________________
३४
मी कोण आहे?
येथे प्रकट झाले, चौदालोकांचे नाथ! प्रश्नकर्ता : ‘दादा भगवान' शब्दप्रयोग कशासाठी केला गेला आहे?
दादाश्री : 'दादा भगवान'साठी ! माझ्यासाठी नाही, मी तर ज्ञानी पुरुष आहे.
प्रश्नकर्ता : कोणते भगवान?
दादाश्री : ‘दादा भगवान', चौदालोकांचे नाथ आहेत. ते आपल्यातही आहेत, पण आपल्यात प्रकट नाही झालेत. आपल्यात अव्यक्त रूपात आहेत आणि इथे व्यक्त झाले. व्यक्त झाले ते फळ देतात असे आहेत. एकदा जरी त्यांचे नांव घेतले तरी काम होऊन जाईल असे आहे. पण ओळखून बोललो तर कल्याण होऊन जाईल आणि सांसारिक गोष्टींची काही अडचण असेल तर ती पण दूर होईल. पण त्यात लोभ करू नका आणि लोभ केला तर अंतच नाही येणार. आपल्यास समजले 'दादा भगवान' काय आहेत ते?
हे दिसत आहे ते 'दादा भगवान' नाही आहेत. आपण, हे जे दिसतात, त्यांना 'दादा भगवान' समजत असाल ना? पण हे दिसणारे तर भादरणचे पटेल आहेत. मी 'ज्ञानी पुरुष' आहे आणि 'दादा भगवान' तर आत बसले आहेत, आत प्रकट झालेत ते आहेत. चौदालोकांचे नाथ प्रकट झालेत. त्यांना मी स्वतः पाहिले, स्वतः अनुभवले आहे. म्हणून मी गॅरन्टी ने सांगतो कि ते आत प्रकट झाले आहेत.
आणि हे कोण बोलत आहे? 'टेपरेकार्डर' बोलत आहे. कारण 'दादा भगवानां' मध्ये बोलण्याची शक्ति नाही आहे आणि हे 'पटेल' तर 'टेपरेकॉर्डर'च्या आधारावर बोलतात. कारण 'भगवान' आणि 'पटेल' दोन्ही वेगेळे झाले. म्हणून तेथे अहंकार करू नाही शकत. हे टेपरेकार्डर