________________
मी कोण आहे?
____ २३
लागतात, डाळ-तांदुळ आणावे लागतात, पातेले आणावे लागते. पाणी आणावे लागते तेव्हा मग खिचडी बनते. परंतु मोक्ष तर खिचडीपेक्षा सोपा आहे, पण मोक्षदाता ज्ञानी मिळायला पाहिजे. नाहीतर मोक्ष कधी नाही मिळू शकत. करोडो जन्म मिळाल्यावर सुद्धा नाही होणार. अनंत जन्म झालेलीच आहेत ना?
मेहनतीने मोक्ष प्राप्ति नाही! आम्ही हे सांगतो ना, कि आमच्याकडे येऊन मोक्ष घेऊन जा, तेव्हा लोकं मनात विचार करतात कि 'असा दिला गेलेला मोक्ष काय कामाचा, आपली मेहनत केल्याशिवाय?!' तर भाऊ मेहनत करून आणा. बघा, त्याची समज किती चांगली (!) आहे? बाकी मेहनतीने काही ही मिळणार नाही. मेहनतीने कधी कोणाला मोक्ष मिळालेला नाही.
प्रश्नकर्ता : मोक्ष दिला किंवा घेतला जाऊ शकतो का?
दादाश्री : तो देण्या-घेण्याचा असतच नाही. हे तर नैमित्तिक आहे. आपण मला भेटलात, हे निमित्त झाले, निमित्त जरूरी आहे. बाकी, तर नाही कोणी देणारा आहे आणि नाही कोणी घेणारा आहे. देणारा कोण म्हटले जाते? जो स्वत:ची वस्तु आपल्या देतो तर त्याला देणारा म्हणतात. पण मोक्ष तर आपल्या घरातच आहे. आम्हाला तर केवळ आपल्याला दाखवायचे आहे, रियलाइज करून द्यायचे आहे, म्हणजे देण्या-घेण्याचे होतच नाही. आम्ही तर केवळ निमित्त आहोत.
मोक्ष म्हणजे सनातन सुख! प्रश्नकर्ता : मोक्ष मिळवून करायचे काय?
दादाश्री : काही लोक मला भेटल्यावर सांगतात कि, 'मला मोक्ष नको.' तेव्हा मी सांगतो कि, 'भाऊ, आपल्याला मोक्षाची जरूरत नाही. पण सुख तर हवे कि नको? कि दुःख पसंद आहे?' तेव्हा सांगतात, 'नाही,