________________
२८
मी कोण आहे?
मार्ग-'क्रम' आणि 'अक्रम'! तीर्थंकरांचे जे ज्ञान आहे ते क्रमिक ज्ञान आहे. क्रमिक म्हणजे पायरी पायरीने वर चढणे. जसे जसे परिग्रह कमी करत जाणार, तसे तसे मोक्षच्या जवळ पोहोचणार. ते पण बऱ्याच काळनंतर, आणि हे अक्रम विज्ञान म्हणजे काय? पायरी नाही चढायची, लिफ्टमध्ये बसायचे आणि बाराव्या मजल्यावर चढायचे, असा हा लिफ्टचा मार्ग निघाला आहे. जे ह्या लिफ्टमध्ये बसले, त्यांचे कल्याण झाले, मी तर निमित्त आहे. या लिफ्टमध्ये जे बसले, त्यांचा मार्ग निघाला ना! मार्ग तर निघायलाच हवा ना? आपण मोक्षाला जाणारच आहोत, त्या लिफ्टमध्ये बसलेले आहोत त्याची खात्री तर असायला हवी कि नको ? त्याची खात्री म्हणजे क्रोध-मान-माया-लोभ होत नाही, आर्तध्यान-रौद्रध्यान होत नाही. म्हणजे पूर्ण काम झाले ना?
जो मला भेटला तोच अधिकारी ! प्रश्नकर्ता : हा मार्ग इतका सोपा आहे, तर मग काही अधिकार असे पाहायचे नाही? प्रत्येकांसाठी हे संभव आहे?
दादाश्री : लोक मला विचारतात कि, 'मी अधिकारी आहे का?' तेव्हा मी सांगितले, 'मला भेटला, म्हणून तू अधिकारी.' हे भेटणे म्हणजे सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स आहे, त्याच्या मागे. म्हणून मला जो कोणी भेटला, त्याला अधिकारी मानतो. जे भेटले नाहीत ते अधिकारी नाहीत. हे कशाच्या आधारावर भेटतात? तर, अधिकारी आहेत. या आधारावर ते मला भेटतात. मला भेटल्यावर पण जर त्याला प्राप्ति नाही होत, तर त्याचे अंतराय कर्म अडसर आहे.
क्रममध्ये 'करायचे आणि अक्रममध्ये... एकवेळा, एका भाऊ ने प्रश्न केला कि क्रम आणि अक्रममध्ये फरक काय आहे? तेव्हा मी सांगितले कि, क्रम म्हणजे जसे कि सगळे