________________
मी कोण आहे?
आपल्यास इथे जिवंतपणी मुक्ति मिळायला पाहिजे. जशी जनक राजाची मुक्ति आपण ऐकलि कि नाही? प्रश्नकर्ता : ऐकले आहे.
(८) अक्रम मार्ग काय आहे?
अक्रम ज्ञानाने अनोखी सिद्धि ! प्रश्नकर्ता : पण या संसारात राहून आत्मज्ञान असे मिळू शकते काय?
दादाश्री : हो, असा मार्ग आहे. संसारात राहून इतकेच नाही, पण पत्नी बरोबर राहून ही आत्मज्ञान मिळू शकते, असे आहे. केवळ संसारात राहायचे नाही, पण मुला-मुलींची लग्न करून, सर्व कार्य करतांना आत्मज्ञान होऊ शकते. मी संसारात राहूनच आपल्याला हे करून देत आहे. संसारात, अर्थात् सिनेमा बघायला जाणे आदि सगळी सूट देत आहे. मुलामुलींची लग्न करा आणि चांगले कपडे घालून लग्न करा. मग यापेक्षा अजून काय खात्री पाहिजे?
प्रश्नकर्ता : इतकी सारी सूट मिळाल्यावर जरूर आत्म्यात राहू शकतो.
दादाश्री : सगळी सूट ! हा अपवाद मार्ग आहे. आपल्याला काही मेहनत करायची नाही. आपल्याला आत्मा पण हातात देऊ, मग त्यानंतर आत्मरमणतेत रमूण जा. आणि या लिफ्टमध्ये बसून रहा. आपल्याला आणखी काहीही करायचे नाही. मग आपले नवीन कर्म नाही बांधले जाणार, एकाच जन्माचे कर्म बांधाल, ते पण माझ्या आज्ञा पालनचेच. आमच्या आज्ञेत राहण्यासाठी जरूरी आहे कि लिफ्टमध्ये बसतेवेळी इकडे तिकडे हात केला तर अडचणीत पडू शकतात ना!
प्रश्नकर्ता : म्हणजे पुढचा जन्म जरूर असणार?