________________
सत्य-असत्याचे रहस्य
असतात. आम्ही सुद्धा निराग्रही असतो. आम्ही कोणत्याही भानगडीत पडत नाही. नाहीतर याचा कधी अंतच येणार नाही. अंत येईल असे नाहीच मुळी.
आग्रह, सत्याचाही नाही, असत्याचाही नाही
आम्ही या सत्याचा आग्रह करीत नाही. कारण हे सत्य 'एक्ॉक्टली' नाही, आणि तशी ही खोटी वस्तू पण नाही. पण हे रिलेटिव सत्य आहे आणि आम्ही आहोत रियल सत्यावर लक्ष ठेवणारे! रिलेटिवची आम्ही दखल घेत नाही, रिलेटिवमध्ये आग्रह नसतो.
आम्हाला तर सत्याचाही आग्रह नाही, याचा अर्थ मला असत्याचा आग्रह आहे असे नाही. तिथे मग कोणत्याही वस्तुचा आग्रहच नसतो! असत्याचाही आग्रह नसावा आणि सत्याचाही आग्रह नसावा. कारण सत्यअसत्य असे काही नसतेच. वास्तविकतेत असे काही नाहीच. हे तर रिलेटिव सत्य आहे. संपूर्ण जगाने रिलेटिव सत्याचा आग्रह धरुन ठेवला आहे, पण रिलेटिव सत्य हे विनाशी आहे. हो, स्वभावानेच विनाशी आहे.
कोणते खरे? सोडले ते की धरुन ठेवले ते?
हे जे व्यवहार सत्य आहे, त्याचा आग्रह धरणे ही किती भयंकर जोखिम आहे ? सर्वच मान्य करतात का, या व्यवहार सत्याला? चोर तर मान्य करणारच नाही, घ्या आता! काय वाटते तुम्हाला? चोरांच्या कम्युनिटीचाही एक आवाज आहे ना?! हे सत्य तर तिथे असत्यच ठरते!
म्हणजे हे सर्व रिलेटिव सत्य आहे, काही ठाव ठिकाणा नाही. आणि अशा सत्यासाठी लोक मरायला तयार होतात. अरे, सत्साठी मरायला तयार व्हायचे आहे. सत् अविनाशी असते आणि हे सत्य तर विनाशी आहे.
दादाश्री : सत्मध्ये आग्रह नसतोच.
प्रश्नकर्ता : सत्मध्ये आग्रह असू शकतच नाही ना! आग्रह संसारात असतो. संसारात सत्याचा आग्रह असतो. आणि सत्याच्या आग्रहाबाहेर