________________
सत्य-असत्याचे रहस्य
का ?
35
आत्म्यार्थासाठी खोटे तेच खरे
प्रश्नकर्ता : परमार्थासाठी थोडे खोटे बोलले तर त्याचा दोष लागतो
दादाश्री : परमार्थ म्हणजे आत्म्यासाठी जे काही करण्यात येते, त्याचा काही दोष लागत नाही आणि देहासाठी जे काहीही करण्यात येते, चुकीचे करण्यात आले तर दोष लागतो आणि चांगले करण्यात आले तर गुण लागतो. आत्म्याकरीता जे काही करण्यात येते, त्यास हरकत नाही. परमार्थ म्हणजे आत्म्यासाठीच तुम्ही सांगत आहात ना ? ! हो, आत्महेतु असेल, आणि त्यासाठी जी-जी कार्ये होत असतात त्यात काही दोष लागत नाही. समोरच्याला आपल्या निमित्ताने दुःख झाले तर मात्र त्याचा दोष लागतो.
कषाय करण्यापेक्षा असत्य उत्तम
म्हणून आम्ही सांगितले आहे, की आत्मा प्राप्त करण्यासाठी तुम्ही घरच्यांशी असत्य बोलून आलात तरी ते सत्य आहे. बायको म्हणेल, ‘तिथे दादांकडे जाऊ नका.' पण तुमचा हेतू आत्मा प्राप्त करण्याचा आहे, म्हणून तुम्ही असत्य बोलून आलात तरीही जबाबदारी माझ्यावर आहे. कषाय कमी करण्यासाठी घरी गेलो आणि सत्य बोलल्यामुळे घरात कषाय वाढेल असे असेल तर असत्य बोलूनही कषाय बंद केलेले चांगले. तेथे मग सत्याला बाजूला सारून ठेवायचे. 'हे' सत्य अशा ठिकाणी असत्यच आहे !
'खोट्याने' सुद्धा कषाय थांबवावा
जिथे सत्यासाठी थोडा पण आग्रह आहे तिथे ते असत्य होऊन गेले! म्हणून आम्ही सुद्धा खोटे बोलतो ना! हो, कारण त्या बिचाऱ्याला कोणीतरी हैराण करत असेल आणि ह्या लोकांनी तर शेपूट धरुन ठेवलेले आहे. गाढवाचे शेपूट धरले ते धरले ! अरे सोडून दे ना ! त्याने लाथा मारल्या तर सोडून द्यायचे. लाथ मारल्यावर आपल्याला समजते, की हे मी गाढवाचे शेपूट धरुन ठेवले आहे. सत्याचे शेपूट धरायचे नाही. सत्याचे शेपूट धरणे हे असत्यच आहे. धरुन ठेवणे हे सत्य नाहीच. सोडून देणे ते सत्य !