________________
३८
मी कोण आहे?
हे भान सुटले. म्हणून शुद्धच आहे, हे भान राहण्यासाठी 'शुद्धात्मा' म्हटले. कोणा बरोबर काहीही होऊ दे, 'चन्दुभाई' शिव्या देऊ दे, तरी पण आपण शुद्धात्मा आहात. मग 'आम्हाला' चन्दुभाई ना सांगायला हवे कि, 'भाऊ, कोणाला दु:ख होईल असे अतिक्रमण का करता? त्यासाठी प्रतिक्रमण करा.'
कोणाला दु:ख झाले असेल असे काही बोलला असाल, ते 'अतिक्रमण' म्हणतात. त्याचे प्रतिक्रमण करायला हवे.
प्रतिक्रमण, म्हणजे आपल्याला समजेल, त्याप्रकारे त्याची माफी मागायला हवी. हा दोष झाला ते मला समजले आणि आता असा दोष मी परत करणार नाही असा निश्चय तुम्ही केला पाहिजे. असे केले हे चुकीचे केले. असे नाही व्हायला पाहिजे, परत असे दुसऱ्यांदा नाही करणार, अशी प्रतिज्ञा करा. तरी दुसऱ्यांदा चुक झाली, हा दोष पुन्हा झाला तर पुन्हा पश्चाताप करा. जितके दोष दिसतात, त्याचा पश्चाताप केला तर तितके कमी झाले. असे करत करत शेवटी हळू हळू दोष संपत जातील.
प्रश्नकर्ता : कोणत्याही व्यक्तिचे प्रतिक्रमण कसे केले पाहिजे?
दादाश्री : मन-वचन-काया, भावकर्म-द्रव्यकर्म-नोकर्म, (त्या व्यक्तिचे) नांव आणि त्याच्या नांवाची सर्व मायापासून, भिन्न अशा त्याच्या शुद्धात्माला आठवण करा, आणि मग ज्या चूकां झाल्यात त्यांना आठवा (आलोचना), त्या चूकांचा मला पश्चाताप होत आहे आणि त्यासाठी मला क्षमा करा (प्रतिक्रमण) परत अशा चूका नाही होणार असा दृढ निश्चय करतो, असे ठरवा (प्रत्याख्यान). 'आपण' स्वतः ‘चन्दुभाई'चा ज्ञाता-द्रष्टा राहतो आणि जाणतो कि 'चन्दुभाई' ने किती प्रतिक्रमण केले, किती सुंदर केले आणि किती वेळा केले.
प्रज्ञा आतून चेतवते ! हे विज्ञान आहे म्हणून आम्हाला याचा अनुभव होतो आणि आतूनच