________________
मी कोण आहे?
त्याला मोक्ष म्हणतच नाहीत छोटे मूल असेल तो पण म्हणतो कि, 'ईश्वरने बनविले' मोठे संत पण म्हणतात कि 'ईश्वरने बनविले'. ही गोष्ट लौकिक आहे, अलौकिक नाही.
ईश्वर जर क्रिएटर (निर्माता) झाला असता तर तो नेहमीसाठी आपल्या उपरी ठरला असता आणि मोक्ष सारखी गोष्ट नसती झाली, पण मोक्ष आहे. भगवान क्रिएटर नाही आहे. मोक्ष समजणारे लोक देवाला क्रिएटर नाही मानत. 'मोक्ष' आणि 'भगवान क्रिएटर' ह्या दोन्ही विरोधाभासी गोष्टी आहेत. क्रिएटर तो नेहमीसाठी उपकारी झाला आणि उपकारी झाला म्हणून शेवटपर्यंत वरचढच्या वरचढच राहिल.
तर ईश्वरला कोणी बनविले? ईश्वरने बनविले, जर असे आम्ही अलौकिक दृष्टिने म्हणालो तर 'लॉजिक'वाले आम्हाला विचारतील कि, 'ईश्वरला कोणी बनविले?' म्हणून प्रश्न ऊभे राहतात. लोक मला सांगतात, 'आम्हाला वाटते कि ईश्वरच दुनियेचा कर्ता आहे. आपण तर अमान्य करता, पण आपली गोष्ट मान्य होत नाही.' तेव्हा मी विचारतो कि जर मी स्वीकार केले कि ईश्वर कर्ता आहे, तर त्या ईश्वरला कोणी बनविले? हे आपण मला सांगा. आणि त्या बनविणाऱ्याला कोणी बनविले? कोणीही कर्ता झाला तर त्याचा कर्ता असायला हवा, हे 'लॉजिक' आहे. पण त्याचा एन्ड (अंत) च नाही येणार. म्हणून ही गोष्ट चुकीची आहे.
ना आदि, ना ही अंत, जगाचा... म्हणजे कोणी बनविल्या शिवाय बनले आहे, कोणी ही बनविले नाही हे. कोणी केले नाही, म्हणून आता आपण कोणाला विचारायचे याच्याबद्दल? मी पण शोधत होतो कि कोण ह्याला जबाबदार आहे, ज्याने हा सारा घोळ केला. मी सगळ्या ठिकाणी शोध केला. पण कुठे मिळाला नाही.