________________
सत्य-असत्याचे रहस्य
आता त्या असतील ७८ वर्षांच्या, पण कोणी 'म्हातारी' म्हटलेले त्यांना आवडणार नाही. का? तर ते त्यांना अपमानासारखे वाटते. म्हणून आपण त्यांना 'आजी' म्हटले, की 'आजी या' तर त्यांना चांगले वाटेल आणि त्या खूष होतील, ‘काय भाऊ, पाणी हवे आहे का ? प्यायला पाणी देऊ का ?!' असे म्हणतील. म्हणजे पाणी - बीणी सर्व पाजेल.
हितकारी, तरच सत्य
तेव्हा त्याठिकाणी पुन्हा सावधानता ठेवायला सांगितली आहे. की सत्य हे फक्त प्रिय नाही पण समोरच्याला हितकारी पण असले पाहिजे. समोरच्याला फायदेकारक असले पाहिजे, तर सत्य मानले जाईल. हे तर असे लुटून घेणे, फसवणूक करणे, त्यास सत्य म्हटलेच जाणार नाही ना! म्हणजे फक्त सत्याने भागणार नाही. सत्य असले पाहिजे आणि ते समोरच्याला प्रिय देखील वाटले पाहिजे. समोरच्याला प्रिय वाटेल असा गुणाकार झाला पाहिजे. तसेच फक्त सत्य आणि प्रिय असूनही चालणार नाही, तर ते हितकारी पण असले पाहिजे.
33
समोरच्याला हितकारक होत नसेल तर ते काय कामाचे ? ! गावचा तलाव भरुन गेला असेल तर आपण मुलास सांगू की, 'बघ तलावात एक डाकीण राहते आणि ती खूप नुकसान करते...' असे काहीतरी सांगून आपण त्याला भीती दाखवली तर ते असत्य आहे, पण तरी देखील ते हितकारी आहे ना ? म्हणून ते सत्य मानले जाईल.
प्रश्नकर्ता : पण जे हितकारी असेल ते सामान्यतः समोरच्याला प्रिय वाटत नाही.
दादाश्री : आता ते हितकारी आहे की नाही, ही आपली मान्यता बहुतेक खोटी असते. आपण असेच मानत असतो की मी तर त्यांच्या हिताचेच सांगतो, तरीही ते माझे ऐकत नाहीत. अरे, हितकारी कुठून आणलेस? हितकारी हा शब्द कुठून आणलास तू ? हितकारी गोष्ट तर कशी असते? समोरच्या माणसाला मारले तरीही तो ऐकेल. म्हणजे समोरच्या माणसाला मारले तरीही तो हितकारी गोष्ट सांगण्याऱ्याचे ऐकेल