________________
मी कोण आहे?
आहे. स्वतः, 'स्वतः पासून गुप्त राहायचे आणि दुसऱ्यांचे सगळे काही जाणणे, हे अजबच आहे ना! स्वतः स्वत:पासून किती काळपर्यंत गुप्त राहणार? कधीपर्यंत राहणार? 'स्वतः कोण आहे' हे ओळखण्यासाठी च हा जन्म आहे. मनुष्य जन्म ह्यासाठीच आहे कि 'स्वतः कोण आहे' ह्याचा शोध घ्या. नाहीतर तोपर्यंत भटकत राहणार. 'मी कोण आहे' हे जाणावे लागेल ना? 'आपण स्वतः कोण आहोत' हे जाणावे लागेल कि नाही जाणावे लागणार? (३) 'I' आणि 'My' ला अलग करण्याचा प्रयोग
सेपरेट 'I' and 'My' आपल्याला सांगितले कि, सेपरेट 'I' and 'My' with सेपरेटर तर आपण 'I' आणि 'My'ला सेपरेट करू शकणार काय? 'I' आणि 'My'ला सेपरेट करायला हवे कि नाही? आणि हे कधी ना कधी जाणावे लागेल ना. सेपरेट 'I' आणि 'My', जसे दुधासाठी सेपरेटर असते ना, त्यातून मलई सेपरेट (वेगळी) करतात ना? असेच हे वेगळे करायचे
आहे.
आपल्याजवळ 'My' जशी कुठली गोष्ट आहे? 'I' एकटाच आहे कि 'My' बरोबर आहे?
प्रश्नकर्ता : 'My' बरोबर असणार ना. दादाश्री : काय काय 'My' आहे आपल्याजवळ? प्रश्नकर्ता : माझे घर आणि घरातील सगळ्या वस्तु.
दादाश्री : सर्व आपली म्हणणार? आणि वाईफ कोणाची म्हणणार?
प्रश्नकर्ता : ती पण माझी.