________________
मी कोण आहे?
३७
प्रश्नकर्ता : परत जागृत होईल.
दादाश्री : असा हाही दूसरा, बाहेरचा परिणाम आहे. मी विचारले कि खरोखर आपण चन्दुभाई आहात कि शुद्धात्मा आहात? तेव्हा आपण म्हणतात 'शुद्धात्मा'. दूसऱ्या दिवशी आपल्याला विचारले कि, 'आपण वास्तवात कोण आहात?' तेव्हा आपण म्हणता कि 'शुद्धात्मा'. पाच दिवस मी विचारत राहतो. त्याच्या नंतर मी समजतो कि आपल्या मोक्षाची चावी माझ्याकडे आहे.
आले अपूर्व भान! श्रीमंद राजचंद्र जी काय सांगतात कि,
'सद्गुरु के उपदेश से आया अपूर्व भान,
निजपद निज मांही मिला, दूर भया अज्ञान.' ह्या पूर्वी, देहाध्यासाचे च भान होते. पूर्वी देहाध्यास रहित भान आम्हाला नव्हते. ते अपूर्व भान, आत्म्याचे भान आम्हाला झाले. जे स्वत:चे निजपद होते कि 'मी चन्दुभाई आहे' असे बोलत होतो, तो 'मी' आज निज मांही बसला. जे निजपद होते, ते निजमध्ये बसले आणि जे अज्ञान होते, 'मी चन्दुलाल आहे' हे अज्ञान दूर झाले.
याला देहाध्यास म्हणतात! जग देहाध्यासातून मुक्त नाही होऊ शकत आणि आपल्या स्वरूपात नाही राहू शकत. आपण स्वरूपात राहता म्हणजे अहंकार गेला, ममता गेली. 'मी चन्दुभाई आहे' ह्याला देहध्यास म्हणतात आणि 'मी शुद्धात्मा आहे' हे लक्ष झाले, तेव्हापासून कुठल्या ही प्रकारचा अध्यास नाही राहिला. आता काही राहिले नाही. तरीपण भूलचूक झाल्यावर थोडी घुसमट होते.
शुद्धात्मा पद शुद्धच! हे (आत्म) ज्ञान घेतल्यानंतर पूर्वी जो भ्रम होता कि 'मी करतो'