________________
सत्य-असत्याचे रहस्य
मी आचार्य आहे, याचे सुद्धा प्रतिक्रमण करावे लागेल. मी स्वतः ला आचार्य मानले त्याचेही प्रतिक्रमण करावे लागेल. अरे, कारण मी शुद्धात्मा आहे.
39
म्हणजे हे सारे खोटे आहे. सर्व खोटे, हे तुमच्या लक्षात येते की नाही? हे नाही समजल्यामुळे तुम्ही असे म्हणता की, 'मी सत्य सांगत आहे.' अरे, सत्य सांगितले तर त्याचा कोणीही विरोध करणार नाही. आता मी इथे काही बोलतोय, तर समोर कोणी विरोध करायला उठतो का? वादविवाद होतो का ? मी जे बोलत असतो ते सर्वजण ऐकतच राहतात ना ?
प्रश्नकर्ता : हो ऐकतच राहतात.
दादाश्री : वादविवाद करीत नाही ना ? म्हणजे हे सत्य आहे. ही वाणी सत्य आहे आणि सरस्वती आहे. आणि ज्या वाणीमुळे संघर्ष होतो ती वाणी खोटी, संपूर्ण खोटी आहे. समोरचा कोणी म्हणेल, 'बिन अकलेचे नुसते, तुम्ही तर काही बोलूच नका' म्हणजे मग तोही खोटा आणि हाही खोटा आणि ऐकणारे सुद्धा खोटे ! ऐकणारे काही बोलले नसतील, ते सर्वच खोटे, पूर्ण समूहच खोटा.
प्रश्नकर्ता : आपल्या कर्माचे उदयच असे असतील म्हणून, समोरच्याला आपले खरे असेलेलेही खोटेच वाटत असेल तर ?
दादाश्री : खरे नसतेच. कोणतीही व्यक्ति खरे बोलू शकतच नाही. खोटेच बोलते. खरे असलेले तर समोरचा मान्य करेलच, आणि ते खरे, अन्यथा ते स्वतःच्या समजुतीने मानलेले सत्य आहे. स्वतः मानलेल्या सत्याचा लोक काही स्वीकार करीत नाहीत.
म्हणून भगवंतांने कोणाचे सत्य म्हटले आहे ? तेव्हा म्हणे, वीतराग वाणी ही सत्य आहे. वीतराग वाणी म्हणजे काय ? वादी मान्य करतो आणि प्रतिवादी सुद्धा मान्य करतो. त्यास प्रमाण मानण्यात येते. बाकी सारी तर राग-द्वेषपूर्ण वाणी, खोटी - लबाड. तुरुंगात घालण्यासारखी. यात सत्य असेल का? रागी वाणीतही सत्य नसते आणि द्वेषी वाणीतही सत्य नसते. यात सत्य आहे असे तुम्हाला वाटते? हे आम्ही जे इथे