________________
मी कोण आहे?
चेतावतो. तेथे (क्रमिकमध्ये) तर आम्हाला करायला लागेल आणि इथे (अक्रममध्ये) आतुनच चेतावतो.
प्रश्नकर्ता : आता आतून चेतावनी मिळते हा अनुभव झाला आहे.
दादाश्री : आता आम्हाला हा मार्ग मिळाला आहे आणि शुद्धात्माची जी बाउन्ड्री (सीमा-रेखा) आहे. त्याच्या पहिल्या दरवाज्यात प्रवेश मिळाला आहे. जेथून कोणी बाहेर नाही काढू शकणार. कोणाला परत बाहेर काढायचा अधिकार नाही आहे, अशा जागेवर आपण प्रवेश घेतला आहे.
नेहमी नेहमी सचेत कोण करते? प्रज्ञा. ज्ञान प्राप्ति शिवाय प्रज्ञाची सुरूवात होत नाही. किंवा सम्यक्त्व प्राप्त झाले तर प्रज्ञाची सुरूवात होते सम्यक्त्व मध्ये प्रज्ञाची सुरुवात कशी होते? द्वितीयेच्या चंद्रासारखी सुरूवात होते. पण आपल्या इथे तर पूर्ण प्रज्ञा उत्पन्न होते. फुल (पूर्ण) प्रज्ञा, म्हणजे ती मोक्षात जाण्यासाठीच चेतावते. भरतराजाला चेतवण्यासाठी तर, नोकर ठेवावे लागत होते. जे दर पंधरा मिनिटाला आवाज देत कि, 'भरतराजा, चेत, चेत, चेत!!!' तीन वेळा आवाज देत. बघा, आपल्याला तर आतूनच प्रज्ञा चेतावनी देते. प्रज्ञा निरंतर चेतावते कि, 'हे, असे नाही.' सारा दिवस चेतवत राहते आणि हाच आत्माचा अनुभव, निरंतर, पूर्ण दिवसच आत्म्याचा अनुभव.
अनुभव आत असणारच ! ज्या दिवशी ज्ञान देतात, त्या रात्रीचा जो अनुभव आहे, तो जात नाही. कशाप्रकारे जाईल मग? आम्ही ज्या दिवशी ज्ञान दिले होते ना, त्या रात्री जो अनुभव होता तो नेहमीसाठी आहे. पण पुन्हा आपली कर्म घेरतात. पूर्वकर्म, जे भोगायचे बाकी आहे, ते 'मागणारे' घेरतात, त्यांचे मी काय करू?
प्रश्नकर्ता : दादाजी, पण आता इतके भोगायला नाही लागत. दादाश्री : ते लागत नाही ही वेगळी गोष्ट आहे, पण मागणारे