________________
मी कोण आहे?
दादाश्री : मागचा जन्म सुद्धा होता आणि आता पुढचा जन्म सुद्धा आहे, पण हे ज्ञान असे आहे कि आता एक-दोन जन्मच बाकी राहिलेत. प्रथम अज्ञानातून मुक्ति होते. मग एक-दोन जन्मात मुक्ति मिळेल. एक जन्म तर शेष आहे, हा काळ असा आहे.
आपण एक दिवस माझ्याकडे या. आपण एक दिवस ठरवूया तेव्हा आपल्याला यायचे आहे. त्या दिवशी सगळ्यांची रस्सी मागून कापतो (स्वरूपच्या अज्ञानरूपी रस्सीचे बंधन दूर करतो). रोज रोज तर ब्लेड शोधायला लागते. रोज तर सगळ्या गोष्टी सत्संगाच्या करतो, परंतु एक दिवस ठरवून त्या दिवशी ब्लेडने अशी रस्सी कापून देतो. (ज्ञानविधि ने स्वरूपज्ञान प्राप्त करून देतो) दुसरे काही नाही. मग लगेच आपण समजून जाणार कि हे सगळे उघड झाले. हा अनुभव झाल्यावर लोक त्वरीतच सांगतात कि मुक्त झालो. अर्थात् मुक्त झाला, असे भान झाले पाहिजे. मुक्त व्हायचे, हे काही गप्पा (बाता) नाही आहे. अर्थात् आम्ही आपल्याला मुक्त करतो.
ज्या दिवशी हे 'ज्ञान' देतात त्यादिवशी काय होते? ज्ञानाग्निने त्यांची जी कर्म आहेत, ती भस्मसात होऊन जातात. दोन प्रकारची कर्म भस्मसात होतात. आणि एक प्रकारचे कर्म बाकी राहतात जे कर्म वाफ रूपेत आहे, त्याचा नाश होऊन जातो. आणि जी कर्म पाणीस्वरूप आहेत, त्याचा पण नाश होतो, पण जी कर्म बर्फस्वरूप आहेत, त्यांना भोगावेच लागते. कारण ती जमलेली आहेत, आणि ते कर्म फळ देण्यासाठी तयार झाले आहे, ते मग सोडत नाही. पण पाणी आणि वाफस्वरूप जी कर्म आहेत, त्यांना ज्ञानाग्नि उडवून लावते. म्हणून ज्ञान मिळताच लोकं एकदम हलके होऊन जातात, त्यांची जागृति एकदम वाढते. कारण जोपर्यंत कर्म भस्मसात होत नाहीत तोपर्यंत जागृति वाढतच नाही माणसाची. जे बर्फस्वरूप कर्म आहे ते तर आपल्याला अवश्य भोगायचे राहिलेत. आणि ते पण सरळपणे कसे भोगायचे, त्याचे सगळे मार्ग आम्ही सांगितले कि, 'भाऊ, ह्या 'दादा भगवानांचा असीम जय जयकार हो.' बोला, त्रिमंत्र बोला, नऊ कलम बोला.'