Page #1
--------------------------------------------------------------------------
________________
दादा भगवान प्ररूपित
मी कोण आहे
स्वतः स्वतःपासून'च अनोळखी कधीपर्यंत राहणार? 'स्वतःकोण आहे' हेच जाणून घेण्याची आवश्यकता आहे.
Page #2
--------------------------------------------------------------------------
________________
दादा भगवान कथित
मी कोण आहे?
मूळ गुजराती संकलन : डॉ. नीरूबेन अमीन अनुवाद : महात्मागण
Page #3
--------------------------------------------------------------------------
________________
प्रकाशक : श्री अजीत सी. पटेल
दादा भगवान आराधना ट्रस्ट 5, ममतापार्क सोसायटी, नवगुजरात कॉलेज के पीछे, उस्मानपुरा, अहमदाबाद - ३८० ०१४, गुजरात. फोन - (०७९) २७५४०४०८
All Rights reserved - Deepakbhai Desai Trimandir, Simandhar City, Ahmedabad-Kalol Highway, Adalaj, Dist.-Gandhinagar-382421, Gujarat, India. No part of this book may be used or reproduced in any manner whatsoever without written permission from the holder of the copyrights.
प्रथम आवृत्ति : रीप्रिन्ट नयी रीप्रिन्ट :
१५०० ९५०० ३०००
मई २००८ अगस्त ०९ से अक्तुबर १३ मई २०१४
भाव मूल्य : ‘परम विनय' आणि
'मी काहीच जाणत नाही', हा भाव! द्रव्य मूल्य : १० रुपये
मुद्रक
: अंबा ओफसेट
पार्श्वनाथ चैम्बर्स, नये रिजर्व बैंक के पास, इन्कमटैक्स, अहमदाबाद-३८० ०१४. फोन : (०७९) २७५४२९६४
Page #4
--------------------------------------------------------------------------
________________
त्रिमंत्र
વર્તમાનતીર્થંકર
શ્રીસીમંધરસ્વામી
नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं
नमो आयरियाणं
नमो उवज्झायाणं नमो लोए सव्वसाहूणं एसो पंच नमुक्कारो,
सव्व पावप्पणासणो
मंगलाणं च सव्वेसिं,
पढमं हवइ मंगलम् १
ॐ नमो भगवते वासुदेवाय २ ॐ नमः शिवाय ३ जय सच्चिदानंद
Page #5
--------------------------------------------------------------------------
________________
(दादा भगवान फाउन्डेशनची प्रकाशित पुस्तके)
मराठी
१. भोगतो त्याची चुक
६. क्रोध २. एडजेस्ट एवरीव्हेर
७. चिंता ३. जे घडले तोच न्याय
८. प्रतिक्रमण ४. संघर्ष टाळा
९. भावना सुधारे जन्मोजन्म ५. मी कोण आहे?
हिन्दी १. ज्ञानी पुरुष की पहचान
२२. समझ से प्राप्त ब्रह्मचर्य २. सर्व दुःखों से मुक्ति
२३. दान ३. कर्म का सिद्धांत
२४. मानव धर्म ४. आत्मबोध
२५. सेवा-परोपकार ५. मैं कौन हूँ?
२६. मृत्यु समय, पहले और पश्चात ६. वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी २७. निजदोष दर्शन से... निर्दोष ७. भुगते उसी की भूल
२८. पति-पत्नी का दिव्य व्यवहार ८. एडजस्ट एवरीव्हेयर
२९. क्लेश रहित जीवन ९. टकराव टालिए
३०. गुरु-शिष्य १०. हुआ सो न्याय
३१. अहिंसा ११. चिंता
३२. सत्य-असत्य के रहस्य १२. क्रोध
३३. चमत्कार १३. प्रतिक्रमण
३४. पाप-पुण्य १४. दादा भगवान कौन?
३५. वाणी, व्यवहार में... १५. पैसों का व्यवहार
३६. कर्म का विज्ञान १६. अंत:करण का स्वरूप
३७. आप्तवाणी - १ १७. जगत कर्ता कौन?
३८. आप्तवाणी - ३ १८. त्रिमंत्र
३९. आप्तवाणी - ४ १९. भावना से सुधरे जन्मोजन्म ४०. आप्तवाणी - ५ २०. प्रेम
४१. आप्तवाणी - ६ २१. माता-पिता और बच्चों का व्यवहार ४२. आप्तवाणी - ८
दादा भगवान फाउन्डेशन च्या द्वारे गुजराती आणि अंग्रजी भाषे मध्ये सुद्धा बरीच पुस्तके प्रकाशित झाली आहे। वेबसाइट www.dadabhagwan.org वर सुद्धा आपण ही सगळी पुस्तके प्राप्त करू शकता। प्रत्येक महिन्यात हिन्दी, गुजराती आणि अंग्रेजी भाषेत दादावाणी मेगेझीन प्रकाशित करीत आहे।
Page #6
--------------------------------------------------------------------------
________________
दादा भगवान कोण? जून १९५८ संध्याकाळची अंदाजे सहाची वेळ, सुरत स्टेशनावर अलोट गर्दी होती. प्लेटफार्म नंबर तीनच्या रेल्वेच्या बाकावर बसलेले श्री. अंबालाल मुळजीभाई पटेल रुपी देहमंदिरात नैसर्गिक स्वरूपात कित्येक जन्मापासून व्यक्त होण्यासाठी आतूर असलेले 'दादा भगवान' संपूर्णपणे प्रगट झाले आणि निसर्गाने सर्जन केले अध्यात्माचे अद्भुत आश्चर्य! एक तासात विश्वदर्शन लाभले! आपण कोण? भगवान कोण? जग कोण चालवत आहे? कर्म म्हणजे काय? मुक्ती कशाला म्हणतात? इत्यादी जगातील सर्व आध्यात्मिक प्रश्नांचे संपूर्ण निराकरण केले! आणि जगातील सर्व अध्यात्मिक प्रश्नांचा संपूर्ण उलगडा झाला. अशा प्रकारे निसर्गाने विश्वला प्रदान केले एक अद्वितीय, पूर्ण दर्शन आणि ह्याचे माध्यम बनले अंबालाल मूळजीभाई पटेल, जे होते गुजरातचे चरोतर जिल्ह्यातील भादरण गावचे पाटील, कंट्राक्टचा व्यवसाय करणारे आणि तरी ही पूर्ण वीतराग पुरुष.
त्यांना ज्ञान प्राप्ति झाली त्याच प्रमाणे ते फक्त दोन तासात इतर मुमुक्षुनां सुद्धा आत्मज्ञान प्राप्ति करून देत होते, त्यांच्या सिद्ध झालेल्या अद्भूत ज्ञान प्रयोग द्वारा. त्याला अक्रम (क्रमविरहीत) मार्ग म्हणतात. अक्रम म्हणजे क्रमाशिवायचा आणि क्रम म्हणजे पायरी पायरीने, क्रमाक्रमाने वर चढण्याचे ! अक्रम म्हणजे लिफ्ट मार्ग ! शॉर्ट कट !!
ते स्वतः प्रत्येकाला 'दादा भगवान कोण?' ह्याबदलची फोड करून सांगताना म्हणायचे कि, 'हे दिसतात ते 'दादा भगवान' नाहीत। हे तर ए.एम. पटेल आहे. आम्ही ज्ञानीपुरुष आहोत आणि आत प्रगट झाले आहेत ते दादा भगवान आहेत । ते चौदलोकचे नाथ आहेत, ते तुमच्यात पण आहेत, सर्वांमध्ये आहेत! तुमच्यात अव्यक्त रुपात बसलेले आहेत आणि 'इथे' संपूर्णपणे व्यक्त झालेले आहेत! मी स्वतः परमेश्वर नाही। माझ्या आत प्रगट झालेले 'दादा भगवान' त्यांना मी पण नमस्कार करतो.'
व्यापारात धर्म असावा परंतु धर्मात व्यापार नसावा. ह्या सिद्धांताने ते संपूर्ण जीवन जगले. त्यांनी जीवनात कधीही कोणाकडून ही पैसे घेतले नाहीत, उलट स्वतःचा व्यवसायातून झालेल्या फायद्यातून भक्तांना यात्रा करवीत असत.
Page #7
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मज्ञान प्राप्तिची प्रत्यक्ष लींक
मी तर, काही लोकांनां माझ्या हातून सिद्धि प्राप्त करून देणार आहे. माझ्या नंतर कोणी तरी पाहिजे कि नाही ! नंतर लोकांना मार्ग (दाखविणारा) हवा कि नाही?
दादाश्री
परम पूज्य दादाश्रींना जे ज्ञान प्राप्त झाले, ते अद्भुत आत्मज्ञान, त्यांनी देश-विदेश परिभ्रमण करून, दुसऱ्या लोकांना सुद्धा दोन तासात प्राप्त करून दिले होते, त्याला ज्ञानविधि म्हणतात. दादाश्रींनी आपल्या जीवनकाळातच पूज्य डॉ. नीरूबहन अमीन (नीरूमा)ना आत्मज्ञान देण्याची ज्ञानसिद्धि प्रदान केली होती. दादाश्रींच्या देहविलय पश्चात् नीरूमा आता पर्यंत मुमुक्षुजनांना सत्संग आणि आत्मज्ञानाची प्राप्ति, निमित्तभावाने करत होत्या. त्याच बरोबर पूज्य दीपकभाईनां ही दादाश्रींनी सत्संग करण्याची सिद्धि प्रदान केली होती. पूज्य नीरूमांच्या उपस्थितीतच त्यांच्या आशीर्वादाने पूज्य दीपकभाई देश-विदेशात कितीतरी ठिकाणी जाऊन मुमुक्षूंना आत्मज्ञान प्राप्ति करून देत होते, जे पूज्य नीरूमांच्या देहविलय पश्चात् आज पण चालू आहे.
—
हे आत्मज्ञान प्राप्ति नंतर हजारो मुमुक्षु संसारात राहून, सर्व जबाबदाऱ्या सांभाळून सुद्धा मुक्त राहून आत्मरमणता चा अनुभव करत आहेत.
पुस्तकात लिहिलेली वाणी मोक्षार्थीला मार्ग दाखविण्याच्या हेतूने अत्यंत उपयोगी सिद्ध झाली आहे. परंतु मोक्ष प्राप्ति हेतू साठी आत्मज्ञान प्राप्त करणे जरुरी आहे. अक्रम मार्ग द्वारा आत्मज्ञानची प्राप्ति आज पण चालू आहे. त्यासाठी प्रत्यक्ष आत्मज्ञानीला भेटून आत्मज्ञानची प्राप्ति करेल तेव्हांच हे शक्य आहे. पेटलेला दिवाच दुसरा दिवा प्रज्वलित करू शकतो.
Page #8
--------------------------------------------------------------------------
________________
निवेदन आत्मज्ञानी श्री अंबालाल मुळजीभाई पटेल, ज्यांना सर्वजण 'दादा भगवान'च्या नावांनी ओळखतात. त्यांच्या श्रीमुखातून आत्मतत्त्व साठी जी वाणी निघाली, ती रेकोर्ड करून संकलन व संपादन करून ग्रंथाच्या रुपात प्रकाशित करण्यात आली आहे. ह्या पुस्तकात परम पूज्य दादा भगवानांच्या स्वमुखा ने निघालेल्या सरस्वतीचा मराठी अनुवाद केला आहे. सुज्ञ वाचकाने अध्ययन केल्या वर त्याला आत्मसाक्षात्कारची भूमिका निश्चित होते, असे कित्येकांचे अनुभव आहे.
ते 'दादा भगवान' तर त्यांच्या देहात असलेले परमात्माला म्हणत होते. शरीर हे परमात्मा होवू शकत नाही. कारण शरीर विनाशी आहे. परमात्मा तर अविनाशी आहे आणि जे प्रत्येक जीवमात्रच्या आत आहे.
प्रस्तुत अनुवाद मध्ये विशेष लक्ष ठेवलेले आहे कि प्रत्येक वाचकाला प्रत्यक्ष दादाजींची वाणीच, ऐकत आहोत असा अनुभव व्हावा.
ज्ञानींच्या वाणीला मराठी भाषेत यथार्थ रुपाने अनुवादित करायचा प्रयत्न केला आहे. परंतु दादाश्रींच्या आत्मज्ञानचा खरा उद्देश ‘जसा आहे तसा' आपल्याला गुजराती भाषेत अवगत होणार. ज्याला ज्ञानाचा गहन अर्थ समजायचा असेल, ज्ञानाचा खरा मर्म जाणायचा असेल, त्यांनी ह्या हेतूने गुजराती भाषा शिकावी, असा आमचा अनुरोध आहे.
अनुवाद संबंधी चूकांसाठी आपली क्षमा प्रार्थितो.
Page #9
--------------------------------------------------------------------------
________________
संपादकीय जीवनात जे काही समोर येते, त्याचे पूर्ण रूपाने रियलाइजेशन केल्याशिवाय मनुष्य त्याला आपलेसे करत नाही. सगळ्याचे रियलाइजेशन केले. मात्र 'सेल्फ' रियलाइजेशनच केले नाही. अनंत जन्मापासून 'मी कोण आहे?' त्याची ओळखच अडकलेली आहे, म्हणून तर या भटकंतीचा अंत होत नाही. त्यांची ओळख कशी होईल?
ज्याला स्वत:ची ओळख झाली आहे, तीच व्यक्ति अन्य व्यक्तिना सहजपणे ओळख करून देऊ शकते. अशी विभूती म्हणजे स्वयं 'ज्ञानी पुरुष'च! की ज्यांना या संसारात काहीही जाणणे, की काहीही करण्याचे बाकी राहिले नाही तेच। असे ज्ञानी पुरुष परम पूज्य दादाश्री, या काळात आमच्या मध्ये येउन, आमच्या भाषेत, आम्ही समजू शकतो अश्या सरळ भाषेत, प्रत्येकाचा मूळ प्रश्न 'मी कोण आहे' याचे उत्तर सहजतेने सोडवतात.
इतकेच नाही, परंतु हा संसार काय आहे? कशा प्रकारे चालत आहे? कर्ता कोण? भगवान काय आहेत? मोक्ष काय आहे? ज्ञानी पुरुष कोणाला म्हणतात? सीमंधर स्वामी कोण आहेत? संत, गुरु आणि ज्ञानी पुरुष यात काय फरक आहे? ज्ञानींना कशा प्रकारे ओळखायचे? ज्ञानी काय करू शकतात? आणि त्यातही परम पूज्य दादाश्रींचा अक्रम मार्ग काय आहे? क्रमा क्रमाने तर मोक्षमार्गावर अनंत जन्मापासून चढतच आलो आहोत, 'लिफ्ट' पण मोक्षमार्गात असू शकते ना?! अक्रम मार्गाने, या काळात. संसारात राहूनही मोक्ष आहे आणि मोक्ष कशा प्राप्त करावा याची पूर्ण समज आणि योग्य दिशेची प्राप्ति परम पूज्य दादाश्रींनी करून दिली आहे... ___मी कोण आहे' ह्याची ओळख झाल्यानंतर कशी अनुभूति राहते? तर संसारातील व्यवहार निभावत असतानाही संपूर्ण निर्लेप आत्मस्थितिच्या अनुभूती मध्ये राहू शकतो. आधि-व्याधि आणि उपाधि मध्येही निरंतर स्वसमाधि राहू शकते, असा अक्रम विज्ञानाच्या प्राप्ति नंतर हजारों महात्मांचा अनुभव आहे. या सगळ्याच्या प्राप्ति हेतू प्रस्तुत संकलन मोक्षार्थीसाठी मोक्षमार्गात दीपस्तंभ बनून राहिल हीच प्रार्थना.
- डॉ. नीरूबहन अमीन ह्यांचे जय सच्चिदानंद
Page #10
--------------------------------------------------------------------------
________________
मी कोण आहे?
(१) 'मी' कोण आहे?
वेगळे, नांव आणि 'स्वतः' दादाश्री : काय नांव आहे आपले? प्रश्नकर्ता : माझे नांव चन्दुलाल आहे. दादाश्री : खरोखर आपण चन्दुलाल आहात? प्रश्नकर्ता : हो.
दादाश्री : चन्दुलाल तर आपले नांव आहे. चन्दुलाल आपले नांव नाही का? आपण 'स्वतः' चन्दुलाल आहात कि आपले नांव चन्दुलाल आहे?
प्रश्नकर्ता : हे तर नांव आहे.
दादाश्री : हो, तर मग 'आपण' कोण? जर 'चन्दुलाल' आपले नांव आहे तर 'आपण' कोण आहात? आपले नांव आणि आपण वेगळे नाहीत का? 'आपण' नावापासून वेगळे आहात तर 'आपण' (स्वतः) कोण आहात? ही गोष्ट आपल्या लक्षात येत आहे ना, कि मी काय सांगू इच्छीत आहे? 'हा माझा चष्मा' सांगितले तर चष्मा आणि आम्ही वेगळे झालो ना? असेच तुम्ही सुद्धा नांवापासून वेगळे आहात, असे आता नाही वाटत? जसे
Page #11
--------------------------------------------------------------------------
________________
मी कोण आहे ?
कि दुकानाचे नांव ठेवतात 'जनरल ट्रेडर्स', तर तो काही गुन्हा नाही. पण त्याच्या शेठला आपण सांगू कि 'ऐ ! जनरल ट्रेडर्स, इकडे ये.' तर शेठ काय म्हणतील कि ‘माझे नांव तर जयंतीलाल आहे आणि 'जनरल ट्रेडर्स' तर माझ्या दुकानाचे नांव आहे.' अर्थात् दुकानाचे नांव वेगळे आणि शेठ त्यापासून वेगळे, माल वेगळा, सगळे वेगळे वेगळे असते ना? आपल्याला काय वाटते?
प्रश्नकर्ता : बरोबर आहे.
दादाश्री : परंतु येथे तर, 'नाही, मीच चन्दुलाल आहे' असे सांगाल, अर्थात् दुकानाचे बोर्ड पण मी, आणि शेठ पण मीच. आपण चन्दुलाल आहात, हे तर ओळखण्याचे साधन आहे.
परिणाम होतो, तर आत्मस्वरूप नाही
आपण चन्दुलाल बिलकुल नाही असे पण नाही. आपण आहात चन्दुलाल, पण ‘बाय रिलेटिव व्यू पोइन्ट' (व्यावहारिक दृष्टि)ने, यू आर चन्दुलाल इज करेक्ट.
प्रश्नकर्ता : मी तर आत्मा आहे, पण नांव चन्दुलाल आहे.
दादाश्री : हो, पण आता 'चन्दुलाल' ला कोणी शिवी दिली तर 'आपल्यावर' परिणाम होणार कि नाही?
प्रश्नकर्ता : परिणाम तर होणारच.
दादाश्री : तर मग आपण 'चन्दुलाल' आहात, 'आत्मा' नाही आहात. आत्मा असता तर आपल्यावर परिणाम नसता झाला, आणि परिणाम होतो, म्हणूनच आपण चन्दुलाल आहात.
चन्दुलालच्या नांवाने कोणी शिव्या दिल्या तर आपण त्याला पकडतो. चन्दुलालचे नांव घेऊन कोणी उलट-सुलट बोलले तर आपण
Page #12
--------------------------------------------------------------------------
________________
मी कोण आहे?
भिंतीला कान लावून ऐकतो. आम्ही सांगतो कि, 'भाऊ, भिंत आपल्याला काय सांगत आहे?' तेव्हा सांगता, 'नाही भिंत नाही, आंत माझी गोष्ट चालू आहे, ती मी ऐकत आहे. कोणाची गोष्ट चालू आहे?' तेव्हा सांगता, 'चन्दुलाल ची. अरे पण आपण चन्दुलाल नाही आहात.' जर आपण आत्मा आहात तर चन्दुलाल ची गोष्ट आपल्यावर नसती घेतली.
प्रश्नकर्ता : वास्तवात तर 'मी आत्माच आहे' ना?
दादाश्री : अजून तुम्ही आत्मा झालात नाही ना? चन्दुलालच आहात ना? 'मी चन्दुलाल आहे' हा आरोपितभाव आहे. आपल्याला 'मी चन्दुलाल आहे' अशी बिलीफ (मान्यता) घर करून राहिली आहे, ही राँग बिलीफ (चुकीची मान्यता) आहे.
(2) बिलीफ, राँग-राइट
किती साऱ्या [ग बिलीफ 'मी चंन्दुलाल आहे' ही आपली मान्यता, ही बिलीफ तर रात्री झोपेतही नाही हटत ना! मग लोक आपले लग्न करून आपल्याला सांगतात, 'तुम्ही तर या स्त्रीचे पति आहात' म्हणून आपण असे स्वामीत्व मानले. मग 'मी हीचा पति आहे, पति आहे' करत राहिले. कोणी नेहमीच पति असतो का? डायवोर्स झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तीचा पति राहिल का? अर्थात् ह्या सगळ्या राँग बिलीफ झालेल्या आहेत.
'मी चन्दुलाल आहे' ही राँग बिलीफ आहे. मग ‘ह्या स्त्रीचा पति आहे' ही दूसरी राँग बिलीफ, 'मी वैष्णव आहे ही तिसरी राँग बिलीफ'. 'मी वकील आहे' ही चौथी [ग बिलीफ, 'मी ह्या मुलाचा फादर (पिता)
आहे' ही पांचवी राँग बिलीफ. 'ह्याचा मामा आहे' ही सहावी राँग बिलीफ. 'मी गोरा आहे' ही सातवी राँग बिलीफ. 'मी पंचेचाळीस वर्षाचा आहे', ही आठवी राँग बिलीफ. 'मी ह्याचा भागीदार आहे' ही पण राँग बिलीफ.
Page #13
--------------------------------------------------------------------------
________________
मी कोण आहे ?
‘मी इन्कमटैक्स पेयर ( भरणारा) आहे' असे आपण सांगितले तर हे पण राँग बिलीफ. असे किती राँग बिलीफ बसले असतील?
'मी'चे स्थान परिवर्तन
'मी चन्दुलाल आहे' हा अहंकार आहे. कारण जेथे 'मी' नाही, येथे 'मी'चे रोपण केले, त्याचे नांव अहंकार.
४
प्रश्नकर्ता : 'मी चन्दुलाल आहे' यात अहंकार कोठे आला? 'मी असा आहे, मी तसा आहे' असे केले तर गोष्ट वेगळी आहे. पण सहजपणे हे सांगितले, त्यात अहंकार कोठे आला?
दादाश्री : सहजभावाने बोलले तर काय अहंकार निघून जातो? 'माझे नांव चन्दुलाल आहे' असे सहजभावाने बोललात तरी पण तो अहंकारच आहे. कारण आपण 'जे आहोत' हे जाणत नाही आणि 'जे नाही आहोत' त्याचे रोपण करतात, तो सगळा अहंकारच आहे ना!
4
'आपण चन्दुलाल आहात' हे ड्रामेटिक वस्तु आहे. अर्थात् 'मी चन्दुलाल आहे' असे बोलण्यास हरकत नाही पण 'मी चन्दुलाल आहे' ही बिलीफ नाही बसली पाहिजे.
प्रश्नकर्ता : हो, नाहीतर 'मी'चे पद आले.
दादाश्री : 'मी, ' 'मी'च्या जागेवर बसेल तर तो अहंकार नाही. पण 'मी' मूळ जागेवर नाही, आरोपित जागेवर आहे म्हणून अहंकार. आरोपित जागेवरून 'मी' बाजूला झाला आणि मूळ जागेवर बसला तर अहंकार गेला समजा. अर्थात् ‘मी' काढायचा नाही. 'मी'ला त्याच्या एक्झेक्ट प्लेसवर (यथार्थ स्थानावर) ठेवले पाहिजे.
'स्वतः 'ला स्वतःची ओळख नाही
हे तर अनंत जन्मापासून स्वतः 'स्वत: 'पासून गुप्त राहण्याचा प्रयत्न
Page #14
--------------------------------------------------------------------------
________________
मी कोण आहे?
आहे. स्वतः, 'स्वतः पासून गुप्त राहायचे आणि दुसऱ्यांचे सगळे काही जाणणे, हे अजबच आहे ना! स्वतः स्वत:पासून किती काळपर्यंत गुप्त राहणार? कधीपर्यंत राहणार? 'स्वतः कोण आहे' हे ओळखण्यासाठी च हा जन्म आहे. मनुष्य जन्म ह्यासाठीच आहे कि 'स्वतः कोण आहे' ह्याचा शोध घ्या. नाहीतर तोपर्यंत भटकत राहणार. 'मी कोण आहे' हे जाणावे लागेल ना? 'आपण स्वतः कोण आहोत' हे जाणावे लागेल कि नाही जाणावे लागणार? (३) 'I' आणि 'My' ला अलग करण्याचा प्रयोग
सेपरेट 'I' and 'My' आपल्याला सांगितले कि, सेपरेट 'I' and 'My' with सेपरेटर तर आपण 'I' आणि 'My'ला सेपरेट करू शकणार काय? 'I' आणि 'My'ला सेपरेट करायला हवे कि नाही? आणि हे कधी ना कधी जाणावे लागेल ना. सेपरेट 'I' आणि 'My', जसे दुधासाठी सेपरेटर असते ना, त्यातून मलई सेपरेट (वेगळी) करतात ना? असेच हे वेगळे करायचे
आहे.
आपल्याजवळ 'My' जशी कुठली गोष्ट आहे? 'I' एकटाच आहे कि 'My' बरोबर आहे?
प्रश्नकर्ता : 'My' बरोबर असणार ना. दादाश्री : काय काय 'My' आहे आपल्याजवळ? प्रश्नकर्ता : माझे घर आणि घरातील सगळ्या वस्तु.
दादाश्री : सर्व आपली म्हणणार? आणि वाईफ कोणाची म्हणणार?
प्रश्नकर्ता : ती पण माझी.
Page #15
--------------------------------------------------------------------------
________________
मी कोण आहे?
दादाश्री : आणि मुले कोणाची? प्रश्नकर्ता : ती पण माझी. दादाश्री : आणि हे घड्याळ कोणाचे? प्रश्नकर्ता : ते पण माझे. दादाश्री : आणि हे हात कोणाचे? प्रश्नकर्ता : हात पण माझे आहेत.
दादाश्री : मग माझे डोकं, माझे शरीर, माझे पाय, माझे कान, माझे डोळे असे सांगाल। या शरीराच्या साऱ्या वस्तुंना 'माझे' म्हणतात, तेव्हा 'माझे' म्हणणारे 'आपण' कोण आहात? ह्याचा विचार नाही केला? 'My' नेम इज चन्दुलाल' म्हणणार आणि मग बोलणार 'मी चन्दलाल आहे.' यात विरोधाभास नाही जाणवत?
प्रश्नकर्ता : जाणवत आहे.
दादाश्री : आपण चन्दुलाल आहात, पण याच्यात 'I' आणि 'My' दोन आहेत. हे 'I' आणि 'My' चे दोन रेल्वे लाईन वेगळ्याच असतात. परेललच असतात, कधी एकाकार (एकत्र) होतच नाहीत. तरीपण आपण एकाकार मानता, याला समजून यातून 'My' ला सेपरेट करा. आपल्यात जो 'My' आहे. त्याला एका बाजूला ठेवा. 'My' हार्ट, तर त्याला एका बाजुला ठेवा. या शरीरातून अजून काय काय सेपरेट करावे लागेल?
प्रश्नकर्ता : पाच इन्द्रिये.
दादाश्री : हो, सर्व च. पाच इन्द्रिये, पाच कर्मेन्द्रिये. आणि मग 'माय माइन्ड' म्हणतात कि 'आय एम माइन्ड' म्हणतात?
प्रश्नकर्ता : 'माय माइन्ड' (माझे मन) म्हणतात.
Page #16
--------------------------------------------------------------------------
________________
मी कोण आहे?
दादाश्री : माझी बुद्धि म्हणतात ना ?
प्रश्नकर्ता : हो.
७
दादाश्री : माझे चित्त म्हणतात ना ?
प्रश्नकर्ता : हो.
दादाश्री : आणि 'माय ईगोइझम' बोलतात कि ‘आय एम ईगोईझम' बोलतात ?
प्रश्नकर्ता : 'माय ईगोइझम' (माझा अहंकार).
दादाश्री : ‘माय ईगोइझम' म्हणाल तर त्याला वेगळे करू शकाल. पण त्याच्या पुढे जे आहे, त्याच्यात तुमचा हिस्सा काय आहे, हे आपण नाही जाणत. म्हणून मग पूर्णपणे सेपरेशन नाही होऊ शकत. आपण, आपले काही हद्दीपर्यंतच जाणू शकता. आपण स्थूल वस्तुच जाणता, सूक्ष्मची ओळखच नाही आहे. सूक्ष्मला वेगळे करणे, परत सूक्ष्मतर वेगळे करणे, परत सूक्ष्मतम वेगळे करणे हे तर ज्ञानी पुरुषांचे च काम आहे. पण एक एक करून सारे स्पेरपार्टस बाद करत गेले तर. 'I' आणि 'My', दोन्ही वेगळे होऊ शकतात ना? 'I' आणि 'My'. दोन्ही वेगळे केल्यावर शेवटी काय राहणार? 'My 'ला एका बाजुला ठेवले तर शेवटी काय उरणार?
प्रश्नकर्ता : 'I' (मी).
दादाश्री : हो 'I' तेच आपण आहात. बस, या 'I' लाच रियलाइज करायचे आहे.
प्रश्नकर्ता : तर सेपरेट करून हे समजायचे कि जे बाकी राहिले तो 'मी' आहे?
दादाश्री : हो, सेपरेट करून जे बाकी राहिले, ते आपण स्वतः
Page #17
--------------------------------------------------------------------------
________________
मी कोण आहे?
आहात, 'I' आपण स्वतःच आहात. त्याचा शोध तर करायला हवा ना? अर्थात् हा सोपा मार्ग आहे ना? 'I' आणि 'My' वेगळे केले तर?
प्रश्नकर्ता : तसा मार्ग सोपा आहे, पण तो सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम पण वेगळे होणार तेव्हा ना? हे ज्ञानी शिवाय नाही होणार ना?
दादाश्री : हो, हे ज्ञानी पुरुष सांगतिल. म्हणून आम्ही सांगतो ना, Separate 'I' आणि 'My' with ज्ञानीझ सेपरेटर त्या सेपरेटरला शास्त्रकार काय म्हणतात? भेदज्ञान म्हणतात. भेदज्ञाना शिवाय आपण कसे वेगळे करणार? काय काय वस्तु आपली आहे आणि काय काय वस्तु आपली नाही आहे ह्या दोन्हीचे आपल्याला भेदज्ञान नाही आहे. भेदज्ञान म्हणजे हे सगळे 'माझे' आहे आणि 'मी' वेगळा आहे त्यांच्यापासून, म्हणून ज्ञानी पुरुषांच्या जवळ, त्यांच्या सान्निध्यात राहिलात तर भेदज्ञान प्राप्त होईल आणि मग आपले ('I' आणि 'My') सेपरेट होऊन जाईल.
'I' आणि 'My'चा भेद केला तर खूप सोपे होईल ना हे? मी ही पद्धत सांगितली, त्यानुसार अध्यात्म सरळ आहे कि कठीण आहे? नाहीतर ह्या काळातील जीवांचे शास्त्र वाचून वाचून दम निघून जाईल.
प्रश्नकर्ता : आपल्यासारखे ज्ञानी पुरुषांची गरज भासणार ना, ते समझण्यासाठी तरी?
दादाश्री : हो, गरज भासणार, पण ज्ञानी पुरुष तर अधिक नसतात ना. पण जेव्हा कधी असतील. तेव्हा आपण आपले काम करून घ्या. ज्ञानी पुरुषाचे 'सेपरेटर' घ्या एकाद्या तासासाठी. त्याचे भाडे-बिडे नसते. त्याने सेपरेट करून घ्या. त्याने 'I' वेगळा होईल नाहीतर नाही होणार ना, 'I' वेगळा झाल्यावर सगळे काम होऊन जाईल. सर्व शास्त्रांचे सार इतके च आहे.
आत्मा व्हायचे असेल तर 'माझे' (माय) सगळे काही समर्पित करावे लागेल. ज्ञानी पुरुषाला 'My' सोपवले तर एकटा 'I' आपल्याजवळ राहिल. 'I' विथ 'My' त्याचे नांव जीवात्मा. 'मी आहे आणि हे सगळे
Page #18
--------------------------------------------------------------------------
________________
मी कोण आहे?
माझे आहे' तो जीवात्मादशा आणि 'मीच आहे आणि माझे काही नाही' ती परमात्मदशा. अर्थात् 'My' मुळे मोक्ष नाही होत. 'मी कोण आहे' ह्याचे ज्ञान झाल्यावर 'My' सुटते. 'My' सुटले तर सगळे सुटले.
'My' इज रिलेटिव डिपार्टमेन्ट एन्ड 'I' इज रियल. अर्थात् 'I' टेम्पररी नसतो. 'I' इज परमनेन्ट. 'My' इज टेम्पररी म्हणजे आपल्याला 'I' शोधून काढायचा आहे.
(४) संसारात उपरी कोण?
ज्ञानीच ओळख करून देईल 'मी' ची! प्रश्नकर्ता : 'मी कोण आहे' हे ओळखायची जी गोष्ट आहे. ती या संसारात राहून कशी शक्य होऊ शकते?
दादाश्री : तर कुठे राहून जाणू शकतो त्याला? संसाराशिवाय आणि कुठली जागा आहे जेथे राहू शकतो? ह्या जगात सगळे संसारीच आहेत आणि सगळे संसारातच राहतात. इथे 'मी कोण आहे' हे जाणण्यास मिळेल असे आहे. 'आपण कोण आहात' हेच विज्ञान समजायचे आहे इथे. इथे या, आम्ही आपल्याला ओळख करून देऊ.
आणि हे जे काही आम्ही तुम्हाला विचारतो ते असे नाही सांगत कि आपण असे करा. आपल्याने होईल असे ही नाही. अर्थात् आम्ही तुम्हाला सांगतो कि आम्ही सगळे करून देतो. म्हणून आपण चिंता करू नका. हे तर प्रथम समजून घ्या कि वास्तवात 'आपण' काय आहोत आणि काय जाणणे योग्य आहे? खरी गोष्ट काय आहे? करेक्टनेस काय आहे? दुनिया काय आहे? हे सगळे काय आहे? परमात्मा काय आहे?
परमात्मा आहे? परमात्मा आहेच आणि तो आपल्या जवळ आहे. बाहेर कुठे शोधतात? पण कोणी हा दरवाजा खोलून देईल तर दर्शन घेऊ ना. हा दरवाजा असा बंद झाला आहे कि स्वतः उघडू शकू. असे नाहीच
Page #19
--------------------------------------------------------------------------
________________
मी कोण आहे ?
आहे. हे तर जे स्वतः पार झालेत, असे तरणतारणहार ज्ञानी पुरुषांचेच काम आहे.
१०
स्वतः केलेल्या चूकाच स्वत:वर उपरी !
भगवान तर आपले स्वरूप आहे. आपल्यावर कोणी उपरीच नाही. कोणी बापही उपरी (वरचढ ) नाही. आपल्याला कोणी काही करणारा ही नाही. आपण स्वतंत्रच आहोत, केवळ आपल्या चूकांमुळे आपण बांधलेले आहोत.
आपला वरचढ कोणी नाही आहे आणि आपल्यामध्ये कुठल्या 'जीवाची दखल (हस्तक्षेप) देखिल नाही आहे. इतके सगळे जीव आहेत, पण कुठल्या जीवाचा आपल्यामध्ये दखल नाही आहे. आणि हे लोक जी काही दखल करतात, ती आपल्या चुकी मुळेच दखल करतात. आपण जी (पूर्वी) दखल केली होती. त्याचे हे फळ आहे. हे मी स्वत: 'बघून' सांगत आहे.
आम्ही ह्या दोन वाक्यात गॅरंटी देत आहोत कि, त्यामुळे मनुष्य मुक्त राहू शकतो. आम्ही काय म्हणतो कि, 'आपल्या उपरी या दुनियेत कोणी नाही. आपल्या उपरी आपल्या ब्लंडर्स आणि आपल्या मिस्टेक्स आहेत. हे दोन नसतील तर आपण परमात्माच आहात. '
आणि 'तुझ्यात कोणाची सुद्धा दखल नाही आहे. कोणी जीव कुठल्या जीवाला किंचित्मात्र दखल करू शकेल अशा स्थितित नाही च. असे हे जग आहे'
ही दोन वाक्य सगळे समाधान करून देतात.
(५) जगामध्ये कर्ता कोण ?
जगत कर्त्याची वास्तविकता !
फॅक्ट (खरी) वस्तु नाही समजल्यामुळेच हा सगळा गोंधळ झालेला
Page #20
--------------------------------------------------------------------------
________________
मी कोण आहे ?
११
आहे. आता आपल्याला, 'जे माहीत आहे' ते जाणायचे आहे, कि 'जे माहीत नाही' ते जाणायचे आहे ?
जगत काय आहे? कशाप्रकारे बनविले आहे ? बनवणारा कोण ? आपल्याला या जगाकडून काय घेणे-देणे ? आमच्याबरोबर आमच्या संबंधितांचे काय घेणे-देणे? बिजनेस कुठल्या आधारावर ? मी कर्ता आहे कि कोणी दुसरा कर्ता आहे? हे सगळे जाणण्याची गरज तर आहेच ना?
प्रश्नकर्ता : जी, हां.
दादाश्री : म्हणून यात सुरूवातीला आपल्याला काय जाणायचे आहे, त्याची बातचीत प्रथम करूया. जग कोणी बनविले असेल ? आपल्याला काय वाटते? कोणी बनविले असेल असे गुंतागुंतीचे जग ? आपले काय मत आहे?
प्रश्नकर्ता : ईश्वरानेच बनविले असेल.
दादाश्री : तर मग साऱ्या संसाराला चिंतेत का ठेवले आहे ? चिंतेच्या बाहेरची अवस्थाच नाही.
प्रश्नकर्ता: सगळी लोकं चिंता करतातच ना ?
दादाश्री : हो, मग त्याने हा संसार बनविला तो चिंतेचा का बनविला? त्याला पकडून आणा, सी.बी.आई. वाल्यांना पाठवून. पण भगवान गुन्हेगारच नाही आहे. हे तर लोकांनी त्यांना गुन्हेगार ठरविले आहे.
वास्तवात तर, गॉड इज नॉट क्रिएटर ऑफ धिस वर्ल्ड एट ऑल (परमेश्वर ह्या जगाचा निर्माता नाहीच आहे, फक्त वैज्ञानिक संयोगिक पुरावे आहेत). त्याला गुजरातीमध्ये मी ' व्यवस्थित शक्ति' म्हणतो. ऑन्ली सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडेन्स आहे. अर्थात् ही सारी निसर्गाची रचना आहे. ही तर खूप सूक्ष्म गोष्ट आहे.
Page #21
--------------------------------------------------------------------------
________________
मी कोण आहे?
त्याला मोक्ष म्हणतच नाहीत छोटे मूल असेल तो पण म्हणतो कि, 'ईश्वरने बनविले' मोठे संत पण म्हणतात कि 'ईश्वरने बनविले'. ही गोष्ट लौकिक आहे, अलौकिक नाही.
ईश्वर जर क्रिएटर (निर्माता) झाला असता तर तो नेहमीसाठी आपल्या उपरी ठरला असता आणि मोक्ष सारखी गोष्ट नसती झाली, पण मोक्ष आहे. भगवान क्रिएटर नाही आहे. मोक्ष समजणारे लोक देवाला क्रिएटर नाही मानत. 'मोक्ष' आणि 'भगवान क्रिएटर' ह्या दोन्ही विरोधाभासी गोष्टी आहेत. क्रिएटर तो नेहमीसाठी उपकारी झाला आणि उपकारी झाला म्हणून शेवटपर्यंत वरचढच्या वरचढच राहिल.
तर ईश्वरला कोणी बनविले? ईश्वरने बनविले, जर असे आम्ही अलौकिक दृष्टिने म्हणालो तर 'लॉजिक'वाले आम्हाला विचारतील कि, 'ईश्वरला कोणी बनविले?' म्हणून प्रश्न ऊभे राहतात. लोक मला सांगतात, 'आम्हाला वाटते कि ईश्वरच दुनियेचा कर्ता आहे. आपण तर अमान्य करता, पण आपली गोष्ट मान्य होत नाही.' तेव्हा मी विचारतो कि जर मी स्वीकार केले कि ईश्वर कर्ता आहे, तर त्या ईश्वरला कोणी बनविले? हे आपण मला सांगा. आणि त्या बनविणाऱ्याला कोणी बनविले? कोणीही कर्ता झाला तर त्याचा कर्ता असायला हवा, हे 'लॉजिक' आहे. पण त्याचा एन्ड (अंत) च नाही येणार. म्हणून ही गोष्ट चुकीची आहे.
ना आदि, ना ही अंत, जगाचा... म्हणजे कोणी बनविल्या शिवाय बनले आहे, कोणी ही बनविले नाही हे. कोणी केले नाही, म्हणून आता आपण कोणाला विचारायचे याच्याबद्दल? मी पण शोधत होतो कि कोण ह्याला जबाबदार आहे, ज्याने हा सारा घोळ केला. मी सगळ्या ठिकाणी शोध केला. पण कुठे मिळाला नाही.
Page #22
--------------------------------------------------------------------------
________________
मी कोण आहे ?
मी ‘फॉरीन'च्या सायन्टिस्टना सांगितले कि, 'गॉड क्रिएटर आहे, हे साबित करण्यासाठी आपण माझ्यासोबत थोडी बातचीत करा. जर तो क्रिएटर आहे तर त्याने कुठल्या वर्षी क्रिएट केले ते सांगा.' तेव्हा ते सांगतात, ‘आम्हाला माहीत नाही.' मी विचारले 'त्याची बिगिनिंग ( सुरूवात) झाली कि नाही झाली?' तेव्हा म्हणतात, 'हो बिगिनिंग झाली, क्रिएटर म्हणतात. म्हणजे बिगिनिंग होणारच.' ज्याची सुरुवात होणार, त्याचा अंत होणार. पण हे तर बिना अंत चे जग आहे. बिगिनिंग नाही झाली मग एन्ड कुठून होणार? हे तर अनादि अनंत आहे. ज्याची बिगिनिंग नाही झाली, त्याचा बनविणारा नाही होऊ शकत, असे नाही वाटत?
भगवंताचा खरा पत्ता !
तेव्हा या फॉरिनच्या सायन्टिस्टनी विचारले कि, 'तर काय ईश्वर (भगवान) नाही आहे?' तेव्हा मी सांगितले, 'भगवान नसते तर, या जगात ज्या भावना आहेत, सुख आणि दुःख, त्याचा काही अनुभव ही नसता आला. म्हणून भगवान अवश्य आहे.' त्यांनी मला विचारले कि, 'भगवान कुठे राहतात?' मी सांगितले, 'आपल्याला कुठे वाटत आहे?' तेव्हा ते म्हणाले, 'वर'. मी विचारले, 'ते वर कोठे राहतात? त्यांचा गल्लीचा नंबर काय आहे? कुठली गल्ली, जाणता आपण? पत्र पोहोचेल तसा बरोबर एड्रेस आहे आपल्याजवळ?' वरती तर कोणी बाप देखिल नाही आहे. सगळ्या ठिकाणी मी फिरून आलो. सगळी लोकं म्हणत होते कि वर आहे. वर बोट दाखवत राहिले. यामुळे माझ्या मनात आले कि सगळी लोकं दाखवताहेत, म्हणजे काहीतरी असायला पाहिजे. म्हणून मी वर सगळ्या जागी शोधून आलो तर वर फक्त खाली आकाशच आहे, वर कोणी नाही सापडले. वर तर कोणी राहात नाही. आता त्या फॉरिनच्या सायन्टिस्टनी मला विचारले कि, 'भगवानचा खरा पत्ता सांगाल का?' मी सांगितले कि, ‘लिहून घ्या. गॉड इज इन एवरी क्रिएचर, व्हेदर विजिबल ओर इन्विजिबल', नोट इन क्रिएशन.' (भगवान, डोळ्यांना दिसणारे किंवा
१३
Page #23
--------------------------------------------------------------------------
________________
मी कोण आहे ?
न दिसणारे, प्रत्येक जीवात विद्यमान आहे, पण मानव निर्मित कुठल्या ही वस्तुत नाहीत.)
१४
ही टेपरेकॉर्डर ' क्रिएशन' म्हणतात. जितक्या मॅनमेड ( मानव निर्मित) वस्तु आहेत, मनुष्याने बनविलेल्या वस्तु आहेत, त्यात भगवान नाहीत. ज्या नैसर्गिक रचना आहेत त्यात भगवान आहे. टे
अनुकूलते चा सिद्धांत !
कितीतरी सारे संयोग एकत्र झाल्यानंतर कुठलेही कार्य होते, म्हणजे हा सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स आहे. याच्यात इगोइझम (अहंकार) करून, 'मी केले' म्हणून मिरवत राहता. पण चांगले झाल्यावर 'मी केले' आणि बिघडल्यावर 'माझे संयोग सध्या ठीक नाही' अशी आमची लोकं म्हणतात ना ? संयोगाला मानता ना, आमची लोकं?
प्रश्नकर्ता : हां.
दादाश्री : कमाई होते तेव्हा त्याचा गर्वरस स्वतः चाखता आणि जेव्हा नुकसान होते तेव्हा बहाने काढतात. आम्ही विचारले, 'शेठजी, असे का झाले आता?' तेव्हा ते म्हणतात, 'भगवान रुसले आहे. '
प्रश्नकर्ता : स्वत:ला अनुकूल, असा सिद्धांत झाला.
दादाश्री : हो, स्वत:ला अनुकूल, पण असा आरोप त्याच्यावर (भगवानवर) नाही लावला पाहिजे. वकीलावर आरोप लावला किंवा दुसऱ्यावर आरोप लावला तर ठीक आहे पण भगवंतावर आरोप करू शकतो का? वकील तर दावा करून हिशोब मागेल, पण ह्याचा दावा कोण दाखल करणार? ह्याचे फळ तर पुढच्या जन्मी ( संसाराची ) भयंकर बेडी मिळेल. ईश्वरावर आरोप करू शकतो का?
प्रश्नकर्ता : नाही करू शकत.
Page #24
--------------------------------------------------------------------------
________________
मी कोण आहे?
दादाश्री : नाहीतर मग म्हणणार. 'स्टार्स फेवरेबल (ग्रह अनुकूल) नाहीत.' नाहीतर मग 'हिस्सेदारचे तोंड वाकडे आहे.' असे म्हणणार. नाहीतर 'सून पांढऱ्या पायाची आहे' असे म्हणणार. पण आपल्या डोक्यावर येऊ देत नाही. आपल्या डोक्यावर कधी गुन्हेगारी घेत नाही. याबद्दल एका फॉरिनर बरोबर माझी बातचीत झाली होती. त्यांनी विचारले कि, 'तुमचे इन्डियन लोक गुन्हा आपल्या डोक्यावर का नाही येऊ देत?' मी सांगितले. 'हीच तर इन्डियन पझल आहे. इन्डियाची सगळ्यात मोठी पझल (कोडं) असेल तर हीच आहे.'
सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स! म्हणून बातचीत करा, जे काही बोलायचे असेल ते सगळे बोला. अशी वार्तालाप करा, कि ज्यामुळे सगळा खुलासा होईल.
प्रश्नकर्ता : हा, 'सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स' समजला नाही.
दादाश्री : हा सगळा सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स (वैज्ञानिक सांयोगिक पुरावे) ह्यावर आधारीत आहे. संसारात एक पण परमाणु चेंज (बदल) होऊ शकतो असे नाही, आता आपण जेवण करायला बसलात, तेव्हा आपल्याला माहीत नसते कि मी काय खाणार आहे? बनविणाऱ्याला नाही माहीत कि उद्या जेवणासाठी काय बनवायचे आहे? हे कसे होऊन जाते, हाच आश्चर्य (कोडं) आहे. आपण किती खाऊ शकता आणि किती नाही, हे सगळे, परमाणुमात्र, निश्चित आहेत.
आपण आज मला भेटलात ना, हे कशाच्या आधारे भेटलात? ऑन्ली सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स आहे. अति अति गुह्य कारण आहे. ते कारण शोधून काढा.
प्रश्नकर्ता : पण ते शोधायचे कशाप्रकारे?
Page #25
--------------------------------------------------------------------------
________________
१६
मी कोण आहे?
दादाश्री : जसे आता आपण इथे आलात, त्यात तुमच्या हातात काही नाही. ही तर आपली मान्यता आहे. ईगोइजम करता कि, 'मी आलो आणि मी गेलो.' हे जे आपण म्हणता कि, 'मी आलो' तर मग मी विचारतो, 'काल का नाही आलात?' तेव्हा असे पाय दाखवले, ह्यातून काय समजायचे?
प्रश्नकर्ता : पाय दु:खत होते.
दादाश्री : हो, पाय दुःखत होते, पायांचे कारण दिले तर नाही समजणार, कि येणारे तुम्ही कि पाय येणारे?
प्रश्नकर्ता : मग मीच आलो म्हणणार ना?
दादाश्री : आपणच आला आहात ना? जर पाय दु:खत असतील तरी पण आपण येणार का?
प्रश्नकर्ता : माझी स्वत:ची इच्छा होती यायची. म्हणून आलो आहे.
दादाश्री : हो, इच्छा होती आपली, म्हणून आलात. पण हे पाय वगैरे ठीक होते म्हणून येऊ शकलात ना? ठीक नसते तर?
प्रश्नकर्ता : तर नसतो येऊ शकलो, बरोबर आहे.
दादाश्री : म्हणजे आपण एकटे येऊ शकता? जसा एक मनुष्य रथात बसून इथे आला आणि म्हणाला, 'मी आलो, मी आलो' तेव्हा आम्ही विचारतो, 'ह्या आपल्या पायाला पॅरॅलिसिस (पक्षाघात) झाला आहे, तर आपण आला कसे?' तेव्हा ते म्हणाले, 'रथातून आलो, पण मीच आलो मीच आलो.' 'अरे, पण रथ आला कि आपण आलात?' तेव्हा ते म्हणाले, 'रथ आला.' मग मी म्हणेन कि, रथ आला कि बैल आले?
अर्थात् ही गोष्ट तर कुठल्या कुठे आहे. पण बघा उलट मानले आहे ना. सगळे संयोग अनुकूल असतील, तर येऊ शकता, नाहीतर नाही येऊ
Page #26
--------------------------------------------------------------------------
________________
मी कोण आहे?
शकत. डोकं दु:खत असेल तर आपण आला असाल तरीपण परत जाल. आपणच येणारे-जाणारे आहोत, तर मग डोकं दु:खायचे बहाणं करणार नाही ना? अरे, तेव्हा डोकं आले होते कि आपण आले होते? जर कोणी रस्त्यात भेटले आणि म्हणाले, 'चला चन्दुलाल माझ्या बरोबर' तेव्हा पण आपण परत जाणार. म्हणून संयोग अनुकूल असतील, येथे पोहचण्या पर्यंत कोणी अडवणारा नाही मिळाला तरच येऊ शकतो.
स्वतःची सत्ता किती? आपण तर कधी खाल्ले ही नाही ना. हे तर सगळे चन्दुलाल खातो आणि आपण मनात मानतो कि मी खाल्ले. चन्दुलाल खातात आणि संडासला पण चन्दुलाल जातात. विनाकारण ह्यात फसला आहात. हे आपल्याला समजते ना?
प्रश्नकर्ता : समजवा.
दादाश्री : या संसारात कोणी मनुष्य संडास जाण्यासाठी स्वतंत्र सत्तावाला जन्मला नाही. संडास जाण्यासाठी ही स्वतंत्र सत्ता नाही कोणाची. मग अजून कोणती सत्ता असेल? हे तर जोपर्यंत आपल्या मर्जीनुसार थोडे फार होत आहे, तेव्हा मनात मानता कि माझ्यामुळेच होत आहे सगळे काही. जेव्हा कधी अडकते ना, तेव्हा कळते.
मी फॉरिन रिटर्न डॉक्टरांना इथे बडौद्यात एकत्र केले होते, दहाबारा जणांना. त्यांना मी सांगितले. 'संडास जाण्याची स्वतंत्र शक्ति आपली नाही आहे.' यावर त्यांच्यात खळबळ उडाली. पुढे सांगितले कि, हे तर कधी अडकल्यावर कळेल. तेव्हा तिथे कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. म्हणून ही आपली स्वतंत्र शक्ति नाहीच आहे. हे तर भ्रमाने आपण नैसर्गिक शक्तिला स्वत:ची शक्ति मानता. परसत्तेला स्वत:ची शक्ति मानता, त्याचेच नांव भ्रम. ही गोष्ट थोडीफार समजली आपल्याला? दोन आणे किंवा चार आणे जितकेपण समजले?
Page #27
--------------------------------------------------------------------------
________________
मी कोण आहे?
प्रश्नकर्ता : हो, समजत आहे.
दादाश्री : एवढे समजले तरी मार्ग निघेल. हे लोक जे बोलतात ना कि, 'मी एवढे तप केले, एवढे जप केले, उपवास केला.' हा सगळा भ्रम आहे, तरी पण जग असेच्या असेच राहिल. अहंकार केल्याशिवाय नाही राहणार. स्वभाव आहे ना?
कर्ता, नैमित्तिक कर्ता...
प्रश्नकर्ता : जर वास्तवात स्वतः कर्ता नाही आहे, तर मग कर्ता कोण आहे? आणि त्याचे स्वरूप काय आहे?
दादाश्री : असे आहे, नैमित्तिक कर्ता तर स्वत:च आहे. स्वतः स्वतंत्र कर्ता तर नाहीच आहे पण नैमित्तिक कर्ता आहे. म्हणजे पार्लियामेन्ट्री पद्धतिने कर्ता आहे. पार्लियामेन्ट्री पद्धत म्हणजे? जसे पार्लामेन्टमध्ये सगळ्यांचे व्होटिंग होते आणि मग शेवटी स्वतःचे व्होट होते ना, त्याच्या आधारावर स्वतः म्हणतो कि हे तर मला करायला हवे. ह्या हिशोबाने कर्ता होतो. अशाप्रकारे योजनेचे सर्जन होते. योजना करणारा स्वत:च आहे. कर्तेपणा केवळ योजनेतच असतो. योजनेत त्याची सही आहे. पण संसारात लोक हे जाणत नाहीत. जसे छोट्या कम्प्युटर मध्ये फीड केलेले निघते आणि मोठ्या कम्प्युटर मध्ये फीड होते, अशाप्रकारे ही योजना सर्जन होऊन मोठ्या कम्प्युटर मध्ये जाते. मोठा कम्प्युटर हा समष्टि कम्प्युटर आहे. तो मग त्याचे विसर्जन करतो. म्हणून या जन्मातील पूर्णजीवन विसर्जन स्वरूपात आहे, ज्याचे सर्जन मागच्या जन्मी केलेले असते. म्हणून हा भव जन्मापासून ते मृत्युपर्यंत विसर्जन स्वरूपच आहे. स्वतःच्या हातात काहीही नाही, परसत्तेतच आहे. एकदा योजना झाली कि सर्व परसत्तेत जाते. (रूपक) परिणामात परसत्तेचा अमल चालतो. अर्थात् परिणाम वेगळा आहे. परिणाम परसत्तेच्या आधीन आहे. आपल्याला समजते? ही गोष्ट फार खोल वरची आहे.
Page #28
--------------------------------------------------------------------------
________________
मी कोण आहे?
कर्तापदाने कर्मबंधन! प्रश्नकर्ता : या कर्मबंधनातून सुटण्यासाठी काय करावे?
दादाश्री : हे जे कर्म आहे ते कर्त्याच्या आधीन आहे. म्हणून कर्ता असेल तरच कर्म होईल. कर्ता नसेल तर कर्म नाही होणार. कर्ता कसे? आरोपितभावात जाऊन बसल्यामुळे कर्ता झालात. आपल्या मूळ स्वभावात आलात तर स्वतः कर्ता असणारच नाही. 'मी केले' असे सांगितले म्हणून कर्ता झाला. म्हणजे कर्माला आधार दिला. आता जर स्वतः कर्ता नाही झाला तर कर्म गळून पडणार. निराधार केल्यावर कर्म पडणार. म्हणजे कर्तापणे आहे तोपर्यंत कर्म आहे.
'छूटे देहाध्यास तो नहीं कर्ता तू कर्म, नाही भोक्ता तू त्याचा, हे च धर्मचे मर्म.'
- श्रीमद् राजचंद्र. आता आपण 'मी चन्दुलाल आहे' असे समजून बसलात. म्हणून सगळे एकाकार होऊन गेले आहे. आत दोन वस्तु वेगळ्या वेगळ्या आहेत. आपण वेगळे आणि चन्दुलाल वेगळे आहे. पण आपण हे जाणत नाही, तोपर्यंत काय होणार? ज्ञानी पुरुष भेद विज्ञानाने वेगळे करून देतात, मग जेव्हा 'आपण' ('चन्दुलाल पासून) वेगळा होऊन जातो, तेव्हा आपल्याला' काही करायचे नाही, सगळे 'चन्दुलाल' करत राहिल.
(६) भेदज्ञान कोण करणार?
आत्मा-अनात्माचे वैज्ञानिक विभाजन ! जसे या अंगठीत सोनं आणि तांबं दोन्ही मिसळलेले आहेत, ते आपण गावात घेऊन जाऊन कोणाला ही सांगा कि, 'भाऊ, वेगळे वेगळे करून द्या ना' तर काय कोणीही करून देइल? कोण करून शकेल?
प्रश्नकर्ता : सोनारच करू शकेल.
Page #29
--------------------------------------------------------------------------
________________
मी कोण आहे ?
दादाश्री : ज्याचे हे काम आहे, जो यात एक्सपर्ट आहे, तो सोनं आणि तांबं दोन्ही वेगळे करेल. शंभरच्या शंभर टक्के सोनं वेगळे करेल, कारण तो दोन्हीं चे गुणधर्म जाणतो, कि सोन्याचे गुणधर्म असे आहेत आणि तांब्याचे गुणधर्म असे आहेत. अशाप्रकारे ज्ञानी पुरुष आत्म्याचे गुणधर्म जाणतात आणि अनात्माचे गुणधर्म पण जाणतात.
२०
जसे अंगठीमध्ये सोनं आणि तांब्याचे 'मिश्रण' असेल तर त्याला वेगळे करता येते. सोनं आणि तांबं दोन्ही कम्पाउन्ड स्वरूप होऊन जातात, तेव्हा त्यांना वेगळे नाही करता येत, कारण यामुळे गुणधर्म वेगळ्या प्रकारचे होऊन जातात. अशाप्रकारे जीवाच्या आत चेतन आणि अचेतन चे मिश्रण आहे, ते कम्पाउन्ड स्वरूप नाही. म्हणून परत आपल्या स्वभावाला प्राप्त करू शकता. कम्पाउन्ड झाले असते तर कळलेच नसते. चेतनचा गुणधर्म पण कळला नसता आणि अचेतनचा गुणधर्म पण कळला नसता आणि तिसराच गुणधर्म उत्पन्न झाला असता. पण असे नाही. हे केवळ मिश्रण झाले आहे. म्हणून ज्ञानी पुरुषने हे वेगळे करून दिले तर आत्म्याची ओळख होऊन जाईल.
ज्ञानविधि काय आहे?
प्रश्नकर्ता : आपली ज्ञानविधि काय आहे?
दादाश्री : ज्ञानविधि तर सेपरेशन (वेगळे) करणे हे आहे, पुद्गल (अनात्मा) आणि आत्म्याचे. शुद्ध चेतन आणि पुद्गल दोन्हीचे सेपरेशन. प्रश्नकर्ता : हा सिद्धांत तर बरोबर आहे, परंतु त्याची पद्धती काय
आहेत?
दादाश्री : याच्यात घेणे देणे काही होत नाही, केवळ इथे बसून जसे आहे तसे बोलायची जरूरत आहे ('मी कोण आहे' त्याची ओळख, ज्ञान प्राप्त करणे. दोन तासाचा ज्ञानप्रयोग आहे. त्यात अठ्ठेचाळीस मिनिट आत्मा-अनात्माचा भेद करणारी भेदविज्ञानाची वाक्य बोलली जातात. जी
Page #30
--------------------------------------------------------------------------
________________
मी कोण आहे?
सगळ्यांना बोलायची असतात. त्या नंतर एक तासात पाच आज्ञा उदाहरणं देऊन सविस्तर समजावली जातात, कि आता बाकीचे जीवन कसे व्यतीत केले पाहिजे कि ज्यामुळे नवीन कर्म नाही बांधले जाणार आणि जूनी कर्म पूर्णपणे संपतील, त्याचबरोबर 'मी शुद्धात्मा आहे' हे लक्ष्य नेहमी राहिल.)
आवश्यकता गुरुची? ज्ञानीची? प्रश्नकर्ता : दादाजींना भेटण्या पूर्वी कोणाला गुरु मानले असेल तर? तर त्यांचे काय करायचे?
दादाश्री : त्यांच्याकडे जायचे. आणि जायचे नसेल तर नका जाऊ, तसे हे आवश्यक ही नाही. आपण जाऊ इच्छित असाल तर जा आणि नाही जाऊ इच्छित तर नका जाऊ. त्यांना दु:ख होऊ नये, म्हणून जायला हवे. आपण विनय राखला पाहिजे. इथे 'आत्मज्ञान' घेते वेळी मला कोणी विचारेल कि, 'आता मी गुरुंना सोडून देऊ?' तेव्हा मी सांगेन कि, 'नको सोडू, अरे, त्या गुरुच्या प्रतापामुळे तर इथपर्यंत पोहोचू शकलात.' गुरुमुळे मनुष्य काही मर्यादांमध्ये राहू शकतो. गुरु नाही तर मर्यादाही नाही राहणार. आणि गुरुना सांगायला पाहिजे कि मला ज्ञानी पुरुष मिळाले आहेत. त्यांचे दर्शन करण्यासाठी जात आहे.' काही लोक तर आपल्या गुरुना पण माझ्याजवळ घेऊन येतात, कारण गुरुनां पण पाहिजे ना. संसाराचे ज्ञान पण गुरुशिवाय नाही होत आणि मोक्षाचे ज्ञान पण गुरुशिवाय नाही होत. व्यवहाराचे गुरु 'व्यवहारासाठी' आहेत आणि ज्ञानी पुरुष 'निश्चया'साठी आहे. व्यवहार रिलेटिव आहे आणि निश्चय रियल आहे. रिलेटिवसाठी गुरु हवेत आणि रियल साठी ज्ञानी पुरुष हवेत.
(७) मोक्षाचे स्वरूप काय?
ध्येय केवळ हाच असायला हवे! प्रश्नकर्ता : मनुष्याचा ध्येय काय असायला हवे?
Page #31
--------------------------------------------------------------------------
________________
मी कोण आहे ?
दादाश्री : मोक्षाला जाण्याचे च ! हाच ध्येय असायला हवा. आपल्यालाही मोक्षाला जायचे आहे ना? कुठपर्यंत भटकायचे ? अनंत जन्मापासून भटक भटक... भटकण्यात काही बाकी सोडले नाही ना! जनावराच्या गतिमध्ये, मनुष्यगतिमध्ये, देवगतिमध्ये, सगळ्या ठिकाणी भटकतच राहिले आहेत. कशामुळे भटकणे झाले? कारण कि 'मी कोण आहे' हेच नाही जाणले. स्वतःचे स्वरूपच नाही ओळखले. स्वत:चे स्वरूप ओळखले पाहिजे. 'स्वतः कोण आहे' ह्याची ओळख नको करायला ? इतके फिरून पण नाही ओळखले आपण? केवळ पैसे कमावण्याच्या मागे पडला आहात? मोक्षासाठी पण थोडेफार काही करायला हवे कि नाही ?
२२
प्रश्नकर्ता : करायला पाहिजे.
दादाश्री : अर्थात् स्वतंत्र होण्याची गरज आहे ना? असे परावलंबी कधीपर्यंत राहणार ?
प्रश्नकर्ता : स्वतंत्र होण्याची गरज नाही. पण स्वतंत्र होण्याची समजची आवश्यकता आहे, असे मला वाटते.
दादाश्री : हो, हीच समज जरूरी आहे. ही समज आपल्याला आली तर खूप झाले. भले स्वतंत्र होऊ नाही शकलात तरी. स्वतंत्र होऊ शकलात कि नाही होऊ शकलात ही त्यानंतरची गोष्ट आहे, परंतु तशी समजची आवश्यता आहे ना ! पहिली समज प्राप्त झाली, तरी खूप झाले.
'स्वभावात' येण्यासाठी मेहनत नको!
मोक्ष म्हणजे आपल्या स्वभावात येणे आणि संसार म्हणजे आपल्या विशेषभावात जाणे ते. म्हणजे सोपं काय? स्वभावात राहणे, अर्थात् मोक्ष कठीण नसतो. संसार नेहमी कठीण राहिला आहे. मोक्ष तर खिचडी बनविण्यापेक्षाही सोपा आहे. खिचडी बनविण्यासाठी तर लाकूड आणावे
Page #32
--------------------------------------------------------------------------
________________
मी कोण आहे?
____ २३
लागतात, डाळ-तांदुळ आणावे लागतात, पातेले आणावे लागते. पाणी आणावे लागते तेव्हा मग खिचडी बनते. परंतु मोक्ष तर खिचडीपेक्षा सोपा आहे, पण मोक्षदाता ज्ञानी मिळायला पाहिजे. नाहीतर मोक्ष कधी नाही मिळू शकत. करोडो जन्म मिळाल्यावर सुद्धा नाही होणार. अनंत जन्म झालेलीच आहेत ना?
मेहनतीने मोक्ष प्राप्ति नाही! आम्ही हे सांगतो ना, कि आमच्याकडे येऊन मोक्ष घेऊन जा, तेव्हा लोकं मनात विचार करतात कि 'असा दिला गेलेला मोक्ष काय कामाचा, आपली मेहनत केल्याशिवाय?!' तर भाऊ मेहनत करून आणा. बघा, त्याची समज किती चांगली (!) आहे? बाकी मेहनतीने काही ही मिळणार नाही. मेहनतीने कधी कोणाला मोक्ष मिळालेला नाही.
प्रश्नकर्ता : मोक्ष दिला किंवा घेतला जाऊ शकतो का?
दादाश्री : तो देण्या-घेण्याचा असतच नाही. हे तर नैमित्तिक आहे. आपण मला भेटलात, हे निमित्त झाले, निमित्त जरूरी आहे. बाकी, तर नाही कोणी देणारा आहे आणि नाही कोणी घेणारा आहे. देणारा कोण म्हटले जाते? जो स्वत:ची वस्तु आपल्या देतो तर त्याला देणारा म्हणतात. पण मोक्ष तर आपल्या घरातच आहे. आम्हाला तर केवळ आपल्याला दाखवायचे आहे, रियलाइज करून द्यायचे आहे, म्हणजे देण्या-घेण्याचे होतच नाही. आम्ही तर केवळ निमित्त आहोत.
मोक्ष म्हणजे सनातन सुख! प्रश्नकर्ता : मोक्ष मिळवून करायचे काय?
दादाश्री : काही लोक मला भेटल्यावर सांगतात कि, 'मला मोक्ष नको.' तेव्हा मी सांगतो कि, 'भाऊ, आपल्याला मोक्षाची जरूरत नाही. पण सुख तर हवे कि नको? कि दुःख पसंद आहे?' तेव्हा सांगतात, 'नाही,
Page #33
--------------------------------------------------------------------------
________________
२४
मी कोण आहे?
सुख तर हवे.' मी सांगितले, 'सुख थोडे फार कमी असेल तर चालेल का?' तेव्हा ते म्हणाले, 'नाही, सुख तर पूर्ण हवे' तेव्हा मी सांगितले, 'तर आपण सुखाचीच गोष्ट बोलूया. मोक्षाचे जाऊदे.' मोक्ष काय चीज आहे, लोकं समजतच नाहीत. शब्दात बोलेल इतकेच आहे. लोक असे समजतात कि मोक्ष नांवाची एखादी जागा आहे आणि तिथे जाण्यामुळे आम्हाला मोक्षाची मजा येते! पण असे नाही आहे.
मोक्ष, दोन स्टेज मध्ये ! प्रश्नकर्ता : सामान्यपणे मोक्षचा अर्थ, आम्ही जन्म-मरणातून मुक्ति असा करतो.
दादाश्री : हो, हे बरोबर आहे. पण जी अंतिम मुक्ति आहे, ती सेकन्डरी स्टेज आहे. पहिले मोक्ष म्हणजे संसारी दुःखाचा अभाव. संसारातील दु:खात पण दु:ख वाटत नाही, उपाधिमध्ये पण समाधी राहते, हा पहिला मोक्ष. आणि मग हा देह सुटल्यावर आत्यंतिक मोक्ष आहे. पण पहिला मोक्ष इथे झाला पाहिजे. माझा मोक्ष झालाच आहे ना ! संसारात राहून संसार स्पर्श करत नाही, असा मोक्ष होऊन जायला पाहिजे. हे अक्रम विज्ञानात असे होऊ शकते.
जिवंतपणीच मुक्ति प्रश्नकर्ता : ही मुक्ति किंवा मोक्ष आहे, ती जिवंतपणे मुक्ति आहे कि मरण्या नंतरची मुक्ति आहे?
दादाश्री : मरण पश्चात मिळालेली मुक्ति काय कामाची? मरणानंतर मुक्ति मिळणार, असे सांगून लोकांना फसवतात. अरे, मला येथेच काहीतरी दाखव ना. स्वाद तर घेऊदे थोडा, काही पुरावा तर दाखव. तिथे मोक्ष मिळेल, त्याचा काय ठिकाणा? असा उधारी मोक्ष आम्हाला काय करायचा? उधारीत बरकत नाही होत. म्हणून कॅश (नकद) चांगली.
Page #34
--------------------------------------------------------------------------
________________
मी कोण आहे?
आपल्यास इथे जिवंतपणी मुक्ति मिळायला पाहिजे. जशी जनक राजाची मुक्ति आपण ऐकलि कि नाही? प्रश्नकर्ता : ऐकले आहे.
(८) अक्रम मार्ग काय आहे?
अक्रम ज्ञानाने अनोखी सिद्धि ! प्रश्नकर्ता : पण या संसारात राहून आत्मज्ञान असे मिळू शकते काय?
दादाश्री : हो, असा मार्ग आहे. संसारात राहून इतकेच नाही, पण पत्नी बरोबर राहून ही आत्मज्ञान मिळू शकते, असे आहे. केवळ संसारात राहायचे नाही, पण मुला-मुलींची लग्न करून, सर्व कार्य करतांना आत्मज्ञान होऊ शकते. मी संसारात राहूनच आपल्याला हे करून देत आहे. संसारात, अर्थात् सिनेमा बघायला जाणे आदि सगळी सूट देत आहे. मुलामुलींची लग्न करा आणि चांगले कपडे घालून लग्न करा. मग यापेक्षा अजून काय खात्री पाहिजे?
प्रश्नकर्ता : इतकी सारी सूट मिळाल्यावर जरूर आत्म्यात राहू शकतो.
दादाश्री : सगळी सूट ! हा अपवाद मार्ग आहे. आपल्याला काही मेहनत करायची नाही. आपल्याला आत्मा पण हातात देऊ, मग त्यानंतर आत्मरमणतेत रमूण जा. आणि या लिफ्टमध्ये बसून रहा. आपल्याला आणखी काहीही करायचे नाही. मग आपले नवीन कर्म नाही बांधले जाणार, एकाच जन्माचे कर्म बांधाल, ते पण माझ्या आज्ञा पालनचेच. आमच्या आज्ञेत राहण्यासाठी जरूरी आहे कि लिफ्टमध्ये बसतेवेळी इकडे तिकडे हात केला तर अडचणीत पडू शकतात ना!
प्रश्नकर्ता : म्हणजे पुढचा जन्म जरूर असणार?
Page #35
--------------------------------------------------------------------------
________________
मी कोण आहे?
दादाश्री : मागचा जन्म सुद्धा होता आणि आता पुढचा जन्म सुद्धा आहे, पण हे ज्ञान असे आहे कि आता एक-दोन जन्मच बाकी राहिलेत. प्रथम अज्ञानातून मुक्ति होते. मग एक-दोन जन्मात मुक्ति मिळेल. एक जन्म तर शेष आहे, हा काळ असा आहे.
आपण एक दिवस माझ्याकडे या. आपण एक दिवस ठरवूया तेव्हा आपल्याला यायचे आहे. त्या दिवशी सगळ्यांची रस्सी मागून कापतो (स्वरूपच्या अज्ञानरूपी रस्सीचे बंधन दूर करतो). रोज रोज तर ब्लेड शोधायला लागते. रोज तर सगळ्या गोष्टी सत्संगाच्या करतो, परंतु एक दिवस ठरवून त्या दिवशी ब्लेडने अशी रस्सी कापून देतो. (ज्ञानविधि ने स्वरूपज्ञान प्राप्त करून देतो) दुसरे काही नाही. मग लगेच आपण समजून जाणार कि हे सगळे उघड झाले. हा अनुभव झाल्यावर लोक त्वरीतच सांगतात कि मुक्त झालो. अर्थात् मुक्त झाला, असे भान झाले पाहिजे. मुक्त व्हायचे, हे काही गप्पा (बाता) नाही आहे. अर्थात् आम्ही आपल्याला मुक्त करतो.
ज्या दिवशी हे 'ज्ञान' देतात त्यादिवशी काय होते? ज्ञानाग्निने त्यांची जी कर्म आहेत, ती भस्मसात होऊन जातात. दोन प्रकारची कर्म भस्मसात होतात. आणि एक प्रकारचे कर्म बाकी राहतात जे कर्म वाफ रूपेत आहे, त्याचा नाश होऊन जातो. आणि जी कर्म पाणीस्वरूप आहेत, त्याचा पण नाश होतो, पण जी कर्म बर्फस्वरूप आहेत, त्यांना भोगावेच लागते. कारण ती जमलेली आहेत, आणि ते कर्म फळ देण्यासाठी तयार झाले आहे, ते मग सोडत नाही. पण पाणी आणि वाफस्वरूप जी कर्म आहेत, त्यांना ज्ञानाग्नि उडवून लावते. म्हणून ज्ञान मिळताच लोकं एकदम हलके होऊन जातात, त्यांची जागृति एकदम वाढते. कारण जोपर्यंत कर्म भस्मसात होत नाहीत तोपर्यंत जागृति वाढतच नाही माणसाची. जे बर्फस्वरूप कर्म आहे ते तर आपल्याला अवश्य भोगायचे राहिलेत. आणि ते पण सरळपणे कसे भोगायचे, त्याचे सगळे मार्ग आम्ही सांगितले कि, 'भाऊ, ह्या 'दादा भगवानांचा असीम जय जयकार हो.' बोला, त्रिमंत्र बोला, नऊ कलम बोला.'
Page #36
--------------------------------------------------------------------------
________________
मी कोण आहे?
आम्ही ज्ञान देतो, त्याने कर्म भस्मसात होतात आणि त्यावेळेस काही आवरणं तूटतात. तेव्हा भगवंताची कृपा होण्या बरोबर तो स्वतः जागृत होतो. ही जागृति मग जात नाही, जागल्यानंतर जागृति जात नाही. निरंतर जागृत राहू शकतो, म्हणजे निंरतर प्रतीति राहणारच. प्रतीति केव्हा राहते? जागृति असेल तर प्रतीति राहते. प्रथम जागृति, नंतर प्रतीति. नंतर अनुभव, लक्ष्य आणि प्रतीति हे तिन्ही राहतात. प्रतीति कायमची राहिल. लक्ष्य तर काही काही वेळेस राहिल. कधी धंद्यात किंवा काही कामात लागलात कि मग लक्ष्य चूकणार आणि काम संपल्यावर परत लक्ष्य येते. आणि अनुभव तर केव्हा होणार, जेव्हा कामापासून, सगळ्यातून निवृत्त होऊन एकांतात बसलात तेव्हा (आत्म) अनुभवाचा स्वाद येईल. खरं तर अनुभव वाढतच राहतो. कारण पूर्वी चन्दुलाल (वाचकांनी येथे स्वतःचे नांव समजणे) काय होते आणि आज चन्दुलाल काय आहे, हे समजमध्ये येते. तर हे परिवर्तन कसे घडले? आत्म अनुभवाने. पूर्वी देहाध्यासाचा अनुभव होता आणि आता हा आत्म-अनुभव आहे.
प्रश्नकर्ता : आत्म्याचा अनुभव झाल्यावर काय होते?
दादाश्री : आत्म्याचा अनुभव झाला, म्हणजे देहाध्यास सुटला. देहाध्यास सुटला, म्हणजे कर्म बांधणे थांबले, मग आणखी काय हवे आहे?
आत्मा-अनात्माच्या मध्ये भेद-रेखा! हे अक्रम विज्ञान आहे, म्हणून इतक्या लवकर सम्यक्त्व (सम्यक्त्व-शुद्धात्माचे लक्ष्य अससेली, सम्यक्दृष्टि) होते. नाहीतर क्रमिक मार्गात तर, आज सम्यक्त्व होऊ शकेल असे नाही आहे. हे अक्रम विज्ञान तर खूप उच्च कोटीचे विज्ञान आहे. ज्याने आम्ही आत्मा आणि अनात्माच्या मध्ये, म्हणजेच आपली आणि परकी वस्तु ह्या दोघांचे विभाजन करून देतो. 'हा' हिस्सा आपला आणि 'हा' हिस्सा आपला नाही. आणि मध्ये लाइन ऑफ डिमार्केशन, भेद-रेखा लावून देतो. मग शेजारच्या शेतातील भेंडी आपण नाही खाऊ शकत ना?
Page #37
--------------------------------------------------------------------------
________________
२८
मी कोण आहे?
मार्ग-'क्रम' आणि 'अक्रम'! तीर्थंकरांचे जे ज्ञान आहे ते क्रमिक ज्ञान आहे. क्रमिक म्हणजे पायरी पायरीने वर चढणे. जसे जसे परिग्रह कमी करत जाणार, तसे तसे मोक्षच्या जवळ पोहोचणार. ते पण बऱ्याच काळनंतर, आणि हे अक्रम विज्ञान म्हणजे काय? पायरी नाही चढायची, लिफ्टमध्ये बसायचे आणि बाराव्या मजल्यावर चढायचे, असा हा लिफ्टचा मार्ग निघाला आहे. जे ह्या लिफ्टमध्ये बसले, त्यांचे कल्याण झाले, मी तर निमित्त आहे. या लिफ्टमध्ये जे बसले, त्यांचा मार्ग निघाला ना! मार्ग तर निघायलाच हवा ना? आपण मोक्षाला जाणारच आहोत, त्या लिफ्टमध्ये बसलेले आहोत त्याची खात्री तर असायला हवी कि नको ? त्याची खात्री म्हणजे क्रोध-मान-माया-लोभ होत नाही, आर्तध्यान-रौद्रध्यान होत नाही. म्हणजे पूर्ण काम झाले ना?
जो मला भेटला तोच अधिकारी ! प्रश्नकर्ता : हा मार्ग इतका सोपा आहे, तर मग काही अधिकार असे पाहायचे नाही? प्रत्येकांसाठी हे संभव आहे?
दादाश्री : लोक मला विचारतात कि, 'मी अधिकारी आहे का?' तेव्हा मी सांगितले, 'मला भेटला, म्हणून तू अधिकारी.' हे भेटणे म्हणजे सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स आहे, त्याच्या मागे. म्हणून मला जो कोणी भेटला, त्याला अधिकारी मानतो. जे भेटले नाहीत ते अधिकारी नाहीत. हे कशाच्या आधारावर भेटतात? तर, अधिकारी आहेत. या आधारावर ते मला भेटतात. मला भेटल्यावर पण जर त्याला प्राप्ति नाही होत, तर त्याचे अंतराय कर्म अडसर आहे.
क्रममध्ये 'करायचे आणि अक्रममध्ये... एकवेळा, एका भाऊ ने प्रश्न केला कि क्रम आणि अक्रममध्ये फरक काय आहे? तेव्हा मी सांगितले कि, क्रम म्हणजे जसे कि सगळे
Page #38
--------------------------------------------------------------------------
________________
मी कोण आहे?
सांगतात कि हे उलटे (चुकीचे) सोडा आणि सुलट (बरोबर) करा. नेहमी सगळ्यांनी हेच सांगितले, त्याचे नांव क्रमिक मार्ग. क्रम म्हणजे सर्व सोडायला सांगणे, कपट-लोभ सोडा आणि चांगले करा. हेच आपण पाहिले ना आजपर्यंत? आणि हे अक्रम म्हणजे, करायचे नाही, करोमिकरोसि-करोति नाही. खिसा कापल्यानंतर अक्रम मध्ये सांगणार, 'त्याने कापला नाही आणि माझा कापला गेला नाही' आणि क्रममध्ये असे सांगतात कि, 'त्याने कापले आणि माझे कापले गेले.'
हे अक्रम विज्ञान लॉटरी सारखे आहे. लॉटरीमध्ये इनाम मिळते, त्यात त्याने काही श्रम केले होते? रूपया त्याने पण दिला होता आणि इतरांनी सुद्धा दिला होता, पण त्याचे चालले, असे हे अक्रम विज्ञान, लगेचच मोक्ष देते, रोखच !
अक्रम ने मूलगामी परिवर्तन! अक्रम विज्ञान तर खूपच अजब आश्चर्य म्हणतात. इथे 'आत्मज्ञान' घेतल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मनुष्यात परिवर्तन होते. हे ऐकताच लोकं ह्या विज्ञानाचा स्वीकार करतात आणि इथे आकर्षित होऊन येतात.
अक्रम मार्ग, विश्वभरात! हा संयोग तर खूपच उच्च कोटीचा बनला आहे. असे दुसऱ्या कुठल्या ही जागी झालेले नाही. एकच मनुष्य, ‘दादाश्री' एकटेच कार्य करू शकले, दुसरे कोणी नाही करू शकणार.
प्रश्नकर्ता : नंतर पण दादाजींची कृपा राहिल ना? आपल्या नंतर काय होईल?
दादाश्री : हा मार्ग तर चालू राहणार. माझी इच्छा आहे कि कोणी तरी तयार व्हावे, नंतर मार्ग चालविणारा पाहिजे ना?
प्रश्नकर्ता : पाहिजे.
Page #39
--------------------------------------------------------------------------
________________
30
मी कोण आहे?
दादाश्री : माझी ईच्छा पूर्ण होईल.
प्रश्नकर्ता : 'अक्रम विज्ञान' जर चालू राहिले, तर त्याच्या निमित्ताने चालू राहिल?
दादाश्री : 'अक्रम विज्ञान' चालू राहणार. अक्रम विज्ञान जर वर्ष दोन वर्ष असेच चालू राहिले तर साऱ्या दुनियेत ह्याच्याच गोष्टी चालतील आणि पोहोचतील चरम पर्यंत (पसरेल सगळीकडे). कारण जशी खोटी गोष्ट डोक्यावर चढून बोलते. त्याच प्रकारे खरी गोष्ट पण वरचढ बोलते. खऱ्या गोष्टीचा परिणाम उशीरा होतो आणि खोट्या गोष्टीचा परिणाम लवकर होतो.
अक्रम द्वारा स्त्रीचा पण मोक्ष ! लोकं म्हणतात कि मोक्ष पुरुषाचाच होतो, स्त्रियांचा मोक्ष नाही. यावर मी त्यांना सांगतो कि स्त्रियांचा पण मोक्ष होतो. का नाही होणार? तेव्हा सांगतात कि, त्यांची कपटाची आणि मोहाची ग्रंथी खूप मोठी आहे. पुरुषांची छोटी गाठ असते, तर त्यांची इतकी मोठी सूरण (जमीकंद) इतकी असते.
स्त्री पण मोक्षाला जाणार. जरी सगळे मानत नसतील, तरी पण स्त्री मोक्षासाठी लायक आहे. कारण ती आत्मा आहे आणि पुरुषांच्या संपर्कात आली आहे, म्हणून तीचा पण मार्ग निघेल, पण स्त्रीप्रकृति मध्ये मोह बलवान असल्यामुळे जास्त वेळ लागेल.
काम काढून घ्या! आपले काम काढून घ्यायचे. जेव्हा जरूरी असेल तेव्हा, असे पण नाही कि आपल्याला अवश्य यायला हवे. आपल्याला ठीक वाटले तर या, आणि संसार पसंत असेल, पटत असेल तोपर्यंत व्यापार चालू ठेवा. आम्हाला असे नाही कि हे असेच करा. आणि आम्ही आपल्याला पत्रही
Page #40
--------------------------------------------------------------------------
________________
मी कोण आहे?
____३१
लिहीणार नाही. इथे आला आहात तर आपल्याला सांगू कि, 'भाऊ, लाभ उठवा.' इतकेच सांगू आपल्याला. हजारो सालात असे विज्ञान प्रकट झालेले नाही आहे. म्हणून मी सांगतो कि नंतर जे पण व्हायचे ते होवो, पण हे काम काढून घेण्यासारखे आहे.
(९) 'ज्ञानी पुरुष' कोण?
संत पुरुष : ज्ञानी पुरुष प्रश्नकर्ता : हे जे संत होऊन गेले सगळे, त्यांच्यात आणि ज्ञानी मध्ये किती अंतर?
दादाश्री : संत कोणाचे नांव, कि जो वाईट गोष्टी सोडवतो आणि चांगल्या शिकवतो. वाईट करणे सोडवतो आणि चांगले करणे शिकवतो, त्यांचे नांव संत.
प्रश्नकर्ता : अर्थात् पापकर्मापासून वाचवतात ते संत?
दादाश्री : हो, पापकर्मापासून वाचवतात ते संत पण पाप-पुण्य, दोन्ही पासून वाचवतात, त्याचे नांव ज्ञानी पुरुष.
संत पुरुष सत्य मार्गावर चढवतात आणि ज्ञानी पुरुष मुक्ति देतात. संताना पथिक म्हणतात. पथिक म्हणजे ते स्वतः चालतात आणि दुसऱ्यां पथिकांना सांगतात. 'चला, तुम्ही माझ्या बरोबर.' आणि ज्ञानी पुरुषाला शेवटचे स्टेशन म्हणतात, तिथे तर आपले (मोक्षाचे) कामच होऊन जाते.
खरा, अगदी खरा संत कोण? जो ममतारहित असेल ते. आणि जे दूसरे आहेत, ते थोडे फार ममतावाले असतात. आणि सच्चा ज्ञानी कोण? ज्याला अहंकार आणि ममता दोन्ही नसते. म्हणून संताना ज्ञानी पुरुष नाही म्हणता येत. संताना आत्मज्ञान नसते. हे संत पण जेव्हा ज्ञानी पुरुषांना भेटतील तेव्हा त्यांचा मार्ग निघेल. संताना ही याची आवश्यकता
Page #41
--------------------------------------------------------------------------
________________
३२
मी कोण आहे?
आहे. सगळ्यांना इथे यावे लागेल, सुटकाच नाही. प्रत्येकाची इच्छा हीच असते.
ज्ञानी पुरुषाला म्हणजे दुनियेचे आश्चर्य म्हणतात. ज्ञानी पुरुष म्हणजे प्रकट दिवा म्हणतात.
ज्ञानी पुरुषांची ओळख प्रश्नकर्ता : ज्ञानी पुरुषाला कशा प्रकारे ओळखायचे?
दादाश्री : कसे ओळखायचे? ज्ञानी पुरुष तर काही न करताच ओळखले जातील असे असतात. त्यांचा सुगंधच, ओळखला जाईल असा असतो. त्यांचे वातावरण काही वेगळेच असते. त्यांची वाणी पण काही वेगळीच असते. त्यांच्या शब्दातून कळून जाते. अरे, त्यांचे डोळे बघताच कळून जाते. ज्ञानी कडे खूप विश्वसनियता असते, जबरदस्त विश्वसनियता. आणि त्यांचा प्रत्येक शब्द शास्त्ररूप असतो, जर समजले तर ! त्यांची वाणी-वर्तन आणि विनय मनोहर असते, मनाचे हरण करणारे असतात. अशी बरीच सारी लक्षणे असतात.
ज्ञानी पुरुषात बुद्धि किंचित्मात्र नसते, ते अबुध असतात. बुद्धि किंचित्मात्र नाही असे किती लोक असतील? कधीकाळी त्यांचा जन्म होत असतो, आणि तेव्हा लोकांचे कल्याण होऊन जाते. तेव्हा लाखो मनुष्य (संसारसागर) पार होऊन जातात. ज्ञानी पुरुष अहंकार रहित असतात. थोडापण अहंकार नसतो. तसे तर अहंकार रहित कोणी मनुष्य या संसारात असतच नाही. मात्र ज्ञानी पुरुषच अहंकार रहित असतात.
ज्ञानी पुरुष तर हजारो सालात एखादा जन्मतात. बाकी, संत, शास्त्रज्ञानी तर अनेक असतात, आपल्या इथे शास्त्रांचे ज्ञानी आहेत पण आत्म्याचे ज्ञानी नाहीत. जे आत्मज्ञानी असतील ना, ते तर परम सुखी असतात, त्यांना किंचित्मात्र दुःख नसते. म्हणून तिथे आपले कल्याण होऊन जाईल. जे स्वत:चे कल्याण करून बसलेत, तेच आपले कल्याण
Page #42
--------------------------------------------------------------------------
________________
मी कोण आहे?
__ ३३
करू शकतात. जे तरून पार उतरले, ते आम्हाला तारू शकतात. नाहीतर जो स्वतः डूबतो, तो कधीही तारणार नाही.
(१०) 'दादा भगवान कोण?' 'मी' आणि 'दादा भगवान' नाही एक रे ! प्रश्नकर्ता : तर आपण भगवान कशाप्रकारे म्हणवता?
दादाश्री : मी स्वतः भगवान नाही. भगवानना, 'दादा भगवान'नां तर मी पण नमस्कार करतो. मी स्वतः तीनशे छप्पन डिग्रीवर आहे, आणि 'दादा भगवान' तीनशे साठ डिग्रीवर आहेत. माझी चार डिग्री कमी आहे. म्हणून मी 'दादा भगवान'नां नमस्कार करतो.
प्रश्नकर्ता : हे कशासाठी?
दादाश्री : कारण मला चार डिग्री पूर्ण करायच्या आहेत. मला पूर्ण तर कराव्या लागतील ना? चार डिग्री कमी राहिली. नापास झालो पण पास झाल्याशिवाय सुटका आहे का?
प्रश्नकर्ता : आपल्याला भगवान व्हायचा मोह आहे का?
दादाश्री : मला तर भगवान होणे खूप ओझे वाटते. मी तर लघुतम पुरुष आहे. या दुनियेत माझ्याइतका कोणी लघु नाही इतका मी लघुतम पुरुष आहे. अर्थात् भगवान होणे मला ओझे वाटते, उलट शरम येते.
प्रश्नकर्ता : भगवान व्हायचे नाही तर मग या चार डिग्री पूर्ण करायचा पुरुषार्थ का करायचा आहे?
दादाश्री : ते तर मोक्षाला जाण्यासाठी, मला भगवान होऊन काय करायचे आहे? भगवान तर, भगवत् गुण धारण करतात, ते सर्व भगवान असतात. 'भगवान' शब्द विशेषण आहे. कोणीही मनुष्य ज्याच्यात असे गुण असतील त्याला लोक त्याला भगवान म्हणतातच.
Page #43
--------------------------------------------------------------------------
________________
३४
मी कोण आहे?
येथे प्रकट झाले, चौदालोकांचे नाथ! प्रश्नकर्ता : ‘दादा भगवान' शब्दप्रयोग कशासाठी केला गेला आहे?
दादाश्री : 'दादा भगवान'साठी ! माझ्यासाठी नाही, मी तर ज्ञानी पुरुष आहे.
प्रश्नकर्ता : कोणते भगवान?
दादाश्री : ‘दादा भगवान', चौदालोकांचे नाथ आहेत. ते आपल्यातही आहेत, पण आपल्यात प्रकट नाही झालेत. आपल्यात अव्यक्त रूपात आहेत आणि इथे व्यक्त झाले. व्यक्त झाले ते फळ देतात असे आहेत. एकदा जरी त्यांचे नांव घेतले तरी काम होऊन जाईल असे आहे. पण ओळखून बोललो तर कल्याण होऊन जाईल आणि सांसारिक गोष्टींची काही अडचण असेल तर ती पण दूर होईल. पण त्यात लोभ करू नका आणि लोभ केला तर अंतच नाही येणार. आपल्यास समजले 'दादा भगवान' काय आहेत ते?
हे दिसत आहे ते 'दादा भगवान' नाही आहेत. आपण, हे जे दिसतात, त्यांना 'दादा भगवान' समजत असाल ना? पण हे दिसणारे तर भादरणचे पटेल आहेत. मी 'ज्ञानी पुरुष' आहे आणि 'दादा भगवान' तर आत बसले आहेत, आत प्रकट झालेत ते आहेत. चौदालोकांचे नाथ प्रकट झालेत. त्यांना मी स्वतः पाहिले, स्वतः अनुभवले आहे. म्हणून मी गॅरन्टी ने सांगतो कि ते आत प्रकट झाले आहेत.
आणि हे कोण बोलत आहे? 'टेपरेकार्डर' बोलत आहे. कारण 'दादा भगवानां' मध्ये बोलण्याची शक्ति नाही आहे आणि हे 'पटेल' तर 'टेपरेकॉर्डर'च्या आधारावर बोलतात. कारण 'भगवान' आणि 'पटेल' दोन्ही वेगेळे झाले. म्हणून तेथे अहंकार करू नाही शकत. हे टेपरेकार्डर
Page #44
--------------------------------------------------------------------------
________________
मी कोण आहे?
३५
बोलते, त्याचा मी ज्ञाता-द्रष्टा रहातो. तुमचे पण टेपरेकार्डर बोलते. पण तुमच्या मनात 'मी बोलतो' असा गर्वरस (अहंकार) उत्पन्न होतो. बाकी, आम्हाला सुद्धा 'दादा भगवान'नां नमस्कार करावा लागतो. आमचा दादा भगवानां बरोबर वेगळेपणा (भिन्नता)चा व्यवहार आहे. व्यवहार च वेगळेपणाचा आहे. पण लोक असे समजतात कि हे स्वत:च दादा भगवान आहेत. नाही स्वतः दादा भगवान कसे होऊ शकतो? हे तर पटेल आहेत, भादरणचे.
(११) 'अक्रम मार्ग' मोकळाच (चालूच) आहे
मागे ज्ञानींची वंशावळी ! आम्ही आमच्या मागे ज्ञानींची वंशावळ सोडून जाऊ. आमचे उत्तराधिकारी सोडून जाऊ आणि त्याच्या नंतर ज्ञानींची लिंक चालू राहिल. म्हणून सजीवन मूर्ति शोधा. त्याच्या शिवाय मार्ग निघणार नाही.
मी तर काही लोकांना आपल्या हाताने सिद्धि प्रदान करणार आहे. नंतर कोणी हवे कि नको? नंतर लोकांना मार्ग तर हवा ना?
ज्याला जग स्वीकारणार, त्याचेच चालेल प्रश्नकर्ता : आपण म्हणता कि माझ्या मागे चाळीस-पन्नास हजार रडणारे असतील पण शिष्य एक ही नसणार. म्हणजे आपण काय सांगू इच्छिता?
दादाश्री : माझा शिष्य कोणी नसणार. ही काही गादी नाही आहे. गादी असेल तर वारीस असेल ना. कोणी नातेवाईकांच्या रूपाने वारीस बनायला येतील. इथे तर जे स्वीकार्य असेल, त्याचेच चालेल. जो सगळ्यांचा शिष्य बनेल. त्याचे काम होईल. इथे तर लोक ज्याचा स्वीकार करतील. त्याचेच चालेल. जो लघुतम असेल, त्याला जग स्वीकारेल.
Page #45
--------------------------------------------------------------------------
________________
३६
(१२) आत्मदृष्टि झाल्यानंतर आत्मप्राप्तिचे लक्षण !
मी कोण आहे ?
'ज्ञान' मिळण्याआधी आपण चन्दुभाई होता आणि आता ज्ञान घेतल्यानंतर शुद्धात्मा झालात, तर अनुभवात काही फरक वाटतो का?
प्रश्नकर्ता : हो.
दादाश्री : 'मी शुद्धात्मा आहे' हे भान आपल्याला किती वेळ राहते? प्रश्नकर्ता : एकांतात एकटे बसलेले असतो तेव्हा.
दादाश्री : हो. मग कुठला भाव राहतो? आपल्याला 'मी चन्दुभाई आहे' असा भाव होतो कधी ? आपल्याला रियलमध्ये 'मी चन्दुभाई आहे' हा भाव कधीतरी झाला होता का ?
प्रश्नकर्ता : ज्ञान घेतल्यानंतर नाही झाला.
राहात.
दादाश्री : मग आपण शुद्धात्माच आहात. मनुष्याला एकच भाव राहू शकतो. अर्थात् ‘मी शुद्धात्मा आहे' हे आपल्याला निरंतर राहतेच. प्रश्नकर्ता : पण कित्येक वेळेला व्यवहारात शुद्धात्माचे भान नाही
दादाश्री : तर 'मी चन्दुभाई आहे' हे ध्यानात राहते? तीन तास शुद्धात्माचे ध्यान नाही राहत आणि तीन तासानंतर विचारले. आपण चन्दुभाई आहात कि शुद्धात्मा आहात? तेव्हा काय सांगाल ?
प्रश्नकर्ता : शुद्धात्मा.
दादाश्री : म्हणजे ते ध्यान होते च तेव्हा. एक शेठ आहे, त्याने दारू प्यायली, त्या वेळेस ध्यान सर्व निघून जाईल, पण दारूची नशा उतरल्यानंतर?
Page #46
--------------------------------------------------------------------------
________________
मी कोण आहे?
३७
प्रश्नकर्ता : परत जागृत होईल.
दादाश्री : असा हाही दूसरा, बाहेरचा परिणाम आहे. मी विचारले कि खरोखर आपण चन्दुभाई आहात कि शुद्धात्मा आहात? तेव्हा आपण म्हणतात 'शुद्धात्मा'. दूसऱ्या दिवशी आपल्याला विचारले कि, 'आपण वास्तवात कोण आहात?' तेव्हा आपण म्हणता कि 'शुद्धात्मा'. पाच दिवस मी विचारत राहतो. त्याच्या नंतर मी समजतो कि आपल्या मोक्षाची चावी माझ्याकडे आहे.
आले अपूर्व भान! श्रीमंद राजचंद्र जी काय सांगतात कि,
'सद्गुरु के उपदेश से आया अपूर्व भान,
निजपद निज मांही मिला, दूर भया अज्ञान.' ह्या पूर्वी, देहाध्यासाचे च भान होते. पूर्वी देहाध्यास रहित भान आम्हाला नव्हते. ते अपूर्व भान, आत्म्याचे भान आम्हाला झाले. जे स्वत:चे निजपद होते कि 'मी चन्दुभाई आहे' असे बोलत होतो, तो 'मी' आज निज मांही बसला. जे निजपद होते, ते निजमध्ये बसले आणि जे अज्ञान होते, 'मी चन्दुलाल आहे' हे अज्ञान दूर झाले.
याला देहाध्यास म्हणतात! जग देहाध्यासातून मुक्त नाही होऊ शकत आणि आपल्या स्वरूपात नाही राहू शकत. आपण स्वरूपात राहता म्हणजे अहंकार गेला, ममता गेली. 'मी चन्दुभाई आहे' ह्याला देहध्यास म्हणतात आणि 'मी शुद्धात्मा आहे' हे लक्ष झाले, तेव्हापासून कुठल्या ही प्रकारचा अध्यास नाही राहिला. आता काही राहिले नाही. तरीपण भूलचूक झाल्यावर थोडी घुसमट होते.
शुद्धात्मा पद शुद्धच! हे (आत्म) ज्ञान घेतल्यानंतर पूर्वी जो भ्रम होता कि 'मी करतो'
Page #47
--------------------------------------------------------------------------
________________
३८
मी कोण आहे?
हे भान सुटले. म्हणून शुद्धच आहे, हे भान राहण्यासाठी 'शुद्धात्मा' म्हटले. कोणा बरोबर काहीही होऊ दे, 'चन्दुभाई' शिव्या देऊ दे, तरी पण आपण शुद्धात्मा आहात. मग 'आम्हाला' चन्दुभाई ना सांगायला हवे कि, 'भाऊ, कोणाला दु:ख होईल असे अतिक्रमण का करता? त्यासाठी प्रतिक्रमण करा.'
कोणाला दु:ख झाले असेल असे काही बोलला असाल, ते 'अतिक्रमण' म्हणतात. त्याचे प्रतिक्रमण करायला हवे.
प्रतिक्रमण, म्हणजे आपल्याला समजेल, त्याप्रकारे त्याची माफी मागायला हवी. हा दोष झाला ते मला समजले आणि आता असा दोष मी परत करणार नाही असा निश्चय तुम्ही केला पाहिजे. असे केले हे चुकीचे केले. असे नाही व्हायला पाहिजे, परत असे दुसऱ्यांदा नाही करणार, अशी प्रतिज्ञा करा. तरी दुसऱ्यांदा चुक झाली, हा दोष पुन्हा झाला तर पुन्हा पश्चाताप करा. जितके दोष दिसतात, त्याचा पश्चाताप केला तर तितके कमी झाले. असे करत करत शेवटी हळू हळू दोष संपत जातील.
प्रश्नकर्ता : कोणत्याही व्यक्तिचे प्रतिक्रमण कसे केले पाहिजे?
दादाश्री : मन-वचन-काया, भावकर्म-द्रव्यकर्म-नोकर्म, (त्या व्यक्तिचे) नांव आणि त्याच्या नांवाची सर्व मायापासून, भिन्न अशा त्याच्या शुद्धात्माला आठवण करा, आणि मग ज्या चूकां झाल्यात त्यांना आठवा (आलोचना), त्या चूकांचा मला पश्चाताप होत आहे आणि त्यासाठी मला क्षमा करा (प्रतिक्रमण) परत अशा चूका नाही होणार असा दृढ निश्चय करतो, असे ठरवा (प्रत्याख्यान). 'आपण' स्वतः ‘चन्दुभाई'चा ज्ञाता-द्रष्टा राहतो आणि जाणतो कि 'चन्दुभाई' ने किती प्रतिक्रमण केले, किती सुंदर केले आणि किती वेळा केले.
प्रज्ञा आतून चेतवते ! हे विज्ञान आहे म्हणून आम्हाला याचा अनुभव होतो आणि आतूनच
Page #48
--------------------------------------------------------------------------
________________
मी कोण आहे?
चेतावतो. तेथे (क्रमिकमध्ये) तर आम्हाला करायला लागेल आणि इथे (अक्रममध्ये) आतुनच चेतावतो.
प्रश्नकर्ता : आता आतून चेतावनी मिळते हा अनुभव झाला आहे.
दादाश्री : आता आम्हाला हा मार्ग मिळाला आहे आणि शुद्धात्माची जी बाउन्ड्री (सीमा-रेखा) आहे. त्याच्या पहिल्या दरवाज्यात प्रवेश मिळाला आहे. जेथून कोणी बाहेर नाही काढू शकणार. कोणाला परत बाहेर काढायचा अधिकार नाही आहे, अशा जागेवर आपण प्रवेश घेतला आहे.
नेहमी नेहमी सचेत कोण करते? प्रज्ञा. ज्ञान प्राप्ति शिवाय प्रज्ञाची सुरूवात होत नाही. किंवा सम्यक्त्व प्राप्त झाले तर प्रज्ञाची सुरूवात होते सम्यक्त्व मध्ये प्रज्ञाची सुरुवात कशी होते? द्वितीयेच्या चंद्रासारखी सुरूवात होते. पण आपल्या इथे तर पूर्ण प्रज्ञा उत्पन्न होते. फुल (पूर्ण) प्रज्ञा, म्हणजे ती मोक्षात जाण्यासाठीच चेतावते. भरतराजाला चेतवण्यासाठी तर, नोकर ठेवावे लागत होते. जे दर पंधरा मिनिटाला आवाज देत कि, 'भरतराजा, चेत, चेत, चेत!!!' तीन वेळा आवाज देत. बघा, आपल्याला तर आतूनच प्रज्ञा चेतावनी देते. प्रज्ञा निरंतर चेतावते कि, 'हे, असे नाही.' सारा दिवस चेतवत राहते आणि हाच आत्माचा अनुभव, निरंतर, पूर्ण दिवसच आत्म्याचा अनुभव.
अनुभव आत असणारच ! ज्या दिवशी ज्ञान देतात, त्या रात्रीचा जो अनुभव आहे, तो जात नाही. कशाप्रकारे जाईल मग? आम्ही ज्या दिवशी ज्ञान दिले होते ना, त्या रात्री जो अनुभव होता तो नेहमीसाठी आहे. पण पुन्हा आपली कर्म घेरतात. पूर्वकर्म, जे भोगायचे बाकी आहे, ते 'मागणारे' घेरतात, त्यांचे मी काय करू?
प्रश्नकर्ता : दादाजी, पण आता इतके भोगायला नाही लागत. दादाश्री : ते लागत नाही ही वेगळी गोष्ट आहे, पण मागणारे
Page #49
--------------------------------------------------------------------------
________________
४०
मी कोण आहे?
(कर्म) अधिक असतील, तर त्यांना अधिक घेरतात. पाच वाल्यांना पाच, दोन वाल्यांना दो आणि वीस वाल्यांना वीस. मी तर आपल्याला शुद्धात्मा पदावर बसवले आहे, पण परत मागणारे दुसऱ्या दिवशी आले तर थोडे सफोकेशन होईल.
आता राहिले काय बाकी? ते क्रमिक विज्ञान आहे आणि हे अक्रम विज्ञान आहे. हे ज्ञान तर वीतराग भगवानांचे आहे. ज्ञानात फरक नाही. आम्ही ज्ञान दिल्यानंतर, आपल्याला आत्म अनुभव झाल्यानंतर, काय काम बाकी राहते? तर ज्ञानी पुरुषांच्या आज्ञेचे पालन. 'आज्ञा' हाच धर्म आणि 'आज्ञा' हेच तप. आणि आमची आज्ञा संसारात जराही बाधक नाही होत. संसारात राहून संसाराचा परिणाम नाही होत. असे हे अक्रम विज्ञान आहे.
बाकी जर एक अवतारी व्हायचे असेल तर आमच्या सांगण्या प्रमाणे आज्ञेत चाला. तर हे विज्ञान एक अवतारी आहे. हे विज्ञान आहे तरीपण इथून (भरत क्षेत्रातून) सरळ मोक्षाला जाऊ शकाल असे नाही आहे.
मोक्षमार्गात, आज्ञा हाच धर्म ... ज्याला मोक्षाला जायचे आहे, त्याला क्रियेची गरज नाही, ज्याला देवगतित जायचे आहे, भौतिक सुखांची कामना आहे, त्याना क्रियेची गरज आहे. मोक्षाला जायचे असेल. त्याला ज्ञान आणि ज्ञानीची आज्ञा, या दोघांचीच गरज आहे.
मोक्षमार्गात तप-त्याग काही ही करावे लागत नाही. केवळ ज्ञानी पुरुष मिळाले तर ज्ञानीची आज्ञाच धर्म आणि आज्ञाच तप आणि हेच ज्ञान, दर्शन, चारित्र आणि तप आहे, ज्याचे प्रत्यक्ष फळ मोक्ष आहे.
'ज्ञानी'च्या जवळ रहा! ज्ञानी वर कधी प्रेमभाव नाही आला. जर ज्ञानी वर प्रेमभाव आला
Page #50
--------------------------------------------------------------------------
________________
मी कोण आहे?
____४१
तर, त्यानेच सारे काम होऊन जाईल. प्रत्येक जन्मात बायको मुलांशिवाय दुसरे काही असतच नाही ना.
भगवानने सांगितले कि ज्ञानी पुरुषां कडून सम्यक्त्व प्राप्त झाल्यानंतर ज्ञानी पुरुषाच्या मागेच लागा.
प्रश्नकर्ता : कुठल्या अर्थाने मागे लागून रहायचे?
दादाश्री : मागे लागून रहा म्हणजे हे ज्ञान मिळाल्यानंतर दुसरे काही आराधन करायचे नसते, पण, हे तर आम्ही जाणतो कि हे अक्रम आहे. हे लोक अनेक ‘फाईली' घेऊन आले आहेत. म्हणून आपल्याला फाईलींसाठी मोकळे ठेवले आहे, पण याचा अर्थ असा नाही आहे कि कार्य पूरे झाले. आज-काल फाईली खूप आहेत, म्हणून तुम्हाला माझ्या जवळ ठेवले तर तुमची ‘फाईली' बोलवायला येतील. म्हणून सूट दिली आहे कि घरी जाऊन फाईलींचा समभावाने निकाल (निपटारा) करा. नाहीतर मग ज्ञानीच्या जवळच पडून रहायला पाहिजे.
बाकी, आमच्याकडून जर पूर्ण रूपाने लाभ नाही घेतला जात, तर हे रात्रं-दिवस खटकायला पाहिजे. भले ही फाईली आहेत, पण ज्ञानी पुरुषांने सांगितले आहे ना, आज्ञा दिली आहे ना कि फाईलींचा समभावाने निकाल करा, ही आज्ञा च धर्म आहे ना? हा तर आमचा धर्म आहे. पण हे खटकत राहिले पाहिजे कि अशा फाईली कमी झाल्या तर मी लाभ उठवू शकेन.
त्याला तर महाविदेह क्षेत्र समोर येणार! ज्याला शुद्धात्माचे लक्ष बसले आहे, तो इथे भरतक्षेत्र मध्ये राहू शकतच नाही. इथे ज्याला आत्म्याचे लक्ष बसले आहे, तो महाविदेह क्षेत्र मध्ये पोहोचणार असा नियम आहे. इथे या दुषमकालात राहूच शकत नाही. हे शुद्धात्माचे लक्ष बसले आहे, तो महाविदेह क्षेत्रात एक जन्म अथवा दोन जन्म करून, तीर्थंकरांचे दर्शन घेऊन मोक्ष प्राप्ति करणार असा सोपा, सरळ
Page #51
--------------------------------------------------------------------------
________________
मी कोण आहे ?
मार्ग आहे हा. आमच्या आज्ञेत रहा. आज्ञाच धर्म आणि आज्ञाच तप ! समभावाने निकाल (निपटारा ) करायला हवा. त्या ज्या आज्ञा सांगितल्या आहेत, त्यात जितके रहाता येइल तितके रहावे, पूर्ण रूपाने राहिलात तर भगवान महावीरच्या दशेत राहू शकतात. आपण 'रियल' आणि 'रिलेटिव' बघत जा, तेव्हा आपले चित्त दुसऱ्या जागी नाही भटकणार. पण त्या वेळेला मनातून काही निघाले तर आपण गोंधळात पडतो.
(१३) पाच आज्ञांची महत्वता !
'ज्ञान' पश्चात कुठली साधना ?
प्रश्नकर्ता : या ज्ञानानंतर आता कुठल्या प्रकारची साधना करायला
४२
हवी?
दादाश्री : साधना तर, ह्या पाच आज्ञाचे पालन करतात ना तीच ! आता आणखीन कुठली साधना नाही. दुसरी साधना बंधनकर्ता आहे. या पाच आज्ञा सोडवणाऱ्या आहेत.
समाधी वर्तवतात, अशी आज्ञा !
प्रश्नकर्ता : या ज्या पाच आज्ञा आहेत, याच्या व्यतिरिक्त आणि काही आहे?
दादाश्री : पाच आज्ञा आपल्यासाठी एक कुंपण आहे, तुमच्यासाठी. कारण आत आपला माल कोणी चोरू नाही शकणार. हे कुंपण ठेवल्यामुळे आपल्या आत, आम्ही जे दिले आहे ते एक्झेक्ट, तिथल्या तिथे राहिल, आणि कुंपण कमजोर झाले तर कोणी आत घुसून बिघडवले. तेव्हा परत मला रिपेर करायला यावे लागेल. म्हणून या पाच आज्ञांमध्ये रहाल तोपर्यंत निरंतर समाधीची आम्ही गॅरंटी देतो.
मी पाच वाक्य आपल्या प्रोटेक्शनसाठी देतो. हे ज्ञान तर मी आपल्याला दिले आणि भेदज्ञानाने वेगळेपण केले. पण आता ते वेगळेच
Page #52
--------------------------------------------------------------------------
________________
मी कोण आहे?
राहू दे, या साठी प्रोटेक्शन देतो कि ज्यामुळे हा काळ जो कलियुग आहे, हे कलियुगवाले त्याला लुटून न नेवो. 'बोधबीज'चा अंकुर उगवल्यानंतर पाणी वगैरे शिंपडायला हवे ना? जोपासना करावी लागणार कि नाही करावी लागणार?
४३
दृढ निश्चयच करतो पालन, आज्ञाचे!
दादाजींच्या आज्ञेचे पालन करायचे आहे, हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आमच्या आज्ञेचे पालन करायचा निश्चय करायला हवा. आज्ञेचे पालन होत आहे कि नाही. ते तुम्हाला पाहायचे नाही. आज्ञेचे पालन जितके होऊ शकेल तितके बरोबर, पण तुम्हाला निश्चय करायला हवा कि आज्ञेचे पालन करायचे आहे.
प्रश्नकर्ता : कमी-अधिक पालन होऊ दे, त्याला काही हरकत नाही ना?
दादाश्री : 'हरकत नाही' असे नाही. आपण निश्चय करा कि आज्ञेचे पालन करायचेच आहे. सकाळपासूनच निश्चय करा कि, 'पाच आज्ञेतच रहायचे आहे, पालन करायचे आहे.' निश्चय केला, तेव्हापासून माझ्या आज्ञेत आलात, मला इतकेच हवे आहे. पालन नाही होत, त्याची कॉझीझ (कारणे) मला माहीत आहेत. आम्हाला पालन करायचे आहे, असे निश्चयच करायचा आहे.
आपल्या ज्ञानाने तर मोक्ष मिळणारच आहे. जर कोणी आज्ञेत राहिल तर त्याचा मोक्ष होईल. ह्या बद्दल दोन मत नाही. कुणी जर ज्ञान घेतले असेल आणि आज्ञा पाळत नसेल तरी सुद्धा हे ज्ञान उगवल्या शिवाय रहाणार नाही. म्हणून लोक मला म्हणतात कि, 'ज्ञान प्राप्त झालेले काही लोक आज्ञेचे पालन नाही करत त्याचे काय?' मी सांगतो, 'हे तुला बघायची गरज नाही आहे, हे मला बघायची गरज आहे. ज्ञान माझ्याकडून घेऊन गेलेत ना. तुझे नुकसान नाही ना झाले?' कारण पाप भस्मसात
Page #53
--------------------------------------------------------------------------
________________
४४
मी कोण आहे?
झाल्याशिवाय रहात नाही. आमच्या या पाच वाक्यात राहिलात तर पोहोचाल. आम्ही निरंतर पाच वाक्यातच राहतो आणि आम्ही ज्याच्यात राहतो तीच 'दशा' आपल्याला दिली आहे. आज्ञेत राहिलात तर काम होईल. स्वत:च्या समजुतीने लाख जन्म डोके फोडले तरी काही होणार नाही. हे तर आज्ञा सुद्धा स्वत:च्या अक्कलेने पाळतात आणि आज्ञा समजतात स्वत:च्याच समजुतीने. म्हणून तिथे पण थोडे थोडे लिकेज होत रहाते. तरीपण आज्ञा पालनच्या मागे त्याचे स्वतःचे भाव तर असेच आहेत कि 'आज्ञा पाळायची आहे' म्हणून जागृति हवी.
आज्ञा पालन करायला विसरलात तर प्रतिक्रमण करा. मनुष्य आहे, तर विसरणार. पण विसरल्यानंतर प्रतिक्रमण कर कि 'हे दादाजी, हे दोन तास विसरलो, आपली आज्ञा विसरलो. पण मला तर आज्ञा पालन करायचीच आहे, मला क्षमा करा.' तर मागचे सारे माफ. शंभरा पैकी शंभर मार्क पूरे. मग त्याची जिम्मेदारी नाही राहिली. आज्ञेत आले तर त्याला सारी दुनिया नाही स्पर्श करू शकत. आमच्या आज्ञेचे पालन करण्यामुळे आपल्याला काही स्पर्श नाही करणार. तर आज्ञा देणाऱ्याला चिकटणार? नाही, कारण परहेतु साठी आहे. म्हणून त्याला स्पर्शणार नाही आणि डिझॉल्व होऊन जाईल.
ही तर आहे भगवानची आज्ञा!!!
दादाजींच्या आज्ञेचे पालन करणे म्हणजे ती 'ए.एम.पटेल' ची आज्ञा नाही आहे. स्वतः 'दादा भगवान'ची जे चौदालोकांचे नाथ आहेत. त्यांची आज्ञा आहे. त्याची गॅरंटी देत आहे. हे तर माझ्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी निघल्या आहेत. म्हणून आपल्याला त्या आज्ञांचे पालन करायचे आहे. 'माझी आज्ञा' नाही आहे, ही दादा भगवानांची आज्ञा आहे. मी पण त्या भगवानांच्या आज्ञेत राहतो ना !
- जय सच्चिदानंद
Page #54
--------------------------------------------------------------------------
________________
नित्यक्रम
*
(५)
प्रात:विधि श्री सीमंधर स्वामींना नमस्कार करत आहे.
(५) __वात्सल्यमूर्ति दादा भगवान यांना नमस्कार करत आहे.
प्राप्त मन-वचन-कायाने या जगातील कोणत्याही जीवाला किंचित्मात्र पण दुःख न हो, न हो, न हो. केवळ 'शुद्धात्मानुभव' शिवाय या जगातील कोणतीही विनाशी वस्तु मला खपत नाही. प्रगट ज्ञानी पुरुष 'दादा भगवान'यांचे वीतराग विज्ञानाचे यथार्थतेने संपूर्णपणे, सर्वांगपणे केवळज्ञान, केवळदर्शन आणि केवळचारित्र मध्ये परिणमन हो, परिणमन हो, परिणमन हो.
(५) नमस्कार विधि प्रत्यक्ष 'दादा भगवानां'च्या साक्षीने वर्तमानात महाविदेह क्षेत्रात विचरत असणारे, तीर्थंकर भगवान श्री सीमंधर स्वामींना अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार करीत आहे.
(४०) प्रत्यक्ष 'दादा भगवानांच्या साक्षीने वर्तमानात महाविदेह क्षेत्रात तसेच अन्य क्षेत्रात विचरत असणारे 'ॐ परमेष्टि भगवंतां'ना अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार करीत आहे. प्रत्यक्ष दादा भगवानां'च्या साक्षीने वर्तमानात महाविदेह क्षेत्रात तसेच अन्य क्षेत्रात विचरत असणारे 'पंच परमेष्टि भगवंतां'ना अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार करीत आहे. प्रत्यक्ष 'दादा भगवानां'च्या साक्षीने वर्तमानात महाविदेह क्षेत्रात तसेच अन्य क्षेत्रात विहरमान 'तीर्थंकर साहेबां' ना अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार करीत आहे. वीतराग शासन देव-देवींना अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार करीत आहे. (५)
*
(५)
(५)
*
Page #55
--------------------------------------------------------------------------
________________
निष्पक्षपाती शासन देव - देवींना अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार करीत आहे. (५)
चोवीस तीर्थंकर भगवंतांना अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार करीत आहे. (५) 'श्रीकृष्ण भगवानां'ना अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार करीत आहे. (५) भरतक्षेत्रात सद्या विचरत असणारे सर्वज्ञ ' श्री दादा भगवानां' ना निश्चयाने अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार करीत आहे. (५) ‘दादा भगवानां' च्या सर्व समकितधारी महात्मांना अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार करीत आहे. (५) संपूर्ण ब्रह्मांडच्या जीवमात्रच्या 'रियल' स्वरूपला अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार करीत आहे. (५) ‘रियल’ स्वरूप हे भगवत स्वरूप आहे तेव्हा संपूर्ण जगा ला ‘भगवत स्वरूपात' दर्शन करीत आहे. (५)
'रियल' स्वरूप हे शुद्धात्मा स्वरूप आहे, तेंव्हा संपूर्ण जगा ला शुद्धात्मा स्वरूपात दर्शन करीत आहे. (५) 'रियल' स्वरूप हे तत्त्व स्वरूप आहे, तेंव्हा संपूर्ण जगा ला तत्त्वज्ञानाने दर्शन करीत आहे. (५)
(वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामींना परम पूज्य 'दादा भगवानां' च्या माध्यमातून प्रत्यक्ष नमस्कार पोहचतो. कंसात लिहलेल्या संख्या आहेत तेवढे वेळा दिवसातून एकदा वाचायचे.)
शुद्धात्मा प्रति प्रार्थना
हे अंतर्यामी परमात्मा ! आपण प्रत्येक जीवमात्र मध्ये विराजमान आहात, तसेच माझ्यामध्ये पण विराजमान आहात, आपले स्वरूप हेच माझे स्वरूप आहे, माझे स्वरूप शुद्धात्मा आहे.
हे शुद्धात्मा भगवान ! मी आपल्याला अभेदभावे अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार करीत आहे.
Page #56
--------------------------------------------------------------------------
________________
अज्ञानतामुळे मी जे जे काही * * दोष केले आहेत त्या सर्व दोषांना आपल्या समक्ष जाहीर करीत आहे. त्याचे हृदयपूर्वक खूप पश्चाताप करीत आहे आणि आपल्याजवळ क्षमा प्रार्थित आहे. हे प्रभू! मला क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा आणि पुन्हा असे दोष करणार नाही अशी आपण मला शक्ति द्या, शक्ति द्या, शक्ति द्या.
हे शुद्धात्मा भगवान! आपण अशी कृपा करावी कि आमचे भेदभाव मिटून जावे आणि अभेदस्वरूप प्राप्त व्हावे. आम्ही आपल्यात अभेदस्वरूपाने तन्मयाकार होऊ. ★ ★ (जे जे दोष झाले आहेत, ते मनात जाहीर करावे.)
नऊ कलमे
१. हे दादा भगवान ! मला कोणत्याही देहधारी जीवात्माचा किंचित्मात्र पण
अहम् नाही दुभावणार, नाही दुभावले जाणार की दुभावण्या प्रति अनुमोदन नाही केले जाणार अशी परम शक्ति द्या. मला कोणत्याही देहधारी जीवात्माचा किंचित्मात्र पण अहम् नाही दुभावणार, अशी स्यावाद वाणी, स्यावाद वर्तन आणि स्याद्वाद मनन करण्याची परम शक्ति द्या. हे दादा भगवान! मला कोणत्याही धर्माचे किंचित्मात्र पण प्रमाण नाही दुभावणार, नाही दुभावले जाणार अथवा दुभावण्या प्रति अनुमोदन नाही केले जाणार अशी परम शक्ति द्या. मला कोणत्याही धर्माचे किंचित्मात्र पण प्रमाण नाही दुभावणार, अशी स्याद्वाद वाणी, स्याद्वाद वर्तन आणि स्याद्वाद मनन करण्याची परम
शक्ति द्या. ३. हे दादा भगवान! मला कोणत्याही देहधारी उपदेशक, साधु, साध्वी की
आचार्य यांचा अवर्णवाद, अपराध, अविनय न करण्याची परम शक्ति
द्या. ४. हे दादा भगवान ! मला कोणत्याही देहधारी जीवात्मा प्रति किंचित्मात्र पण
Page #57
--------------------------------------------------------------------------
________________
५.
६.
७.
८.
अभाव,
तिरस्कार कधीही नाही केला जाणार, नाही करविले जाणार की कर्ताचे प्रति अनुमोदन नाही केले जाणार अशी परम शक्ति द्या.
हे दादा भगवान ! मला कोणत्याही देहधारी जीवात्माशी कधीपण कठोरभाषा, तंतीली(टोचणारी) भाषा न बोलण्याची, न बोलावयाची की बोलण्या प्रति अनुमोदन नाही करण्याची अशी परम शक्ति द्या.
कोणी कठोरभाषा, तंतीलीभाषा बोलले तर मला मृदु-ऋजु भाषा बोलण्याची परम शक्ति द्या.
हे दादा भगवान! मला कोणत्याही देहधारी जीवात्मा प्रति स्त्री-पुरुष किंवा नपुंसक, कोणता ही लिंगधारी असो, तर त्या संबंधी किंचित्मात्र पण विषयविकार संबंधी दोषं, इच्छां, चेष्टां किंवा विचार संबंधी दोषं न करण्याची, न करविण्याची की कर्ता प्रति अनुमोदन न करण्याची अशी परम शक्ति द्या.
मला निरंतर निर्विकार राहण्याची परम शक्ति द्या.
हे दादा भगवान! मला कोणत्याही रसमध्ये लुब्धपणा न करण्याची अशी शक्ति द्या. समरसी आहार घेण्याची परम शक्ति द्या.
हे दादा भगवान ! मला कोणत्याही देहधारी जीवात्माचा प्रत्यक्ष अथवा परोक्ष, जीवंत अथवा मृत्यु पावलेल्या, कोणाचाही किंचित्मात्र पण अवर्णवाद, अपराध, अविनय नाही करणार, नाही करविले जाणार की कर्ता प्रति अनुमोदन नाही केले जाणार अशी परम शक्ति द्या.
हे दादा भगवान! मला जगत कल्याण करण्याचे निमित्त बनण्याची परम शक्ति द्या, शक्ति द्या, शक्ति द्या.
(हे दिवसातून तीन वेळा वाचावे)
एवढेच तुम्ही ‘दादा' जवळ मागायचे. ही दररोज मिकेनिकली (यंत्रवत्) वाचण्याची वस्तु नाही, अंतरात ठेवण्याची वस्तु आहे. ही दररोज उपयोगपूर्वक भावण्याची वस्तु आहे. एवढ्या पाठांत तमाम शास्त्रांचा सार येऊन जातो.
Page #58
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण विधि
प्रत्यक्ष ‘दादा भगवानां'च्या साक्षीने देहधारी ★ च्या मन-वचन-कायाचे योग, भावकर्म, द्रव्यकर्म, नोकर्महून भिन्न असे हे शुद्धात्मा भगवान! आपल्या साक्षीने आजच्या दिवसाच्या अद्यक्षण पर्यंत जे जे ★ ★ .... दोष झाले आहेत, त्यांची क्षमा मागत आहे, पश्चाताप करत आहे. आलोचना, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान करत आहे आणि परत असे दोष कधीही करणार नाही, असा दृढ निश्चय करत आहे, मला क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा.
हे दादा भगवान! मला असे कुठले ही दोष न करण्याची परम शक्ति द्या, शक्ति द्या, शक्ति द्या.
★ ज्याच्या प्रति दोष झाला असेल त्या (समोरच्या) व्यक्तिचे नांव म्हणायचे. ★★ जे दोष झाले असतील ते मनात जाहीर करणे.
ज्ञानसाक्षात्कार प्राप्ति हेतु व्यवहारविधि
प्रकट ‘ज्ञानी पुरुष' ‘दादा भगवानांना' अत्यंत भक्तिने नमस्कार करत आहे, नमस्कार करत आहे, नमस्कार करत आहे.
प्रकट 'ज्ञानी पुरुष' द्वारा ज्यांना 'सत्' प्राप्त झाले आहे, त्या 'सत् पुरुषांना' अत्यंत भक्तिने नमस्कार करत आहे, नमस्कार करत आहे, नमस्कार करत आहे.
सर्व निष्पक्षपाती ‘देव - देवींना' अत्यंत भक्तिने नमस्कार करीत आहे, नमस्कार करीत आहे, नमस्कार करीत आहे.
हे प्रकट 'ज्ञानी पुरुष' आणि हे सर्व 'सत् पुरुष' आज, भडकलेल्या आगीत जळत असलेल्या या जगाचे कल्याण करा, कल्याण करा, कल्याण करा. आणि त्यात मी निमित्त होवो अश्या शुद्ध भावनेने आपल्या समक्ष मन-वचनकायाच्या एकाग्रतेने प्रार्थनाविधि करत आहे, जी आत्यंतिक सफळ होवो, सफळ होवो, सफळ होवो.
हे दादा भगवान ! आपल्या शुद्ध ज्ञानात अवलोकन झालेले आणि आपल्या श्रीमुखातून प्रकटलेले शुद्ध ज्ञानसूत्र खाली दिल्याप्रमाणे आहे :
Page #59
--------------------------------------------------------------------------
________________
(३)
__ (३)
"मन, वचन, कायाचे तमाम लेपायमान भाव जे आहे त्यापासून 'शुद्ध चेतन' सर्वथा निर्लेप च आहे.
(३) “मन, वचन, कायाच्या तमाम संगी क्रियांपासून 'शुद्ध चेतन' पूर्णपणे असंग च आहे.'
(३) "मन, वचन, कायाच्या सवयी आणि त्यांच्या स्वभावाला 'शुद्ध चेतन' जाणतो आणि स्वत:च्या स्व-स्वभावाला पण 'शुद्ध चेतन' जाणतो.' कारण कि तो स्व-पर प्रकाशक आहे.
"आहारी आहार करतो आहे आणि निराहारी 'शुद्ध चेतन' मात्र त्याला जाणत आहे."
'स्थूल संयोग, सूक्ष्म संयोग, वाणीचे संयोग पर आहेत आणि पराधीन आहेत, आणि 'शुद्ध चेतन' त्यांचा ज्ञाता-दृष्टा मात्र आहे."
"स्थूलतमपासून सूक्ष्मतमपर्यंत तमाम सांसारिक अवस्थांचा 'शुद्ध चेतन' ज्ञाता-दृष्टा मात्र आहे, टंकोत्कीर्ण आहे, आनंदस्वरूप आहे." (३)
"मन, वचन, कायाची अवस्था मात्र कुदरती (नैसर्गिक) रचना (Only scientific circumstantial evidence) आहे. ज्याचा कोणी बाप ही रचनाकार नाही आणि ते 'व्यविस्थत' आहे."
(३) "निश्चेतन-चेतनचा एक पण गुण, 'शुद्ध चेतन'मध्ये नाही आणि 'शुद्ध चेतन'चा एक पण गुण निश्चेतन-चेतनमध्ये नाही. दोन्ही सर्वथा पूर्णपणे भिन्न आहेत."
(३)
"चंचल भागांचे जे जे भाव आहे ते निश्चेतन-चेतनचे भाव आहे आणि 'शुद्ध चेतन,' कि जे अचल आहे त्याचे भाव नाहीत."
(३) हे प्रभू ! भ्रांतिमुळे मला 'शुद्ध चेतन'चे भाव वरील सूत्रांनुसार 'हे' च आहेत असे यथार्थ जसे आहे तसे समजले नाही, कारण कि निष्पक्षपाती भावानी मी स्वतः स्वत:ला पाहीले तेव्हा मला समजले कि माझ्यातून अंतरक्लेश तथा क्रोधबैचेनी(कढापा-अजंपा) गेलेले नाही. हे प्रभू ! माझा अंतरक्लेशला शमन करण्याची परम शक्ति द्या. आता माझ्या या शुद्ध भावना जसे आहे तसे समजण्या शिवाय मला इतर काही कामना नाही, मी केवळ मोक्षाचाच कामी आहे. त्या हेतुने माझी दृढ
Page #60
--------------------------------------------------------------------------
________________
अभिलाषा आहे कि मी 'सत् पुरुषांच्या विनय' मध्ये आणि 'ज्ञानी पुरुषांच्या परम विनय' मध्ये राहून, मी काहीच जाणत नाही, या भावनेत च राहो.
वरील ज्ञानसूत्रांनुसार शुद्ध भाव माझ्या श्रद्धेत येत नाही आणि ज्ञानातही येत नाहीत. जर हे भाव माझ्या दृढ श्रद्धेत येतील तरच मी अनुभवेल कि मला यथार्थ सम्यक् दर्शन झाले आहे. यासाठी दोनच वस्तुंची मुख्य जरूरी आहे :
१) मी 'परम - सत्य जाणण्याचा च कामी आहे' ही भाव - निष्ठा.
२) ‘परम-सत्य’‘ज्ञानी पुरुष' ह्यांच्या आज्ञांच्या संपूर्ण आराधननेनी च प्राप्त
होते.
'ज्ञानी पुरुष ' च्या प्रत्यक्ष योग शिवाय अन्य काही च मार्ग नाही, त्यासाठी प्रत्यक्ष ‘ज्ञानी पुरुष' च्या शोधातच राहू आणि त्यांच्या योग प्राप्त झाल्यावर मी त्यांच्याच आज्ञांचा आराधनेमध्ये रहाण्याचा दृढ निर्णय - निश्चय करीत आहे. ही माझी कामना सफळ होवो, सफळ होवो, सफळ होवो.
जय सच्चिदानंद
आत्मज्ञानी पुरुष ए. एम. पटेल यांचामध्ये प्रकट झालेल्या
""
11
'दादा भगवानना असीम जय जयकार हो (दादा भगवानांचा असीम जय जयकार हो)
(दररोज कमीत कमी १० मिनिट ते ५० मिनिट पर्यंत बोलायचे.)
Page #61
--------------------------------------------------------------------------
________________
प्राप्तिस्थान
दादा भगवान परिवार अडालज : त्रिमंदिर संकुल, सीमंधर सिटी, अहमदाबाद- कलोल हाईवे,
पोस्ट : अडालज, जि.-गांधीनगर, गुजरात - 382421.
फोन : (079) 39830100, E-mail : info@dadabhagwan.org अहमदाबाद : दादा दर्शन, ५, ममतापार्क सोसाइटी, नवगुजरात कॉलेज के पीछे
उस्मानपुरा, अहमदाबाद-380014. फोन : (079) 27540408 राजकोट : त्रिमंदिर, अहमदाबाद-राजकोट हाईवे, तरघड़िया चोकड़ी (सर्कल),
पोस्ट : मालियासण, जि.-राजकोट. फोन : 9274111393 मोरबी : त्रिमंदिर, मोरबी-नवलखी हाईवे, पो- जेपुर, ता-मोरबी,
जि.-राजकोट. फोन : (02822) 297097 भुज
त्रिमंदिर, हिल गार्डन के पीछे, एयरपोर्ट रोड. फोन : (02832) 290123 गोधरा : त्रिमंदिर, भामैया गाँव, एफसीआई गोडाउन के सामने, गोधरा
(जि.-पंचमहाल). फोन : (02672) 262300 वडोदरा : दादा मंदिर, १७, मामा की पोल-मुहल्ला, रावपुरा पुलिस स्टेशन के
सामने, सलाटवाड़ा, वडोदरा. फोन : 9924343335 मुंबई : 9323528901 दिल्ली : 9810098564 कोलकता : 033-32933885 चेन्नई : 9380159957 जयपुर : 9351408285 भोपाल :9425024405 इन्दौर : 9893545351 जबलपुर :9425160428 रायपुर : 9329523737 भिलाई : 9827481336 पटना : 9431015601
अमरावती : 9422915064 : 9590979099 हैदराबाद : 9989877786
: 9422660497 जलंधर : 9814063043 U.S.A.: Dada Bhagwan Vignan Institute :
100, SW Redbud Lane, Topeka, Kansas 66606 Tel. : +1877-505-DADA (3232).
Email: info@us.dadabhagwan.org U.K. : +44 330 111 DADA (3232) UAE : +971 557316937 Kenya : +254 722 722 063 Singapore : +65 81129229 Australia : +61 421127947 _New Zealand: +64 21 0376434
Website : www.dadabhagwan.org
बेंगलूर
पूना
Page #62
--------------------------------------------------------------------------
________________ जीवनाचे ध्येय जर हा संसार आपल्याला अनुकूल वाटत असेल तर पुढे काहीही समजून घेण्याची गरज नाही, आणि जर हा संसार आपल्याला प्रतिकूल( हरकतकर्ता )वाटत असेल तर अध्यात्म जाणून घेण्याची आवश्यकता आहे. अध्यात्मात, 'स्वरूप' जाणणे खूप गरजेचे आहे. 'मी कोण आहे,' हे जाणले कि सर्व पझल्स (कोडी) सॉल्व होतात. - दादाश्री 9-788189-93336 Printed in India dadabhagwan.org MRP Rs10