________________
४४
मी कोण आहे?
झाल्याशिवाय रहात नाही. आमच्या या पाच वाक्यात राहिलात तर पोहोचाल. आम्ही निरंतर पाच वाक्यातच राहतो आणि आम्ही ज्याच्यात राहतो तीच 'दशा' आपल्याला दिली आहे. आज्ञेत राहिलात तर काम होईल. स्वत:च्या समजुतीने लाख जन्म डोके फोडले तरी काही होणार नाही. हे तर आज्ञा सुद्धा स्वत:च्या अक्कलेने पाळतात आणि आज्ञा समजतात स्वत:च्याच समजुतीने. म्हणून तिथे पण थोडे थोडे लिकेज होत रहाते. तरीपण आज्ञा पालनच्या मागे त्याचे स्वतःचे भाव तर असेच आहेत कि 'आज्ञा पाळायची आहे' म्हणून जागृति हवी.
आज्ञा पालन करायला विसरलात तर प्रतिक्रमण करा. मनुष्य आहे, तर विसरणार. पण विसरल्यानंतर प्रतिक्रमण कर कि 'हे दादाजी, हे दोन तास विसरलो, आपली आज्ञा विसरलो. पण मला तर आज्ञा पालन करायचीच आहे, मला क्षमा करा.' तर मागचे सारे माफ. शंभरा पैकी शंभर मार्क पूरे. मग त्याची जिम्मेदारी नाही राहिली. आज्ञेत आले तर त्याला सारी दुनिया नाही स्पर्श करू शकत. आमच्या आज्ञेचे पालन करण्यामुळे आपल्याला काही स्पर्श नाही करणार. तर आज्ञा देणाऱ्याला चिकटणार? नाही, कारण परहेतु साठी आहे. म्हणून त्याला स्पर्शणार नाही आणि डिझॉल्व होऊन जाईल.
ही तर आहे भगवानची आज्ञा!!!
दादाजींच्या आज्ञेचे पालन करणे म्हणजे ती 'ए.एम.पटेल' ची आज्ञा नाही आहे. स्वतः 'दादा भगवान'ची जे चौदालोकांचे नाथ आहेत. त्यांची आज्ञा आहे. त्याची गॅरंटी देत आहे. हे तर माझ्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी निघल्या आहेत. म्हणून आपल्याला त्या आज्ञांचे पालन करायचे आहे. 'माझी आज्ञा' नाही आहे, ही दादा भगवानांची आज्ञा आहे. मी पण त्या भगवानांच्या आज्ञेत राहतो ना !
- जय सच्चिदानंद