________________
३६
(१२) आत्मदृष्टि झाल्यानंतर आत्मप्राप्तिचे लक्षण !
मी कोण आहे ?
'ज्ञान' मिळण्याआधी आपण चन्दुभाई होता आणि आता ज्ञान घेतल्यानंतर शुद्धात्मा झालात, तर अनुभवात काही फरक वाटतो का?
प्रश्नकर्ता : हो.
दादाश्री : 'मी शुद्धात्मा आहे' हे भान आपल्याला किती वेळ राहते? प्रश्नकर्ता : एकांतात एकटे बसलेले असतो तेव्हा.
दादाश्री : हो. मग कुठला भाव राहतो? आपल्याला 'मी चन्दुभाई आहे' असा भाव होतो कधी ? आपल्याला रियलमध्ये 'मी चन्दुभाई आहे' हा भाव कधीतरी झाला होता का ?
प्रश्नकर्ता : ज्ञान घेतल्यानंतर नाही झाला.
राहात.
दादाश्री : मग आपण शुद्धात्माच आहात. मनुष्याला एकच भाव राहू शकतो. अर्थात् ‘मी शुद्धात्मा आहे' हे आपल्याला निरंतर राहतेच. प्रश्नकर्ता : पण कित्येक वेळेला व्यवहारात शुद्धात्माचे भान नाही
दादाश्री : तर 'मी चन्दुभाई आहे' हे ध्यानात राहते? तीन तास शुद्धात्माचे ध्यान नाही राहत आणि तीन तासानंतर विचारले. आपण चन्दुभाई आहात कि शुद्धात्मा आहात? तेव्हा काय सांगाल ?
प्रश्नकर्ता : शुद्धात्मा.
दादाश्री : म्हणजे ते ध्यान होते च तेव्हा. एक शेठ आहे, त्याने दारू प्यायली, त्या वेळेस ध्यान सर्व निघून जाईल, पण दारूची नशा उतरल्यानंतर?