________________
सत्य-असत्याचे रहस्य
आणि तेही ज्याने इथपर्यंत पाहिले तर इथपर्यंतचे लिहीले गेले, आणि कोणी त्याच्याही पुढचे पाहिले तर तिथपर्यंतचे लिहीले गेले. पण हे तर (दादाश्रींचे) संपूर्ण पाहिल्यानंतरचे दर्शन आहे आणि हे वीतरागांचे दर्शन आहे!
महाव्रतही व्यवहार सत्यच प्रश्नकर्ता : शास्त्रकारांनी सत्याला महाव्रतात धरले आहे ना! तर ते सत्य कोणते आहे?
दादाश्री : ते व्यवहार सत्य! निश्चयाने सर्व चुकीचे!!
प्रश्नकर्ता : तर सत्य महाव्रतात त्या लोकांनी कशाकशाचा समावेश केला आहे?
दादाश्री : जे सत्य मानले जाते त्याचा. असत्य तर लोकांना दुःखदायी होते.
संसारातील धर्म, नाही तो मोक्षाचा मार्ग असे आहे ना, की हे सत्य-असत्य ह्या वस्तुच मोक्षासाठी (कामाच्या) नाहीत. हे तर संसारमार्गात दाखविले की हे पुण्य आणि पाप, ही सर्व साधने आहेत. पुण्य कराल तर कधीतरी मोक्षमार्गाकडे वळू शकाल. मोक्षमार्गाकडे कसे वळू शकतो? घर बसल्या-बसल्या खायचे मिळाले तर मोक्षमार्गाकडे वळू शकेल ना? पूर्ण दिवस कष्ट करण्यातच घालवेल तर मोक्ष कसा मिळेल? म्हणून पुण्याची प्रशंसा केली आहे, ह्या लोकांनी. बाकी मोक्षमार्ग तर फार सरळ आहे, सहज आहे, सुगम आहे. संसारमार्ग म्हणजे नात्यांची साखळी आणि इथे मोक्षमार्गात नातीच नाहीत. 'नो रिलेशन'!!
प्रश्नकर्ता : तर ज्याने संसाराच्या सर्व प्रकारच्या धर्मांचे पालन केले असेल, त्यालाही मोक्षाची लिंक मिळू शकेल याची खात्री नाहीच ना?
दादाश्री : मोक्षाची तर गोष्टच करायची नाही! ह्या अज्ञानाच्या जेवढ्या स्लाइस पाडल्या त्या सर्व प्रकाशरुप नसतात. एक सुद्धा स्लाइस प्रकाश देणारी असते का?