________________
सत्य-असत्याचे रहस्य
सत्य, विनाशी आणि अविनाशी
प्रश्नकर्ता : सत्य आणि असत्य, या दोन्हींमधील फरक काय ?
असत्य
दादाश्री : असत्य हे तर असत्य आहेच. परंतु हे जे सत्य आहे ना, ते व्यवहार सत्य आहे, खरे सत्य नाही. हा जावई तो काय कायमचा जावई नसतो, सासरा सुद्धा कायमचा नसतो. निश्चय सत्य असते त्यास सत् म्हटले जाते, ते अविनाशी असते. आणि जे विनाशी असते त्यास सत्य म्हटले जाते. पण पुन्हा हे सत्य देखील असत्य होऊन जाते, ठरते. पण तरी सांसारिक सुख पाहिजे असेल तर असत्यावरुन सत्यावर आले पाहिजे. आणि मोक्षाला जायचे असेल तर हे (व्यवहार) सत्यही जेव्हा असत्य ठरेल तेव्हा मोक्ष होईल ! म्हणजे हे सत्य आणि असत्य दोन्हीही फक्त कल्पितच आहेत. पण ज्याला सांसारिक सुख पाहिजे, त्याने सत्याची कास धरावी की ज्यामुळे दुसऱ्यांना दुःख होणार नाही. परम सत्य (सत्) प्राप्त करेपर्यंतच या सत्याची गरज आहे.
'सत्' मध्ये नाही कधी बदल
अर्थात् हे जे ‘सत्य-असत्य' आहे ना, ह्या जगाचे जे सत्य आहे ना, ते भगवंतांपुढे पूर्णपणे असत्यच आहे, ते सत्य नाहीच. हे सर्व पापपुण्याचे फळ आहे. जग तुम्हाला 'चंदुभाऊ 'च ( चंदुभाऊच्या जागी वाचकाने स्वत:चे नाव समजायचे) म्हणेल ना ?
प्रश्नकर्ता : हो.
दादाश्री : तेव्हा भगवंत म्हणतील, 'नाही, तुम्ही शुद्धात्मा आहात'. सत् एकच प्रकारचे असते, कुठेही गेलात तरी प्रत्येक जीवात सत् एकाच