________________
मी कोण आहे?
__ ३३
करू शकतात. जे तरून पार उतरले, ते आम्हाला तारू शकतात. नाहीतर जो स्वतः डूबतो, तो कधीही तारणार नाही.
(१०) 'दादा भगवान कोण?' 'मी' आणि 'दादा भगवान' नाही एक रे ! प्रश्नकर्ता : तर आपण भगवान कशाप्रकारे म्हणवता?
दादाश्री : मी स्वतः भगवान नाही. भगवानना, 'दादा भगवान'नां तर मी पण नमस्कार करतो. मी स्वतः तीनशे छप्पन डिग्रीवर आहे, आणि 'दादा भगवान' तीनशे साठ डिग्रीवर आहेत. माझी चार डिग्री कमी आहे. म्हणून मी 'दादा भगवान'नां नमस्कार करतो.
प्रश्नकर्ता : हे कशासाठी?
दादाश्री : कारण मला चार डिग्री पूर्ण करायच्या आहेत. मला पूर्ण तर कराव्या लागतील ना? चार डिग्री कमी राहिली. नापास झालो पण पास झाल्याशिवाय सुटका आहे का?
प्रश्नकर्ता : आपल्याला भगवान व्हायचा मोह आहे का?
दादाश्री : मला तर भगवान होणे खूप ओझे वाटते. मी तर लघुतम पुरुष आहे. या दुनियेत माझ्याइतका कोणी लघु नाही इतका मी लघुतम पुरुष आहे. अर्थात् भगवान होणे मला ओझे वाटते, उलट शरम येते.
प्रश्नकर्ता : भगवान व्हायचे नाही तर मग या चार डिग्री पूर्ण करायचा पुरुषार्थ का करायचा आहे?
दादाश्री : ते तर मोक्षाला जाण्यासाठी, मला भगवान होऊन काय करायचे आहे? भगवान तर, भगवत् गुण धारण करतात, ते सर्व भगवान असतात. 'भगवान' शब्द विशेषण आहे. कोणीही मनुष्य ज्याच्यात असे गुण असतील त्याला लोक त्याला भगवान म्हणतातच.