________________
मी कोण आहे ?
मार्ग आहे हा. आमच्या आज्ञेत रहा. आज्ञाच धर्म आणि आज्ञाच तप ! समभावाने निकाल (निपटारा ) करायला हवा. त्या ज्या आज्ञा सांगितल्या आहेत, त्यात जितके रहाता येइल तितके रहावे, पूर्ण रूपाने राहिलात तर भगवान महावीरच्या दशेत राहू शकतात. आपण 'रियल' आणि 'रिलेटिव' बघत जा, तेव्हा आपले चित्त दुसऱ्या जागी नाही भटकणार. पण त्या वेळेला मनातून काही निघाले तर आपण गोंधळात पडतो.
(१३) पाच आज्ञांची महत्वता !
'ज्ञान' पश्चात कुठली साधना ?
प्रश्नकर्ता : या ज्ञानानंतर आता कुठल्या प्रकारची साधना करायला
४२
हवी?
दादाश्री : साधना तर, ह्या पाच आज्ञाचे पालन करतात ना तीच ! आता आणखीन कुठली साधना नाही. दुसरी साधना बंधनकर्ता आहे. या पाच आज्ञा सोडवणाऱ्या आहेत.
समाधी वर्तवतात, अशी आज्ञा !
प्रश्नकर्ता : या ज्या पाच आज्ञा आहेत, याच्या व्यतिरिक्त आणि काही आहे?
दादाश्री : पाच आज्ञा आपल्यासाठी एक कुंपण आहे, तुमच्यासाठी. कारण आत आपला माल कोणी चोरू नाही शकणार. हे कुंपण ठेवल्यामुळे आपल्या आत, आम्ही जे दिले आहे ते एक्झेक्ट, तिथल्या तिथे राहिल, आणि कुंपण कमजोर झाले तर कोणी आत घुसून बिघडवले. तेव्हा परत मला रिपेर करायला यावे लागेल. म्हणून या पाच आज्ञांमध्ये रहाल तोपर्यंत निरंतर समाधीची आम्ही गॅरंटी देतो.
मी पाच वाक्य आपल्या प्रोटेक्शनसाठी देतो. हे ज्ञान तर मी आपल्याला दिले आणि भेदज्ञानाने वेगळेपण केले. पण आता ते वेगळेच