________________
मी कोण आहे ?
‘मी इन्कमटैक्स पेयर ( भरणारा) आहे' असे आपण सांगितले तर हे पण राँग बिलीफ. असे किती राँग बिलीफ बसले असतील?
'मी'चे स्थान परिवर्तन
'मी चन्दुलाल आहे' हा अहंकार आहे. कारण जेथे 'मी' नाही, येथे 'मी'चे रोपण केले, त्याचे नांव अहंकार.
४
प्रश्नकर्ता : 'मी चन्दुलाल आहे' यात अहंकार कोठे आला? 'मी असा आहे, मी तसा आहे' असे केले तर गोष्ट वेगळी आहे. पण सहजपणे हे सांगितले, त्यात अहंकार कोठे आला?
दादाश्री : सहजभावाने बोलले तर काय अहंकार निघून जातो? 'माझे नांव चन्दुलाल आहे' असे सहजभावाने बोललात तरी पण तो अहंकारच आहे. कारण आपण 'जे आहोत' हे जाणत नाही आणि 'जे नाही आहोत' त्याचे रोपण करतात, तो सगळा अहंकारच आहे ना!
4
'आपण चन्दुलाल आहात' हे ड्रामेटिक वस्तु आहे. अर्थात् 'मी चन्दुलाल आहे' असे बोलण्यास हरकत नाही पण 'मी चन्दुलाल आहे' ही बिलीफ नाही बसली पाहिजे.
प्रश्नकर्ता : हो, नाहीतर 'मी'चे पद आले.
दादाश्री : 'मी, ' 'मी'च्या जागेवर बसेल तर तो अहंकार नाही. पण 'मी' मूळ जागेवर नाही, आरोपित जागेवर आहे म्हणून अहंकार. आरोपित जागेवरून 'मी' बाजूला झाला आणि मूळ जागेवर बसला तर अहंकार गेला समजा. अर्थात् ‘मी' काढायचा नाही. 'मी'ला त्याच्या एक्झेक्ट प्लेसवर (यथार्थ स्थानावर) ठेवले पाहिजे.
'स्वतः 'ला स्वतःची ओळख नाही
हे तर अनंत जन्मापासून स्वतः 'स्वत: 'पासून गुप्त राहण्याचा प्रयत्न