________________
मी कोण आहे?
राहू दे, या साठी प्रोटेक्शन देतो कि ज्यामुळे हा काळ जो कलियुग आहे, हे कलियुगवाले त्याला लुटून न नेवो. 'बोधबीज'चा अंकुर उगवल्यानंतर पाणी वगैरे शिंपडायला हवे ना? जोपासना करावी लागणार कि नाही करावी लागणार?
४३
दृढ निश्चयच करतो पालन, आज्ञाचे!
दादाजींच्या आज्ञेचे पालन करायचे आहे, हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आमच्या आज्ञेचे पालन करायचा निश्चय करायला हवा. आज्ञेचे पालन होत आहे कि नाही. ते तुम्हाला पाहायचे नाही. आज्ञेचे पालन जितके होऊ शकेल तितके बरोबर, पण तुम्हाला निश्चय करायला हवा कि आज्ञेचे पालन करायचे आहे.
प्रश्नकर्ता : कमी-अधिक पालन होऊ दे, त्याला काही हरकत नाही ना?
दादाश्री : 'हरकत नाही' असे नाही. आपण निश्चय करा कि आज्ञेचे पालन करायचेच आहे. सकाळपासूनच निश्चय करा कि, 'पाच आज्ञेतच रहायचे आहे, पालन करायचे आहे.' निश्चय केला, तेव्हापासून माझ्या आज्ञेत आलात, मला इतकेच हवे आहे. पालन नाही होत, त्याची कॉझीझ (कारणे) मला माहीत आहेत. आम्हाला पालन करायचे आहे, असे निश्चयच करायचा आहे.
आपल्या ज्ञानाने तर मोक्ष मिळणारच आहे. जर कोणी आज्ञेत राहिल तर त्याचा मोक्ष होईल. ह्या बद्दल दोन मत नाही. कुणी जर ज्ञान घेतले असेल आणि आज्ञा पाळत नसेल तरी सुद्धा हे ज्ञान उगवल्या शिवाय रहाणार नाही. म्हणून लोक मला म्हणतात कि, 'ज्ञान प्राप्त झालेले काही लोक आज्ञेचे पालन नाही करत त्याचे काय?' मी सांगतो, 'हे तुला बघायची गरज नाही आहे, हे मला बघायची गरज आहे. ज्ञान माझ्याकडून घेऊन गेलेत ना. तुझे नुकसान नाही ना झाले?' कारण पाप भस्मसात