________________
४०
मी कोण आहे?
(कर्म) अधिक असतील, तर त्यांना अधिक घेरतात. पाच वाल्यांना पाच, दोन वाल्यांना दो आणि वीस वाल्यांना वीस. मी तर आपल्याला शुद्धात्मा पदावर बसवले आहे, पण परत मागणारे दुसऱ्या दिवशी आले तर थोडे सफोकेशन होईल.
आता राहिले काय बाकी? ते क्रमिक विज्ञान आहे आणि हे अक्रम विज्ञान आहे. हे ज्ञान तर वीतराग भगवानांचे आहे. ज्ञानात फरक नाही. आम्ही ज्ञान दिल्यानंतर, आपल्याला आत्म अनुभव झाल्यानंतर, काय काम बाकी राहते? तर ज्ञानी पुरुषांच्या आज्ञेचे पालन. 'आज्ञा' हाच धर्म आणि 'आज्ञा' हेच तप. आणि आमची आज्ञा संसारात जराही बाधक नाही होत. संसारात राहून संसाराचा परिणाम नाही होत. असे हे अक्रम विज्ञान आहे.
बाकी जर एक अवतारी व्हायचे असेल तर आमच्या सांगण्या प्रमाणे आज्ञेत चाला. तर हे विज्ञान एक अवतारी आहे. हे विज्ञान आहे तरीपण इथून (भरत क्षेत्रातून) सरळ मोक्षाला जाऊ शकाल असे नाही आहे.
मोक्षमार्गात, आज्ञा हाच धर्म ... ज्याला मोक्षाला जायचे आहे, त्याला क्रियेची गरज नाही, ज्याला देवगतित जायचे आहे, भौतिक सुखांची कामना आहे, त्याना क्रियेची गरज आहे. मोक्षाला जायचे असेल. त्याला ज्ञान आणि ज्ञानीची आज्ञा, या दोघांचीच गरज आहे.
मोक्षमार्गात तप-त्याग काही ही करावे लागत नाही. केवळ ज्ञानी पुरुष मिळाले तर ज्ञानीची आज्ञाच धर्म आणि आज्ञाच तप आणि हेच ज्ञान, दर्शन, चारित्र आणि तप आहे, ज्याचे प्रत्यक्ष फळ मोक्ष आहे.
'ज्ञानी'च्या जवळ रहा! ज्ञानी वर कधी प्रेमभाव नाही आला. जर ज्ञानी वर प्रेमभाव आला