________________
सत्य-असत्याचे रहस्य
एखाद्या वेळेस तुला बोरीवली स्टेशनवर पाठवले असेल, आणि त्यावेळी तुला तुझा मित्र भेटला, म्हणून तू स्टेशनला न जाता त्याच्याशी गप्पा मारत बसलास. किंवा तुला सांगितले असेल की तू जा, दादांना पाहून ये, आले आहेत की नाही, पाच वाजता येणार होते, आणि तू येऊन सांगितलेस, की दादा काही आलेले नसावेत. पण मी सत्संगात आलो असेन, आणि हे जर सगळ्यांना कळले, तेव्हा मग विश्वास उडून जातो. विश्वास गेला म्हणजे माणसाची किंमत खलास.
24
आपण खोटे बोलतो, कोणी आपल्याशी खोटे बोलतो तेव्हा आपल्याला समजायला हवे की हा मनुष्य माझ्याशी इतके खोटे बोलतो, तेव्हा मला एवढे दुःख होते, मग मी जर कुणाशी खोटे बोललो तर त्याला किती बरे दुःख होईल ? हे तुला समजते ना ? की नाही समजत ?
... तर सिग्नल शक्ति निघून जाते
प्रश्नकर्ता : हे लोक जे धंदा करतात, जसे खिसा कापण्याचा किंवा चोरी करण्याचा, तेव्हा त्यांच्या आतील आत्मा त्यांना कधी सिग्नल देत असेल की नाही ?
दादाश्री : एक-दोनदा चोरीचे सिग्नल देतो. आत्मा तर यात पडतच नाही म्हणा. एक-दोनदा आतून सिग्नल मिळतो की, 'हे करण्यासारखे नाही.' पण ते सिग्नल ओलांडले (दुर्लक्ष केले) की मग संपले, एकदा ओलांडले म्हणजे सिग्नलची शक्ति संपली. सिग्नल लागला असताना सुद्धा गाडीने सिग्नल ओलांडला तर सिग्नलची शक्ति निघून गेली. सिग्नल लागला नसताना ओलांडले जाणे ही वेगळी गोष्ट आहे.
प्रश्नकर्ता: खऱ्या माणसांचे नेहमी शोषण होते आणि खोटी (अप्रामाणिक) माणसं आहेत ते गुंडगिरी किंवा वाईट कामच करतात, मौजमजा करतात, ते कसे काय ?
दादाश्री : खरी माणसं तर खिसा कापायला गेली की लगेच पकडली जातात. आणि खोटा माणूस तर संपूर्ण आयुष्य करीत असेल तरीही तो पकडला जात नाही ! निसर्ग त्याला मदत करतो. पण त्या खऱ्या