________________
संपादकीय जीवनात जे काही समोर येते, त्याचे पूर्ण रूपाने रियलाइजेशन केल्याशिवाय मनुष्य त्याला आपलेसे करत नाही. सगळ्याचे रियलाइजेशन केले. मात्र 'सेल्फ' रियलाइजेशनच केले नाही. अनंत जन्मापासून 'मी कोण आहे?' त्याची ओळखच अडकलेली आहे, म्हणून तर या भटकंतीचा अंत होत नाही. त्यांची ओळख कशी होईल?
ज्याला स्वत:ची ओळख झाली आहे, तीच व्यक्ति अन्य व्यक्तिना सहजपणे ओळख करून देऊ शकते. अशी विभूती म्हणजे स्वयं 'ज्ञानी पुरुष'च! की ज्यांना या संसारात काहीही जाणणे, की काहीही करण्याचे बाकी राहिले नाही तेच। असे ज्ञानी पुरुष परम पूज्य दादाश्री, या काळात आमच्या मध्ये येउन, आमच्या भाषेत, आम्ही समजू शकतो अश्या सरळ भाषेत, प्रत्येकाचा मूळ प्रश्न 'मी कोण आहे' याचे उत्तर सहजतेने सोडवतात.
इतकेच नाही, परंतु हा संसार काय आहे? कशा प्रकारे चालत आहे? कर्ता कोण? भगवान काय आहेत? मोक्ष काय आहे? ज्ञानी पुरुष कोणाला म्हणतात? सीमंधर स्वामी कोण आहेत? संत, गुरु आणि ज्ञानी पुरुष यात काय फरक आहे? ज्ञानींना कशा प्रकारे ओळखायचे? ज्ञानी काय करू शकतात? आणि त्यातही परम पूज्य दादाश्रींचा अक्रम मार्ग काय आहे? क्रमा क्रमाने तर मोक्षमार्गावर अनंत जन्मापासून चढतच आलो आहोत, 'लिफ्ट' पण मोक्षमार्गात असू शकते ना?! अक्रम मार्गाने, या काळात. संसारात राहूनही मोक्ष आहे आणि मोक्ष कशा प्राप्त करावा याची पूर्ण समज आणि योग्य दिशेची प्राप्ति परम पूज्य दादाश्रींनी करून दिली आहे... ___मी कोण आहे' ह्याची ओळख झाल्यानंतर कशी अनुभूति राहते? तर संसारातील व्यवहार निभावत असतानाही संपूर्ण निर्लेप आत्मस्थितिच्या अनुभूती मध्ये राहू शकतो. आधि-व्याधि आणि उपाधि मध्येही निरंतर स्वसमाधि राहू शकते, असा अक्रम विज्ञानाच्या प्राप्ति नंतर हजारों महात्मांचा अनुभव आहे. या सगळ्याच्या प्राप्ति हेतू प्रस्तुत संकलन मोक्षार्थीसाठी मोक्षमार्गात दीपस्तंभ बनून राहिल हीच प्रार्थना.
- डॉ. नीरूबहन अमीन ह्यांचे जय सच्चिदानंद