________________
सत्य-असत्याचे रहस्य
पैसा कधीही रस्त्यात पडलेला राहत नाही, सोन्याची वस्तुही कधी पडलेली राहत नाही. अरे, नकली सोन्याचे असेल तर तेही उचलून घेऊन जातात. ___अर्थात् मिथ्या काहीही नसतेच. मिथ्या तर, जेव्हा दुसऱ्या कोणाच्या खिशातून लाख रुपये चोरले जातील ना, तेव्हा म्हणेल, 'अरे जाऊ द्या ना, ब्रह्म सत्य आणि जगत मिथ्या आहे! पण जेव्हा तुझे स्वत:चे पैसे चोरले जातील तेव्हा समजेल मिथ्या आहे की नाही! असे वाक्य बोलून लोकांनी दुसऱ्यांचे खिसे कापयाला लावले. वाक्य तर एक्ॉक्ट असले पाहिजे, माणसाला फिट (लागू) होईल असे असले पाहिजे. तुम्हाला असे नाही का वाटत की फिट होईल असे वाक्य असायला पाहिजे?
प्रश्नकर्ता : हो, बरोबर आहे. दादाश्री : हे सर्व सुख सत्य नाही वाटत? प्रश्नकर्ता : वाटते.
दादाश्री : खोटे असते तर कधीच सोडून पळून गेले असते. आणि हाच तर सत्याचा पुरावा आहे. म्हणून तर लोक यात मजा करतात. जिलबी खाल्ली असेल ना, त्याचीही चव येते आणि लोकं आंबे खात नसतील का? तेव्हा हे काय नकली आहे का?
पुन्हा हे जग मृगजळासारखेही नाही. लोकांनी सांगितले 'मृगजळासारखे आहे!' पण ओहोहो! हे तर करेक्ट आहे. आत जळजळ होत असेल, तेव्हा कित्येकांना रात्रभर झोपही येत नाही!
म्हणून या जगाला मिथ्या कसे म्हणता येईल? 'मिथ्या' म्हटले तर आपण खरे मानूया का? रात्री झोपी गेला असेल, तोंड थोडेसे उघडे असेल, आणि तोंडात जराशी मिरची घातली की मग आपण त्याला उठवावे लागेल? जर मिथ्या असेल, तर उठवावे लागले असते. हा तर आपोआपच जागा होतो ना!
दुसऱ्यांना तर म्हणतील, 'भाऊ शांत रहा, तो मुलगा तर मेला, आता शांत रहा.' आणि जेव्हा स्वतःचा मुलगा मरतो तेव्हा?! स्वत:चा मुलगा