________________
सत्य-असत्याचे रहस्य
31
सत्य ठरवल्याने, बनते असत्य! प्रश्नकर्ता : सत्याला सत्य ठरवायला गेल्याने, तसा प्रयत्न केल्याने ते असत्य होऊन जाते.
दादाश्री : या जगात फक्त वाणीच सत्य-असत्यापासून वेगळी आहे. ती सत्यात घेऊन जायची असेल तर घेऊन जाऊ शकतो, आणि असत्यात घेऊन जायची असेल तरीही घेऊन जाऊ शकतो. पण दोन्हीही आग्रहपूर्वक बोलू शकत नाही. आग्रहपूर्वक बोलले ते पॉइजन ! शास्त्रकारांनी सांगितले आहे की, अत्याधिक आग्रह केला म्हणून ते असत्य आहे, आणि आग्रह केला गेला नाही म्हणून सत्य आहे. जिथे सत्याला जर सत्य ठरवायला जाल तर असत्य होऊन उभे राहील, अशा जगात तुम्ही सत्य ठरवता?!
म्हणून सत्य-असत्याच्या भानगडीत पडू नये. भानगड करणारे कोर्टात जातात. पण आपण काही कोर्टात बसलेलो नाही. आपण तर इथे दुःख होणार नाही इतकेच पाहायचे. सत्य बोलल्याने समोरच्याला दुःख होत असेल म्हणजे आपल्याला बोलणेच जमत नाही.
शोभते सत्य, सत्याच्या रुपात त्याचे असे आहे, सत्याची प्रत्येक ठिकाणी गरज आहे. आणि जर सत्य असेल तर विजय होतो. पण सत्य सत्याच्या रुपात असले पाहिजे, त्याच्या व्याख्येत असले पाहिजे.
स्वतःचे खरे ठरवण्यासाठी लोक मागे लागतात. पण खऱ्याला खरे ठरवू नका. सत्यात जर, समोरची व्यक्ति तुमच्या सत्यासमोर विरोध करीत असेल तर समजावे की तुमचे (मत) खरे नाही, काहीतरी कारण आहे त्यामागे. म्हणून सत्य कशास म्हणतात? खऱ्या गोष्टीला खरी गोष्ट केव्हा मानली जाते? तर फक्त सत्यच तेवढे बघायचे नाही. ते चार प्रकारे असावे. सत्य असले पाहिजे, प्रिय असले पाहिजे, हितकारक असले पाहिजे आणि मित, म्हणजे कमी शब्दात असले पाहिजे, त्याला सत्य म्हटले जाते. म्हणजे