________________
मी कोण आहे?
३५
बोलते, त्याचा मी ज्ञाता-द्रष्टा रहातो. तुमचे पण टेपरेकार्डर बोलते. पण तुमच्या मनात 'मी बोलतो' असा गर्वरस (अहंकार) उत्पन्न होतो. बाकी, आम्हाला सुद्धा 'दादा भगवान'नां नमस्कार करावा लागतो. आमचा दादा भगवानां बरोबर वेगळेपणा (भिन्नता)चा व्यवहार आहे. व्यवहार च वेगळेपणाचा आहे. पण लोक असे समजतात कि हे स्वत:च दादा भगवान आहेत. नाही स्वतः दादा भगवान कसे होऊ शकतो? हे तर पटेल आहेत, भादरणचे.
(११) 'अक्रम मार्ग' मोकळाच (चालूच) आहे
मागे ज्ञानींची वंशावळी ! आम्ही आमच्या मागे ज्ञानींची वंशावळ सोडून जाऊ. आमचे उत्तराधिकारी सोडून जाऊ आणि त्याच्या नंतर ज्ञानींची लिंक चालू राहिल. म्हणून सजीवन मूर्ति शोधा. त्याच्या शिवाय मार्ग निघणार नाही.
मी तर काही लोकांना आपल्या हाताने सिद्धि प्रदान करणार आहे. नंतर कोणी हवे कि नको? नंतर लोकांना मार्ग तर हवा ना?
ज्याला जग स्वीकारणार, त्याचेच चालेल प्रश्नकर्ता : आपण म्हणता कि माझ्या मागे चाळीस-पन्नास हजार रडणारे असतील पण शिष्य एक ही नसणार. म्हणजे आपण काय सांगू इच्छिता?
दादाश्री : माझा शिष्य कोणी नसणार. ही काही गादी नाही आहे. गादी असेल तर वारीस असेल ना. कोणी नातेवाईकांच्या रूपाने वारीस बनायला येतील. इथे तर जे स्वीकार्य असेल, त्याचेच चालेल. जो सगळ्यांचा शिष्य बनेल. त्याचे काम होईल. इथे तर लोक ज्याचा स्वीकार करतील. त्याचेच चालेल. जो लघुतम असेल, त्याला जग स्वीकारेल.