________________
सत्य-असत्याचे रहस्य
5
/
व्यवहाराने तर राहावे लागेल ना? अतिशय उच्च प्रकारचा सुंदर व्यवहार असेल तेव्हा 'शुद्ध उपयोग' राहतो.
प्रश्नकर्ता : उच्च प्रकारचा व्यवहार ठेवायचा असेल तर काय करावे?
दादाश्री : भावना करावी. लोकांचा व्यवहार पाहावा, आमचा व्यवहार पाहावा. पाहिल्याने सर्वकाही जमते. व्यवहार म्हणजे समोरच्याला संतोष देणे ते. व्यवहाराला 'कट ऑफ'(बंद) करू नये. ती तर आत्महत्या केली असे म्हटले जाईल. व्यवहार तर हळूहळू संपुष्टात आला पाहिजे. हे विनाशी सत्य आहे, म्हणून सोडून द्यायचे नाही. ही तर एक प्रकारची बेसिक एरेन्जमेन्ट आहे. म्हणून लग्नही करायचे आणि 'ही माझी बायको आहे' असेही म्हणायचे. बायकोला असेही म्हणायचे, की 'तुझ्या शिवाय मला करमत नाही.' असे तर बोलावेच लागते. असे नाही म्हटले तर संसाराचे गाडे कसे चालेल? आम्ही सुद्धा अजूनपर्यंत हिराबाला (दादाश्रींच्या पत्नी) असे म्हणत असतो, 'तुम्ही असता तेव्हा आम्हाला खूप चांगले वाटते. पण आता आम्ही येथे जास्त राहू शकत नाही ना'!
प्रश्नकर्ता : नि:स्वार्थ कपट!
दादाश्री : हो, नि:स्वार्थ कपट ! त्यास ड्रामा(नाटक) म्हणतात. धीस इज ड्रामेटिक!(हे नाटकीय आहे) म्हणजे हे आम्ही सुद्धा अभिनय करत असतो तुमच्याशी. आम्ही जसे दिसत असतो, ज्या गोष्टी करीत असतो, त्याप्रमाणे खरेतर आम्ही नाही आहोत. हे सर्व तर तुमच्याशी अभिनय करीत असतो, नाटक-ड्रामा करीत असतो.
म्हणजे व्यवहार सत्य कशाला म्हणतात? की कोणत्याही जीवाला नुकसान होणार नाही अशाप्रकारे वस्तू घेतो, वस्तू ग्रहण करतो, कोणत्याही जीवाला दुःख होणार नाही अशी वाणी बोलतो. कोणत्याही जीवाला दु:ख होणार नाही असे वर्तन करतो. हे मूळ सत्य आहे, व्यवहाराचे मूळ सत्य हेच आहे. अर्थात् कोणाला दुःख होणार नाही हा सर्वात मोठा सिद्धांत. वाणीने दुःख होणार नाही, वर्तनाने दुःख होणार नाही आणि मनाने कोणासाठी खराब विचार केला जाणार नाही. हे सर्वात मोठे सत्य आहे,