________________
मी कोण आहे ?
न दिसणारे, प्रत्येक जीवात विद्यमान आहे, पण मानव निर्मित कुठल्या ही वस्तुत नाहीत.)
१४
ही टेपरेकॉर्डर ' क्रिएशन' म्हणतात. जितक्या मॅनमेड ( मानव निर्मित) वस्तु आहेत, मनुष्याने बनविलेल्या वस्तु आहेत, त्यात भगवान नाहीत. ज्या नैसर्गिक रचना आहेत त्यात भगवान आहे. टे
अनुकूलते चा सिद्धांत !
कितीतरी सारे संयोग एकत्र झाल्यानंतर कुठलेही कार्य होते, म्हणजे हा सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स आहे. याच्यात इगोइझम (अहंकार) करून, 'मी केले' म्हणून मिरवत राहता. पण चांगले झाल्यावर 'मी केले' आणि बिघडल्यावर 'माझे संयोग सध्या ठीक नाही' अशी आमची लोकं म्हणतात ना ? संयोगाला मानता ना, आमची लोकं?
प्रश्नकर्ता : हां.
दादाश्री : कमाई होते तेव्हा त्याचा गर्वरस स्वतः चाखता आणि जेव्हा नुकसान होते तेव्हा बहाने काढतात. आम्ही विचारले, 'शेठजी, असे का झाले आता?' तेव्हा ते म्हणतात, 'भगवान रुसले आहे. '
प्रश्नकर्ता : स्वत:ला अनुकूल, असा सिद्धांत झाला.
दादाश्री : हो, स्वत:ला अनुकूल, पण असा आरोप त्याच्यावर (भगवानवर) नाही लावला पाहिजे. वकीलावर आरोप लावला किंवा दुसऱ्यावर आरोप लावला तर ठीक आहे पण भगवंतावर आरोप करू शकतो का? वकील तर दावा करून हिशोब मागेल, पण ह्याचा दावा कोण दाखल करणार? ह्याचे फळ तर पुढच्या जन्मी ( संसाराची ) भयंकर बेडी मिळेल. ईश्वरावर आरोप करू शकतो का?
प्रश्नकर्ता : नाही करू शकत.