________________
मी कोण आहे?
____३१
लिहीणार नाही. इथे आला आहात तर आपल्याला सांगू कि, 'भाऊ, लाभ उठवा.' इतकेच सांगू आपल्याला. हजारो सालात असे विज्ञान प्रकट झालेले नाही आहे. म्हणून मी सांगतो कि नंतर जे पण व्हायचे ते होवो, पण हे काम काढून घेण्यासारखे आहे.
(९) 'ज्ञानी पुरुष' कोण?
संत पुरुष : ज्ञानी पुरुष प्रश्नकर्ता : हे जे संत होऊन गेले सगळे, त्यांच्यात आणि ज्ञानी मध्ये किती अंतर?
दादाश्री : संत कोणाचे नांव, कि जो वाईट गोष्टी सोडवतो आणि चांगल्या शिकवतो. वाईट करणे सोडवतो आणि चांगले करणे शिकवतो, त्यांचे नांव संत.
प्रश्नकर्ता : अर्थात् पापकर्मापासून वाचवतात ते संत?
दादाश्री : हो, पापकर्मापासून वाचवतात ते संत पण पाप-पुण्य, दोन्ही पासून वाचवतात, त्याचे नांव ज्ञानी पुरुष.
संत पुरुष सत्य मार्गावर चढवतात आणि ज्ञानी पुरुष मुक्ति देतात. संताना पथिक म्हणतात. पथिक म्हणजे ते स्वतः चालतात आणि दुसऱ्यां पथिकांना सांगतात. 'चला, तुम्ही माझ्या बरोबर.' आणि ज्ञानी पुरुषाला शेवटचे स्टेशन म्हणतात, तिथे तर आपले (मोक्षाचे) कामच होऊन जाते.
खरा, अगदी खरा संत कोण? जो ममतारहित असेल ते. आणि जे दूसरे आहेत, ते थोडे फार ममतावाले असतात. आणि सच्चा ज्ञानी कोण? ज्याला अहंकार आणि ममता दोन्ही नसते. म्हणून संताना ज्ञानी पुरुष नाही म्हणता येत. संताना आत्मज्ञान नसते. हे संत पण जेव्हा ज्ञानी पुरुषांना भेटतील तेव्हा त्यांचा मार्ग निघेल. संताना ही याची आवश्यकता