________________
प्रतिक्रमण विधि
प्रत्यक्ष ‘दादा भगवानां'च्या साक्षीने देहधारी ★ च्या मन-वचन-कायाचे योग, भावकर्म, द्रव्यकर्म, नोकर्महून भिन्न असे हे शुद्धात्मा भगवान! आपल्या साक्षीने आजच्या दिवसाच्या अद्यक्षण पर्यंत जे जे ★ ★ .... दोष झाले आहेत, त्यांची क्षमा मागत आहे, पश्चाताप करत आहे. आलोचना, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान करत आहे आणि परत असे दोष कधीही करणार नाही, असा दृढ निश्चय करत आहे, मला क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा.
हे दादा भगवान! मला असे कुठले ही दोष न करण्याची परम शक्ति द्या, शक्ति द्या, शक्ति द्या.
★ ज्याच्या प्रति दोष झाला असेल त्या (समोरच्या) व्यक्तिचे नांव म्हणायचे. ★★ जे दोष झाले असतील ते मनात जाहीर करणे.
ज्ञानसाक्षात्कार प्राप्ति हेतु व्यवहारविधि
प्रकट ‘ज्ञानी पुरुष' ‘दादा भगवानांना' अत्यंत भक्तिने नमस्कार करत आहे, नमस्कार करत आहे, नमस्कार करत आहे.
प्रकट 'ज्ञानी पुरुष' द्वारा ज्यांना 'सत्' प्राप्त झाले आहे, त्या 'सत् पुरुषांना' अत्यंत भक्तिने नमस्कार करत आहे, नमस्कार करत आहे, नमस्कार करत आहे.
सर्व निष्पक्षपाती ‘देव - देवींना' अत्यंत भक्तिने नमस्कार करीत आहे, नमस्कार करीत आहे, नमस्कार करीत आहे.
हे प्रकट 'ज्ञानी पुरुष' आणि हे सर्व 'सत् पुरुष' आज, भडकलेल्या आगीत जळत असलेल्या या जगाचे कल्याण करा, कल्याण करा, कल्याण करा. आणि त्यात मी निमित्त होवो अश्या शुद्ध भावनेने आपल्या समक्ष मन-वचनकायाच्या एकाग्रतेने प्रार्थनाविधि करत आहे, जी आत्यंतिक सफळ होवो, सफळ होवो, सफळ होवो.
हे दादा भगवान ! आपल्या शुद्ध ज्ञानात अवलोकन झालेले आणि आपल्या श्रीमुखातून प्रकटलेले शुद्ध ज्ञानसूत्र खाली दिल्याप्रमाणे आहे :