________________
सत्य-असत्याचे रहस्य
'हे चुकीचे बोलले गेले.' कारण तुमच्याकडे पुरुषार्थ आहे. हे 'ज्ञान' प्राप्ती झाल्यानंतर तुम्ही पुरुष झाला आहात. प्रकृतीत कोणत्याही प्रकारचे किंचितही हिंसक वर्तन नसेल, हिंसक वाणी नसेल, हिंसक मनन नसेल, असे जेव्हा होईल त्या दिवशी तुमची तीनशे साठ डिग्री पूर्ण झालेली असेल!
एवढाच आग्रह स्वीकार्य प्रश्नकर्ता : माझ्या बाबतीत कसे होते? की खरेच बोलले पाहिजे, खरेच केले पाहिजे, खोटे करायचेच नाही. खोटे करतो ते बरोबर नाही असा माझा आग्रह होता.
दादाश्री : आत्म्याचे हित पाहावे. बाकी, खरे बोलावे पण हे खरे म्हणजे संसारहित आहे आणि हे खरे आत्म्याच्या बाबतीत तर खोटेच आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीचा अति आग्रह धरु नये. आग्रह धरुच नये. महावीर भगवानांच्या मार्गात आग्रह हे विष आहे. फक्त एक आत्म्याचाच आग्रह, दुसरा कोणताच आग्रह नाही, आत्म्याचा आणि आत्म्याच्या साधनांचा आग्रह !
आग्रह, हेच असत्य
या जगात असे कुठलेही सत्य नाही की ज्याचा आग्रह करण्यासारखा असेल! ज्याचा आग्रह केला ते सत्यच नाही.
महावीर भगवान काय सांगत होते? सत्याग्रह पण नसावा. सत्याचा आग्रह पण नसावा. सत्याचा आग्रह अहंकाराशिवाय होऊ शकत नाही.
आग्रह म्हणजे ग्रासीत. सत्याचा आग्रह असो की वाटेल तो आग्रह असो पण ग्रासित म्हटले जाणार. या सत्याचा आग्रह धराल पण ते सत्य जर आउट ऑफ नॉर्मालिटी झाले, तर ते असत्य आहे. आग्रह धरणे ही वस्तुच सत्य नाही. आग्रह धरला म्हणजे असत्य झाले.
भगवंत निराग्रही असतात, दुराग्रही नसतात. भगवंतात सत्याग्रह सुद्धा नसतो. सत्याग्रह संसारी लोकांमध्येच असतो. भगवंत तर निराग्रही