________________
36
सत्य-असत्याचे रहस्य
काका विचारत असतील, 'काय फुटले?' तेव्हा आपल्याला जर थोडे खोटे बोलून समजावता आले की 'काका, शेजाऱ्यांच्या घरी काहीतरी फुटले आहे असे वाटते.' तेव्हा काका म्हणतील, 'हो, मग काही हरकत नाही.' म्हणजे अशा ठिकाणी खोटे बोलले तरी हरकत नाही. कारण तिथे जर खरे बोलाल तर काका कषाय(क्रोध) करतील, त्यामुळे त्यांना खूप नुकसान सोसावे लागेल ना! म्हणून तिथे 'सत्याचे' शेपूट धरण्यासारखे नाही. आणि 'सत्याचे' शेपूट धरले, यालाच भगवंताने 'असत्य' म्हटले आहे.
'ते' सत्य काय कामाचे? । बाकी, खरे-खोटे हे तर एक लाईन ऑफ डिमार्केशन (भेदरेषा) आहे, नाही की खरोखर तसेच आहे. 'सत्याचे जर शेपूट धराल तर ते असत्य म्हटले जाईल,' तेव्हा ते भगवंत कसे होते? ! सांगणारे कसे होते?! 'अहो साहेब, सत्याला पण तुम्ही असत्य म्हणता?' 'हो, शेपूट का धरुन ठेवले?' समोरचा म्हणेल की 'नाही, असेच आहे.' तर आपण सोडून द्यावे.
हे खोटे बोलण्याचे फक्त आम्हीच शिकवले आहे, या जगात दुसऱ्या कोणीही शिकवले नाही. पण याचा जर कोणी दुरुपयोग केला तर जबाबदारी त्याची स्वत:चीच. बाकी, आम्ही तर यातून सटकण्याचा मार्ग दाखवितो, की भाऊ, या काकांना कषाय होऊ नये म्हणून तू असे कर. नाहीतर त्या काकांना कषाय झाले तर ते तुमच्यावर कषाय करतील. 'तुला अक्कल नाही, बायकोला काही बोलत नाही. ती मुलांना नीट सांभाळत नाही. ही काचेची भांडी सर्व फोडून टाकते.' म्हणजे ही अशी सुरवात होते, आणि वाढत जाऊन मग भांडण पेटते! घरात कषायचे वातावरण झाले की मग भांडण पेटते. त्यापेक्षा पेटताच त्यावर टोपली झाकून द्यावी!
यात तर अशाप्रकारे समाधान करता येईल. पण हे खोटे आणि खरे असे शब्दच नसतात. ती तर डिमार्केशन लाईन आहे.
व्यवहार सुटतो 'ड्रामाने' व्यवहार म्हणजे काय? दोघांना समोरासमोर संतोष झाला पाहिजे.