________________
मी कोण आहे?
आम्ही ज्ञान देतो, त्याने कर्म भस्मसात होतात आणि त्यावेळेस काही आवरणं तूटतात. तेव्हा भगवंताची कृपा होण्या बरोबर तो स्वतः जागृत होतो. ही जागृति मग जात नाही, जागल्यानंतर जागृति जात नाही. निरंतर जागृत राहू शकतो, म्हणजे निंरतर प्रतीति राहणारच. प्रतीति केव्हा राहते? जागृति असेल तर प्रतीति राहते. प्रथम जागृति, नंतर प्रतीति. नंतर अनुभव, लक्ष्य आणि प्रतीति हे तिन्ही राहतात. प्रतीति कायमची राहिल. लक्ष्य तर काही काही वेळेस राहिल. कधी धंद्यात किंवा काही कामात लागलात कि मग लक्ष्य चूकणार आणि काम संपल्यावर परत लक्ष्य येते. आणि अनुभव तर केव्हा होणार, जेव्हा कामापासून, सगळ्यातून निवृत्त होऊन एकांतात बसलात तेव्हा (आत्म) अनुभवाचा स्वाद येईल. खरं तर अनुभव वाढतच राहतो. कारण पूर्वी चन्दुलाल (वाचकांनी येथे स्वतःचे नांव समजणे) काय होते आणि आज चन्दुलाल काय आहे, हे समजमध्ये येते. तर हे परिवर्तन कसे घडले? आत्म अनुभवाने. पूर्वी देहाध्यासाचा अनुभव होता आणि आता हा आत्म-अनुभव आहे.
प्रश्नकर्ता : आत्म्याचा अनुभव झाल्यावर काय होते?
दादाश्री : आत्म्याचा अनुभव झाला, म्हणजे देहाध्यास सुटला. देहाध्यास सुटला, म्हणजे कर्म बांधणे थांबले, मग आणखी काय हवे आहे?
आत्मा-अनात्माच्या मध्ये भेद-रेखा! हे अक्रम विज्ञान आहे, म्हणून इतक्या लवकर सम्यक्त्व (सम्यक्त्व-शुद्धात्माचे लक्ष्य अससेली, सम्यक्दृष्टि) होते. नाहीतर क्रमिक मार्गात तर, आज सम्यक्त्व होऊ शकेल असे नाही आहे. हे अक्रम विज्ञान तर खूप उच्च कोटीचे विज्ञान आहे. ज्याने आम्ही आत्मा आणि अनात्माच्या मध्ये, म्हणजेच आपली आणि परकी वस्तु ह्या दोघांचे विभाजन करून देतो. 'हा' हिस्सा आपला आणि 'हा' हिस्सा आपला नाही. आणि मध्ये लाइन ऑफ डिमार्केशन, भेद-रेखा लावून देतो. मग शेजारच्या शेतातील भेंडी आपण नाही खाऊ शकत ना?