________________
२४
मी कोण आहे?
सुख तर हवे.' मी सांगितले, 'सुख थोडे फार कमी असेल तर चालेल का?' तेव्हा ते म्हणाले, 'नाही, सुख तर पूर्ण हवे' तेव्हा मी सांगितले, 'तर आपण सुखाचीच गोष्ट बोलूया. मोक्षाचे जाऊदे.' मोक्ष काय चीज आहे, लोकं समजतच नाहीत. शब्दात बोलेल इतकेच आहे. लोक असे समजतात कि मोक्ष नांवाची एखादी जागा आहे आणि तिथे जाण्यामुळे आम्हाला मोक्षाची मजा येते! पण असे नाही आहे.
मोक्ष, दोन स्टेज मध्ये ! प्रश्नकर्ता : सामान्यपणे मोक्षचा अर्थ, आम्ही जन्म-मरणातून मुक्ति असा करतो.
दादाश्री : हो, हे बरोबर आहे. पण जी अंतिम मुक्ति आहे, ती सेकन्डरी स्टेज आहे. पहिले मोक्ष म्हणजे संसारी दुःखाचा अभाव. संसारातील दु:खात पण दु:ख वाटत नाही, उपाधिमध्ये पण समाधी राहते, हा पहिला मोक्ष. आणि मग हा देह सुटल्यावर आत्यंतिक मोक्ष आहे. पण पहिला मोक्ष इथे झाला पाहिजे. माझा मोक्ष झालाच आहे ना ! संसारात राहून संसार स्पर्श करत नाही, असा मोक्ष होऊन जायला पाहिजे. हे अक्रम विज्ञानात असे होऊ शकते.
जिवंतपणीच मुक्ति प्रश्नकर्ता : ही मुक्ति किंवा मोक्ष आहे, ती जिवंतपणे मुक्ति आहे कि मरण्या नंतरची मुक्ति आहे?
दादाश्री : मरण पश्चात मिळालेली मुक्ति काय कामाची? मरणानंतर मुक्ति मिळणार, असे सांगून लोकांना फसवतात. अरे, मला येथेच काहीतरी दाखव ना. स्वाद तर घेऊदे थोडा, काही पुरावा तर दाखव. तिथे मोक्ष मिळेल, त्याचा काय ठिकाणा? असा उधारी मोक्ष आम्हाला काय करायचा? उधारीत बरकत नाही होत. म्हणून कॅश (नकद) चांगली.