________________
३२
मी कोण आहे?
आहे. सगळ्यांना इथे यावे लागेल, सुटकाच नाही. प्रत्येकाची इच्छा हीच असते.
ज्ञानी पुरुषाला म्हणजे दुनियेचे आश्चर्य म्हणतात. ज्ञानी पुरुष म्हणजे प्रकट दिवा म्हणतात.
ज्ञानी पुरुषांची ओळख प्रश्नकर्ता : ज्ञानी पुरुषाला कशा प्रकारे ओळखायचे?
दादाश्री : कसे ओळखायचे? ज्ञानी पुरुष तर काही न करताच ओळखले जातील असे असतात. त्यांचा सुगंधच, ओळखला जाईल असा असतो. त्यांचे वातावरण काही वेगळेच असते. त्यांची वाणी पण काही वेगळीच असते. त्यांच्या शब्दातून कळून जाते. अरे, त्यांचे डोळे बघताच कळून जाते. ज्ञानी कडे खूप विश्वसनियता असते, जबरदस्त विश्वसनियता. आणि त्यांचा प्रत्येक शब्द शास्त्ररूप असतो, जर समजले तर ! त्यांची वाणी-वर्तन आणि विनय मनोहर असते, मनाचे हरण करणारे असतात. अशी बरीच सारी लक्षणे असतात.
ज्ञानी पुरुषात बुद्धि किंचित्मात्र नसते, ते अबुध असतात. बुद्धि किंचित्मात्र नाही असे किती लोक असतील? कधीकाळी त्यांचा जन्म होत असतो, आणि तेव्हा लोकांचे कल्याण होऊन जाते. तेव्हा लाखो मनुष्य (संसारसागर) पार होऊन जातात. ज्ञानी पुरुष अहंकार रहित असतात. थोडापण अहंकार नसतो. तसे तर अहंकार रहित कोणी मनुष्य या संसारात असतच नाही. मात्र ज्ञानी पुरुषच अहंकार रहित असतात.
ज्ञानी पुरुष तर हजारो सालात एखादा जन्मतात. बाकी, संत, शास्त्रज्ञानी तर अनेक असतात, आपल्या इथे शास्त्रांचे ज्ञानी आहेत पण आत्म्याचे ज्ञानी नाहीत. जे आत्मज्ञानी असतील ना, ते तर परम सुखी असतात, त्यांना किंचित्मात्र दुःख नसते. म्हणून तिथे आपले कल्याण होऊन जाईल. जे स्वत:चे कल्याण करून बसलेत, तेच आपले कल्याण