________________
मी कोण आहे?
शकत. डोकं दु:खत असेल तर आपण आला असाल तरीपण परत जाल. आपणच येणारे-जाणारे आहोत, तर मग डोकं दु:खायचे बहाणं करणार नाही ना? अरे, तेव्हा डोकं आले होते कि आपण आले होते? जर कोणी रस्त्यात भेटले आणि म्हणाले, 'चला चन्दुलाल माझ्या बरोबर' तेव्हा पण आपण परत जाणार. म्हणून संयोग अनुकूल असतील, येथे पोहचण्या पर्यंत कोणी अडवणारा नाही मिळाला तरच येऊ शकतो.
स्वतःची सत्ता किती? आपण तर कधी खाल्ले ही नाही ना. हे तर सगळे चन्दुलाल खातो आणि आपण मनात मानतो कि मी खाल्ले. चन्दुलाल खातात आणि संडासला पण चन्दुलाल जातात. विनाकारण ह्यात फसला आहात. हे आपल्याला समजते ना?
प्रश्नकर्ता : समजवा.
दादाश्री : या संसारात कोणी मनुष्य संडास जाण्यासाठी स्वतंत्र सत्तावाला जन्मला नाही. संडास जाण्यासाठी ही स्वतंत्र सत्ता नाही कोणाची. मग अजून कोणती सत्ता असेल? हे तर जोपर्यंत आपल्या मर्जीनुसार थोडे फार होत आहे, तेव्हा मनात मानता कि माझ्यामुळेच होत आहे सगळे काही. जेव्हा कधी अडकते ना, तेव्हा कळते.
मी फॉरिन रिटर्न डॉक्टरांना इथे बडौद्यात एकत्र केले होते, दहाबारा जणांना. त्यांना मी सांगितले. 'संडास जाण्याची स्वतंत्र शक्ति आपली नाही आहे.' यावर त्यांच्यात खळबळ उडाली. पुढे सांगितले कि, हे तर कधी अडकल्यावर कळेल. तेव्हा तिथे कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. म्हणून ही आपली स्वतंत्र शक्ति नाहीच आहे. हे तर भ्रमाने आपण नैसर्गिक शक्तिला स्वत:ची शक्ति मानता. परसत्तेला स्वत:ची शक्ति मानता, त्याचेच नांव भ्रम. ही गोष्ट थोडीफार समजली आपल्याला? दोन आणे किंवा चार आणे जितकेपण समजले?