Book Title: Mi Kon Mahe
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 55
________________ निष्पक्षपाती शासन देव - देवींना अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार करीत आहे. (५) चोवीस तीर्थंकर भगवंतांना अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार करीत आहे. (५) 'श्रीकृष्ण भगवानां'ना अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार करीत आहे. (५) भरतक्षेत्रात सद्या विचरत असणारे सर्वज्ञ ' श्री दादा भगवानां' ना निश्चयाने अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार करीत आहे. (५) ‘दादा भगवानां' च्या सर्व समकितधारी महात्मांना अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार करीत आहे. (५) संपूर्ण ब्रह्मांडच्या जीवमात्रच्या 'रियल' स्वरूपला अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार करीत आहे. (५) ‘रियल’ स्वरूप हे भगवत स्वरूप आहे तेव्हा संपूर्ण जगा ला ‘भगवत स्वरूपात' दर्शन करीत आहे. (५) 'रियल' स्वरूप हे शुद्धात्मा स्वरूप आहे, तेंव्हा संपूर्ण जगा ला शुद्धात्मा स्वरूपात दर्शन करीत आहे. (५) 'रियल' स्वरूप हे तत्त्व स्वरूप आहे, तेंव्हा संपूर्ण जगा ला तत्त्वज्ञानाने दर्शन करीत आहे. (५) (वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामींना परम पूज्य 'दादा भगवानां' च्या माध्यमातून प्रत्यक्ष नमस्कार पोहचतो. कंसात लिहलेल्या संख्या आहेत तेवढे वेळा दिवसातून एकदा वाचायचे.) शुद्धात्मा प्रति प्रार्थना हे अंतर्यामी परमात्मा ! आपण प्रत्येक जीवमात्र मध्ये विराजमान आहात, तसेच माझ्यामध्ये पण विराजमान आहात, आपले स्वरूप हेच माझे स्वरूप आहे, माझे स्वरूप शुद्धात्मा आहे. हे शुद्धात्मा भगवान ! मी आपल्याला अभेदभावे अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार करीत आहे.

Loading...

Page Navigation
1 ... 53 54 55 56 57 58 59 60 61 62