________________
मी कोण आहे?
(१) 'मी' कोण आहे?
वेगळे, नांव आणि 'स्वतः' दादाश्री : काय नांव आहे आपले? प्रश्नकर्ता : माझे नांव चन्दुलाल आहे. दादाश्री : खरोखर आपण चन्दुलाल आहात? प्रश्नकर्ता : हो.
दादाश्री : चन्दुलाल तर आपले नांव आहे. चन्दुलाल आपले नांव नाही का? आपण 'स्वतः' चन्दुलाल आहात कि आपले नांव चन्दुलाल आहे?
प्रश्नकर्ता : हे तर नांव आहे.
दादाश्री : हो, तर मग 'आपण' कोण? जर 'चन्दुलाल' आपले नांव आहे तर 'आपण' कोण आहात? आपले नांव आणि आपण वेगळे नाहीत का? 'आपण' नावापासून वेगळे आहात तर 'आपण' (स्वतः) कोण आहात? ही गोष्ट आपल्या लक्षात येत आहे ना, कि मी काय सांगू इच्छीत आहे? 'हा माझा चष्मा' सांगितले तर चष्मा आणि आम्ही वेगळे झालो ना? असेच तुम्ही सुद्धा नांवापासून वेगळे आहात, असे आता नाही वाटत? जसे