________________
मी कोण आहे?
सांगतात कि हे उलटे (चुकीचे) सोडा आणि सुलट (बरोबर) करा. नेहमी सगळ्यांनी हेच सांगितले, त्याचे नांव क्रमिक मार्ग. क्रम म्हणजे सर्व सोडायला सांगणे, कपट-लोभ सोडा आणि चांगले करा. हेच आपण पाहिले ना आजपर्यंत? आणि हे अक्रम म्हणजे, करायचे नाही, करोमिकरोसि-करोति नाही. खिसा कापल्यानंतर अक्रम मध्ये सांगणार, 'त्याने कापला नाही आणि माझा कापला गेला नाही' आणि क्रममध्ये असे सांगतात कि, 'त्याने कापले आणि माझे कापले गेले.'
हे अक्रम विज्ञान लॉटरी सारखे आहे. लॉटरीमध्ये इनाम मिळते, त्यात त्याने काही श्रम केले होते? रूपया त्याने पण दिला होता आणि इतरांनी सुद्धा दिला होता, पण त्याचे चालले, असे हे अक्रम विज्ञान, लगेचच मोक्ष देते, रोखच !
अक्रम ने मूलगामी परिवर्तन! अक्रम विज्ञान तर खूपच अजब आश्चर्य म्हणतात. इथे 'आत्मज्ञान' घेतल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मनुष्यात परिवर्तन होते. हे ऐकताच लोकं ह्या विज्ञानाचा स्वीकार करतात आणि इथे आकर्षित होऊन येतात.
अक्रम मार्ग, विश्वभरात! हा संयोग तर खूपच उच्च कोटीचा बनला आहे. असे दुसऱ्या कुठल्या ही जागी झालेले नाही. एकच मनुष्य, ‘दादाश्री' एकटेच कार्य करू शकले, दुसरे कोणी नाही करू शकणार.
प्रश्नकर्ता : नंतर पण दादाजींची कृपा राहिल ना? आपल्या नंतर काय होईल?
दादाश्री : हा मार्ग तर चालू राहणार. माझी इच्छा आहे कि कोणी तरी तयार व्हावे, नंतर मार्ग चालविणारा पाहिजे ना?
प्रश्नकर्ता : पाहिजे.