________________
सत्य-असत्याचे रहस्य
दादाश्री : सर्वत्र ब्रह्मही नाही आणि प्रतिभासित सत्यही नाही. हे जग तर रिलेटिव सत्य आहे. ही बायको, हे प्रतिभासित सत्य आहे का? असे... खांद्यावर हात ठेवून चित्रपट बघायला जातात ना! एखादे मूल पण सोबत असते. म्हणजे हे रिलेटिव सत्य आहे, ही काही थाप नाही. प्रतिभासित नाही हे. प्रतिभासित तर कोणास म्हणतात? की आपण तलावात पाहिले आणि त्यात आपले तोंड दिसते हे प्रतिभासित म्हटले जाते. हे तर भ्रांतीच्या डोळ्यांनी सर्वकाही दिसते आणि ते अगदीच खोटेही नाही. व्यवहार आहे. व्यवहाराने हे सत्य आहे आणि आत्मा रियल सत्य आहे. हा सगळा व्यवहार रिलेटिव सत्य आहे. म्हणजे हे जे दिसते ती भ्रांती नाही, हे मृगजळ नाही. तुम्ही आत्मा आहात हे रियल सत्य आहे, हे सनातन आहे.
मिथ्या मानले तर भगवंताची भक्ति होईल का? मग तर ती भक्ति सुद्धा मिथ्या झाली(!) म्हणजे जगत् मिथ्या ही गोष्टच खोटी आहे. लोक चुकीचे समजले आहेत. त्यांना अचूक समज दिली पाहिजे ना? हेही सत्य आहे, पण ते रिलेटिव सत्य आहे.
प्रश्नकर्ता : म्हणतात ना की संपूर्ण जग जरी सोन्याचे झाले, पण आमच्यासाठी तर ते तृणवत् (गवतासमान) आहे ?! ।
दादाश्री : तृणवत तर खरे. पण तृणवत् ही वेगळी स्थिती आहे. प्रश्नकर्ता : संपूर्ण जग खरकट्यासारखे आहे असे म्हटले आहे
ना
दादाश्री : खरखट्यासारखे, तेही अमक्या परिस्थितीत. जगास खरखट्यासारखेही म्हणता येणार नाही. जगास आम्ही जसे आहे तसेच म्हणतो.
एक मनुष्य मला म्हणाला की, 'तुम्ही या जगाला रिलेटिव सत्य का म्हणता? पूर्वीच्या शास्त्रकारांनी या जगाला मिथ्या म्हटले आहे ना!' त्यावर मी म्हणालो, हे जे मिथ्या म्हटले आहे ते साधु-आचार्यांसाठी म्हटले आहे, त्यागी लोकांसाठी म्हटले आहे. म्हणजे ते संसारी लोकांसाठी