________________
20
सत्य-असत्याचे रहस्य
विश्वातील सत् वस्तू....
आतापर्यंत जे जाणले होते ते लौकिक होते. लोकांनी मानलेले, त्यास लौकिक म्हणतात आणि जे वास्तविक आहे त्यास अलौकिक म्हणतात. मग तुम्हाला वास्तविक जाणून घ्यायचे आहे की लौकिक जाणून घ्यायचे आहे ?
प्रश्नकर्ता : वास्तविक.
दादाश्री : त्याचे असे आहे, सहा अविनाशी तत्वांनी हे जग बनलेले
आहे.
प्रश्नकर्ता : पण पाच तत्वे आहेत ना ?
दादाश्री : कोणकोणती ?
प्रश्नकर्ता: पृथ्वी, जल, आकाश, तेज आणि वायु.
दादाश्री : हे आकाश तत्व तर अविनाशी आहे आणि पृथ्वी, जल, वायु आणि तेज हे विनाशी आहेत. ही चार तत्वे मिळून एक तत्व तयार होते, ते तत्व पुन्हा अविनाशी आहे. ज्यास पुद्गल परमाणू म्हणतात, ते अविनाशी आहे आणि परमाणू रुपी आहे. म्हणजे ही जी चार तत्वे, पृथ्वी, जल, वायु आणि तेज आहेत, ते रुपी आहेत. म्हणजे तुम्ही जी पाच तत्वे सांगितली ना, ते तर दोनच तत्वे आहेत. या जगात ही पाच तत्वे मानली जातात आणि आत्म्याला सहावे तत्व मानले जाते, पण असे नाही. जर असे असते तर मग सगळा निकाल केव्हाच होऊन गेला असता.
प्रश्नकर्ता : म्हणजे आपला असा अभिप्राय आहे की विश्वात मूळ सहा तत्वे आहेत!
दादाश्री : हो, सहा तत्वे आहेत आणि हे जगत् सहा तत्वांनीच बनलेले आहे. ही अंतिम गोष्ट सांगतो. यात डोकं चालवण्यासारखे नाही. ही बुद्धिची पण गोष्ट नाही. ही बुद्धिच्याही पलीकडची गोष्ट आहे, म्हणजे ही चर्चेची गोष्ट नाही. हे कायमस्वरुपी, परमनन्ट लिहून घ्यायचे असेल तर लिहू शकतो. त्यात काहीच हरकत नाही, दुसऱ्या साऱ्या विकल्पी गोष्टी आहेत