________________
30
मी कोण आहे?
दादाश्री : माझी ईच्छा पूर्ण होईल.
प्रश्नकर्ता : 'अक्रम विज्ञान' जर चालू राहिले, तर त्याच्या निमित्ताने चालू राहिल?
दादाश्री : 'अक्रम विज्ञान' चालू राहणार. अक्रम विज्ञान जर वर्ष दोन वर्ष असेच चालू राहिले तर साऱ्या दुनियेत ह्याच्याच गोष्टी चालतील आणि पोहोचतील चरम पर्यंत (पसरेल सगळीकडे). कारण जशी खोटी गोष्ट डोक्यावर चढून बोलते. त्याच प्रकारे खरी गोष्ट पण वरचढ बोलते. खऱ्या गोष्टीचा परिणाम उशीरा होतो आणि खोट्या गोष्टीचा परिणाम लवकर होतो.
अक्रम द्वारा स्त्रीचा पण मोक्ष ! लोकं म्हणतात कि मोक्ष पुरुषाचाच होतो, स्त्रियांचा मोक्ष नाही. यावर मी त्यांना सांगतो कि स्त्रियांचा पण मोक्ष होतो. का नाही होणार? तेव्हा सांगतात कि, त्यांची कपटाची आणि मोहाची ग्रंथी खूप मोठी आहे. पुरुषांची छोटी गाठ असते, तर त्यांची इतकी मोठी सूरण (जमीकंद) इतकी असते.
स्त्री पण मोक्षाला जाणार. जरी सगळे मानत नसतील, तरी पण स्त्री मोक्षासाठी लायक आहे. कारण ती आत्मा आहे आणि पुरुषांच्या संपर्कात आली आहे, म्हणून तीचा पण मार्ग निघेल, पण स्त्रीप्रकृति मध्ये मोह बलवान असल्यामुळे जास्त वेळ लागेल.
काम काढून घ्या! आपले काम काढून घ्यायचे. जेव्हा जरूरी असेल तेव्हा, असे पण नाही कि आपल्याला अवश्य यायला हवे. आपल्याला ठीक वाटले तर या, आणि संसार पसंत असेल, पटत असेल तोपर्यंत व्यापार चालू ठेवा. आम्हाला असे नाही कि हे असेच करा. आणि आम्ही आपल्याला पत्रही