे) आहे?
दादाश्री : ते त्याच्या पाप आणि पुण्याच्या आधारावर घडत असते. त्याच्या पापाचा उदय असेल तेव्हा तो खरे बोलला तरीही खोट्यात खपवले जाते. आणि जेव्हा पुण्याचा उदय असतो तेव्हा तो खोटे बोलला तरीही लोक त्याचे खरे मानून स्वीकारतात, त्याने कितीही खोटे केले तरी ते
चालते.
प्रश्नकर्ता : यात त्याला काही नुकसान नाही का?
दादाश्री : नुकसान तर आहे, पण पुढील जन्माचे. या जन्मात तर त्याला मागील जन्माचे फळ मिळाले. आणि हे जे आता खोटे बोलला ना, त्याचे फळ त्याला पुढील जन्मी मिळेल. आता तर त्याने हे बीज टाकले. बाकी, हा काही अंदाधुंदी कारभार नाही की काहीही चालवून घेतले जाईल!
तिथे अभिप्राय बदलावा आता तुम्ही दिवसभरात एखादे तरी कर्म बांधता का? आज