________________
१६
मी कोण आहे?
दादाश्री : जसे आता आपण इथे आलात, त्यात तुमच्या हातात काही नाही. ही तर आपली मान्यता आहे. ईगोइजम करता कि, 'मी आलो आणि मी गेलो.' हे जे आपण म्हणता कि, 'मी आलो' तर मग मी विचारतो, 'काल का नाही आलात?' तेव्हा असे पाय दाखवले, ह्यातून काय समजायचे?
प्रश्नकर्ता : पाय दु:खत होते.
दादाश्री : हो, पाय दुःखत होते, पायांचे कारण दिले तर नाही समजणार, कि येणारे तुम्ही कि पाय येणारे?
प्रश्नकर्ता : मग मीच आलो म्हणणार ना?
दादाश्री : आपणच आला आहात ना? जर पाय दु:खत असतील तरी पण आपण येणार का?
प्रश्नकर्ता : माझी स्वत:ची इच्छा होती यायची. म्हणून आलो आहे.
दादाश्री : हो, इच्छा होती आपली, म्हणून आलात. पण हे पाय वगैरे ठीक होते म्हणून येऊ शकलात ना? ठीक नसते तर?
प्रश्नकर्ता : तर नसतो येऊ शकलो, बरोबर आहे.
दादाश्री : म्हणजे आपण एकटे येऊ शकता? जसा एक मनुष्य रथात बसून इथे आला आणि म्हणाला, 'मी आलो, मी आलो' तेव्हा आम्ही विचारतो, 'ह्या आपल्या पायाला पॅरॅलिसिस (पक्षाघात) झाला आहे, तर आपण आला कसे?' तेव्हा ते म्हणाले, 'रथातून आलो, पण मीच आलो मीच आलो.' 'अरे, पण रथ आला कि आपण आलात?' तेव्हा ते म्हणाले, 'रथ आला.' मग मी म्हणेन कि, रथ आला कि बैल आले?
अर्थात् ही गोष्ट तर कुठल्या कुठे आहे. पण बघा उलट मानले आहे ना. सगळे संयोग अनुकूल असतील, तर येऊ शकता, नाहीतर नाही येऊ