________________
मी कोण आहे?
दादाश्री : आणि मुले कोणाची? प्रश्नकर्ता : ती पण माझी. दादाश्री : आणि हे घड्याळ कोणाचे? प्रश्नकर्ता : ते पण माझे. दादाश्री : आणि हे हात कोणाचे? प्रश्नकर्ता : हात पण माझे आहेत.
दादाश्री : मग माझे डोकं, माझे शरीर, माझे पाय, माझे कान, माझे डोळे असे सांगाल। या शरीराच्या साऱ्या वस्तुंना 'माझे' म्हणतात, तेव्हा 'माझे' म्हणणारे 'आपण' कोण आहात? ह्याचा विचार नाही केला? 'My' नेम इज चन्दुलाल' म्हणणार आणि मग बोलणार 'मी चन्दलाल आहे.' यात विरोधाभास नाही जाणवत?
प्रश्नकर्ता : जाणवत आहे.
दादाश्री : आपण चन्दुलाल आहात, पण याच्यात 'I' आणि 'My' दोन आहेत. हे 'I' आणि 'My' चे दोन रेल्वे लाईन वेगळ्याच असतात. परेललच असतात, कधी एकाकार (एकत्र) होतच नाहीत. तरीपण आपण एकाकार मानता, याला समजून यातून 'My' ला सेपरेट करा. आपल्यात जो 'My' आहे. त्याला एका बाजूला ठेवा. 'My' हार्ट, तर त्याला एका बाजुला ठेवा. या शरीरातून अजून काय काय सेपरेट करावे लागेल?
प्रश्नकर्ता : पाच इन्द्रिये.
दादाश्री : हो, सर्व च. पाच इन्द्रिये, पाच कर्मेन्द्रिये. आणि मग 'माय माइन्ड' म्हणतात कि 'आय एम माइन्ड' म्हणतात?
प्रश्नकर्ता : 'माय माइन्ड' (माझे मन) म्हणतात.