________________
मी कोण आहे?
____४१
तर, त्यानेच सारे काम होऊन जाईल. प्रत्येक जन्मात बायको मुलांशिवाय दुसरे काही असतच नाही ना.
भगवानने सांगितले कि ज्ञानी पुरुषां कडून सम्यक्त्व प्राप्त झाल्यानंतर ज्ञानी पुरुषाच्या मागेच लागा.
प्रश्नकर्ता : कुठल्या अर्थाने मागे लागून रहायचे?
दादाश्री : मागे लागून रहा म्हणजे हे ज्ञान मिळाल्यानंतर दुसरे काही आराधन करायचे नसते, पण, हे तर आम्ही जाणतो कि हे अक्रम आहे. हे लोक अनेक ‘फाईली' घेऊन आले आहेत. म्हणून आपल्याला फाईलींसाठी मोकळे ठेवले आहे, पण याचा अर्थ असा नाही आहे कि कार्य पूरे झाले. आज-काल फाईली खूप आहेत, म्हणून तुम्हाला माझ्या जवळ ठेवले तर तुमची ‘फाईली' बोलवायला येतील. म्हणून सूट दिली आहे कि घरी जाऊन फाईलींचा समभावाने निकाल (निपटारा) करा. नाहीतर मग ज्ञानीच्या जवळच पडून रहायला पाहिजे.
बाकी, आमच्याकडून जर पूर्ण रूपाने लाभ नाही घेतला जात, तर हे रात्रं-दिवस खटकायला पाहिजे. भले ही फाईली आहेत, पण ज्ञानी पुरुषांने सांगितले आहे ना, आज्ञा दिली आहे ना कि फाईलींचा समभावाने निकाल करा, ही आज्ञा च धर्म आहे ना? हा तर आमचा धर्म आहे. पण हे खटकत राहिले पाहिजे कि अशा फाईली कमी झाल्या तर मी लाभ उठवू शकेन.
त्याला तर महाविदेह क्षेत्र समोर येणार! ज्याला शुद्धात्माचे लक्ष बसले आहे, तो इथे भरतक्षेत्र मध्ये राहू शकतच नाही. इथे ज्याला आत्म्याचे लक्ष बसले आहे, तो महाविदेह क्षेत्र मध्ये पोहोचणार असा नियम आहे. इथे या दुषमकालात राहूच शकत नाही. हे शुद्धात्माचे लक्ष बसले आहे, तो महाविदेह क्षेत्रात एक जन्म अथवा दोन जन्म करून, तीर्थंकरांचे दर्शन घेऊन मोक्ष प्राप्ति करणार असा सोपा, सरळ